नव्या वर्षाची सुरुवात छान झाली असे म्हणायला हरकत नाही. मागील वर्षी GoechaLa ट्रेक झाला, ज्याला मी काही कारणामुळे जाऊ शकलो नाही. पण सर्व team मात्र जाऊन आली. उत्तम ट्रेक पार पडला. त्यातील बऱ्याच लोकांचा पहिला ट्रेक होता, हिमालयात. आमच्या या सह्याद्री ट्रेकिंग मुळे छान practice झाली होती सर्वांची. शेवटचा ट्रेक माझा पूर्णगड झाला होता. त्याला ट्रेक नाही म्हणता येणार कारण मोजून ५ ते ८ मी मध्ये तुम्ही किल्ल्यावर पोचता.
ट्रेक ग्रुप वर परत हालचाल चालू झाली आणि आमची ट्रेकिंग मोहीम परत सुरु झाली. आयुष्यात बाकी गर्दी चालू असतांना ही एकमेव गोष्ट मला आनंद देऊन जाते. पुढच्या challenges साठी तयार करते असा म्हणा. मी उप्या आणि पप्या असे सकाळी निघालो. तिघंच होतो त्यामुळे जवळचा ट्रेक जो राहिलेला आहे तो करावा असे ठरले. लोणावळा परिसरात, I N S Shivaji उजवीकडे ठेऊन पुढे गेलात की कोरीगड, तुंग, तिकोना, घनगड असे किल्ले आहेत. त्यामध्ये एक किल्ला, ज्यावर फारसं कोणी जात नाही तो म्हणजे मोरगिरी. कठीण आहे चढायला आणि वर तसं पाहिला फार काही नाही. This would have been a watch tower in those days. Speaking of which, once you reach the top, the view is fantastic.
तर लोणावळ्या हुन तुंग किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्याबाजूला एक फाटा आहे. तिथून साधारण २ की मी वर जांभुळणे नावाचे गाव आहे. हेच ते पायथ्याचे गाव. तिथून वर जायला मळलेली वाट आहे. जंगलातून ही वाट एका मोठ्या पठारावर पोचते. वर जायची वाट अत्यंत घसरडी आहे आणि त्यामुळे वर चढतांना सावकाश तर जावेच पण त्या वेळी उतरायचा विचार करू नका. उतरतांना एक दोन वेळा पृष्ठभागावर दणकून आपटणार हे नक्की. चढण खूप आहे. किल्ला सोपा नाही. काळजी घ्यावी.
पठारावर आलात की लांब वर एक टेकडी दिसते आणि त्यावरचा भगवा. तोच तो किल्ला. याचे दर्शन वर गेलात तरी थोड्या वेळानी होते. पठारावरून डाव्या बाजूनी, म्हणजे किल्ला उजवीकडे ठेऊन चालत जावे. एक उतार येईल तो उतरावा आणि त्यानंतर उजवीकडे पाटी दिसेल. किल्ल्याकडे. इथून मात्र अत्यंत काळजी घेऊन वर चढावे. हा रस्ता सोपा नाही. घसरडा तर आहेच पण अत्यंत steep आहे. वरच्या टप्प्यात काही ठिकाणी rope ची जर गरज भासली तर न आळस करता आणि कुठलाही न्यूनगंड न बाळगता लगेच लावावा. वर एक मंदिर आहे आणि तिथून शिडीच्या वाटेनी गडाच्या माथ्यावर पोचता येते. गडावर दोन टाक्या आहेत. बाकी काहीही नाही. पण इथून दूर दूर वर सर्व किल्ले दिसतात. अप्रतिम दृश्य बघायला मिळते.
वर पोचून sandwich आणि eggs संपवली आणि उतरायच्या मार्गी लागलो. ट्रेक छान झाला. सुरुवात झाली यातच मोठा आनंद.
परत चर्चा, भांडणं, हेवेदावे कुठे जायचे या वरून ते परत आलो की कुठे जेवायचे इथे पर्यन्त - पण ट्रेकिंग ची आवड असल्यानी आणि मित्र परिवार बरोबर असल्यानी या सर्व गोष्टी हव्या हव्याशा वाटतात. मित्र आले नाही तरी त्रास होतो आणि काही मित्र येऊन त्रास देतात. चालायचेच. घरी परततांना माझ्या आणि उप्या च्या आवडत्या जागी जेवलो आणि वेळेत घरी परत आलो.
मोरगिरी हा किल्ला ट्रेकिंग साठी नक्कीच करायला हवा असे मला वाटते.
पठारावरून
No comments:
Post a Comment