तिकोना
" चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती दोन प्रहरी का गं शिरीं सूर्य थांबला? राम जन्मला गं सखी राम जन्मला " आज तो दिवस. जवळचा किल्ला करायचा ठरलं आणि तिकोना डोळ्या समोर आला. वेळेत घरी यायचा होता काही लोकांना त्यामुळे सकाळी लवकर निघालो आम्ही. तीच टोळी पण बीडी नाही आला. रविवारी सकाळी त्याला महत्वाची meeting होती म्हणे. असो. चांदणी चौक, पौड, कोळवण रास्ता ते तिकोना पेठ. गडाचा पायथ्याशी गाडी लावायला जागा आहे. रु ५० अशी वर्गणी पण आहे. रस्ता मळलेला आहे. काहीच विशेष नाही. सरळ वर जातो.


या किल्ल्याचा विस्तार तसा खूप मोठा नसल्यानी हा किल्ला एक तासात बघून होऊ शकतो. किल्ला खूप छान आहे आणि स्वच्छ आहे. वर पोंचला की देवडी लागते. तिथे एक छोटीसी गुहा आहे आणि बसायला जागा आहे.



तिथून रस्ता डावीकडे वळतो आणि थेट गडावर जातो. खूप मस्त पाण्याचं टाकं आहे तिथे. नेहमी सारखं चुना घाणा आहे. सर्वात मला आवडली ती बजरंगबली ची अप्रतिम अशी मूर्ती. डागत कोरलेली आणि खूप भारी आहे.


पुढे आलत की खूप मोठा पाण्याचा साठा आणि मागे मंदिर आहे. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी सुंदर पण खूप steep पायऱ्या आहेत. वर चढतांना नक्कीच काळजी घ्यावी लागते.





बालेकिल्ल्यावर महादेवाचा मंदिर आहे. तिथून संपूर्ण मावळ ज्याला आपण म्हणतो त्याचा विस्तार छान दिसून येतो. तुंग लोहगड विसापूर या किल्ल्यांचे दर्शन घडते जर का दिवस चांगला असेल तर.








किल्ला उतरत असतांना खूप लोकं वर जात येतांना दिसली. त्या दिवशी गडावर खूप प्रसन्न वातावरण होता. रामनवमी चा कार्यक्रम होता आणि पूजा. मावळ्यांच्या पोशाखात काही मावळकर सज्ज झाले होते. एकंदरीत सणाचा माहोल होता, आणि आम्ही पण मावळे होऊन गेलो.
छान छोटासा टुमदार असा किल्ला आहे, तिकोना. नक्की जाऊन या.
No comments:
Post a Comment