मंगळगड / कांगोरीगड - महाड जवळचा एक सुंदर किल्ला.
मी आणि पिंटू दुपारी निघायच ठरवलं. या वेळेला इतर मित्रांना जमणार नव्हतं. मंगळगड बरेच दिवस माझ्या मनात घर करून बसला होता. का माहित नाही पण जायची इच्छा होती. पुण्यातून निघून भोर मार्गानी वरंदा घाट उतरून डाव्या बाजूला हा किल्ला आहे. दुधाणेवाडी कडे जाणारा रस्ता पकडून सरळ किल्ल्या कडे पोचता येते. आम्ही किल्ल्याला वळसा घालून वर चढायला सुरु केले. रस्ता तयार करायच काम चालू आहे. THAR घेऊन गेलो त्यामुळे OFF ROADING ची मजा लुटता अली. ह्या रस्त्यानी तुम्ही एका पठारावर पोचता. तिथून बऱ्यापैकी चढण आहे. वर पोचल्यावर एक रस्ता उजवीकडे तर एक डावीकडे जातो. आम्ही उजवीकडच्या रस्त्यानी वर पोचलो. जातांना रॉक patch आहे पण काही फार कठीण नाही.
गडावर पोचलात की एका पडक्या दरवाज्यातून माथ्यावर येता . डावीकडे लांब वर कांगोरी माता मंदिर दिसते. जातांना पाण्याचा टाकं लागते. बारमाही पाणी इथे असतं.
तटबंदी शाबूत आहे व हिंडायला पण खूप आहे. बाले किल्ल्यावर काही वाड्याचे अवशेष आहेत.
आम्ही दुपारी ४.३० चा सुमारास हा गड चढायला सुरु केला. वर जायला ५० min लागली. ऊन खूप असल्यामुळे आणि चढ पण खूप असल्यामुळे धमछाक झाली. गडावर कोणीही नव्हता. शांतपणे मंदिरात बसून आम्ही विश्रांती घेतली. एकंदरीत वाऱ्यावर पोचल्यावर सर्व शीण निघून गेला. परत तेच अनुभव आणि परत तीच शांतता. या अनुभवासाठी परत परत यावंसं वाटतं. पुण्यात राहतो हे किती भाग्याची गोष्ट आहे हे जाणवत. जावळी च्या खोऱ्यात अनेक किल्ले आहेत. कावळा पण वरंध घाटात असलेला एक किल्ला आहे. जातांना तो करावा अस वाटत होता पण नाही जमलं. वराड गावात थांबून एका माउली च्या मठातून मस्त थंड पाणी भरून घेतलं . रात्र बरीच झाली होती. वरंध घाटातून परत येत असतांना डावी कडे एक फाटा लागतो. त्या रस्त्यानी जुन्या घाटातून तुम्ही पसुरे मार्गे भोर ला पोचता. फारसं कोणी त्या मार्गाचा उपयोग करत नाही. जंगल आहे आणि प्राणी पण आहेत. रात्रीची वेळ होती आणि येतांना आम्ही त्या मार्गानी यायच ठरवलं. मजा अली. राजघर ला थांबलो आणि होते ते खाऊन झोपी गेलो.
Another fantastic trek completed. This time, there were two of us and still we made it happen. Lots of discussions and talks, on all different topics. With close friends around and nothing to hide, these moments are much needed to unload, down load or just get some shit off the back. Feels good.
Next time we will plan and stay on this fort. There are places where you can set up the camp safely. Next week hopefully we will have a full house.