Saturday, 28 March 2020

गुडी पाडवा - या वर्षी याचे महत्व जरा जास्तच आहे.

म्हणतात की ज्योतिष ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय सुरुवात , सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. थोडक्यात नवी सुरुवात म्हणायला हरकत नाही. पण ही कश्याची सुरुवात म्हणायची, हे कोडे काळच सांगेल. तरी आपण प्रयत्न करूया, विचार करूया, काही उलगडते का पाहूया. मनात कोडी खूप आहेत, पण त्याच कोड्यात काही उत्तरं पण आहेत. ती शोधायचा प्रयत्न करूयात. या ब्लॉग मध्ये जे काही आहे ते माझे विचार आहेत आणि त्यामुळे कोणाला दुखलं तर मी आत्ताच क्षमा मागतो. 

गुडी पाडवा म्हणजे बाबा चा वाढदिवस. दर वर्षी या दिवशी माझे काका आणि आत्या घरी जेवायला येतात. या वर्षी पण ठरले होते, पण अर्थातच ते घडले नाही. एका प्रथेचा शेवट झाला. सकाळी गुडी उभारतांना मनात विचारांचा कल्लोळ चालू होता. जगावर आलेले हे एक संकट, कोरोना चे, आणि त्यांनी मिटलेले अनेकांचे डोळे, केलेला विनाश आणि मनुष्य प्राण्याला दाखवून दिलेली निसर्गाची शक्ती, यांनी तरी माणसाचे डोळे उघडणार आहेत का ?

इंग्रजांनी हिंदू मुस्लिम distancing करून काही वर्ष का होईना राज्य केले. आजचे राज्यकर्ते तेच करतात, माणसांच्यात जाती धर्माचा आधार घेऊन फूट पडतात.... आणि काय मत मिळवतात. आणि काय पैसे ओढतात. पुढे काय. निसर्गाच्या समोर सर्व एकच. तो पाहत नाही की हा हिंदू आहे का अजून कोणी. जाती धर्माच्या या भांडणांतून आज या प्रथेचा शेवट करून नवीन सुरुवात करायची का ?

सकाळी गच्चीवर गेलो होतो. काल पाऊस झाला. वातावरण थंड होते. आणि आभाळ स्वच्छ. US मध्ये असतांना दूर दूर वर छान दिसत असेल. प्रदूषण कमी असल्यानी असेल. पण आज पुण्यात पण तोच अनुभव आला. एक आठवडा झाला असेल, वाहने रस्त्यावर नसल्यात जमा आहेत. पुणे स्वच्छ झाले आहे. यातून काही तरी शिकून आपण शहाणे होऊ का ? या गुडी पाडव्याला सर्व जण ठरवून आठवड्यातून २ दिवस वाहन न वापरण्याची गुडी उभारू का ?

 कामाच्या निमित्ताने, गेले काही वर्ष माझे गावोगावी फिरणे चालू आहे. त्यात ट्रेकिंग मुळे बऱ्याच अशा गावांचा परिचय झाला आहे, जिथे बस किंवा इतर वाहने जाऊच शकत नाहीत. तिथे आपलीच माणसे अगदी बेसिक मध्ये राहतात. तिथल्या प्रथा पाळतात आणि दोन घास खाऊन सुखी जीवन जगतात. आता हे आपल्याला, सर्वांना शक्य नाहीये हे पण तितकच खरं. पण त्यांच्या सारखे जगायला गावातच जावे लागते असे नाही. इथे पण तसे जगू शकतो. तसे म्हणजे नक्की कसे ? Basics मध्ये म्हणजे कसे. जितके पुरते किंवा जितक्याची आवश्यकता आहे तितकेच. मग ते पाणी असो वा पेट्रोल, वीज असो वा अजून काही. आज संकट आलं तर सर्वांना सर्व जमले. मग तसेच छान काटकसरीत राहू शकतो का आपण. निसर्गाचे जतन करू शकतो का आपण ? या वर्षी तीच ती गुडी उभारूया. अर्थात हे संकट टळले की  माणूस धर्म आपण पाळणारच, नाश चालू करणारच... तरी एक अशा, या पाडव्याला. 

काही लोकांना आपण खूप गृहीत धरतो. सहज घरी अन्न येते, सहज दूध, सहज औषधं आणि सहज मेडिकल सेवा. हीच सहज कामं करणारी आपली माणसे आज दिवस रात्र एक करून रुगणांना वाचवत आहेत. बॉर्डर वरचे जसे तशीच ही एक युद्ध भूमी बनली आहे. मामा, नर्सेस, अनाथ आश्रम सांभाळणारे, वृद्धांची काळजी घेणारे, पोलीस, रस्ते नीटनेटके ठेवणारे, कचरा उचलणारे, आपल्या जीवाची न पर्वा करता सतत काम करत आहेत. आज या लोकांच्या कष्टाचे, धैर्याचे कौतुक म्हणून आपण गुडी उभारूया. माझे या सर्व सैनिकांना शतशः प्रणाम. 

आपल्या हयातीत असे हे Lockdown पहिल्यांदाच झाले आहे. आणि मला वाटते ही विनाशाची सुरुवात आहे. हे आता होत राहणार जोवर माणूस निसर्गाला त्रास देणे बंद करत नाही तोवर. हा आजचा पाडवा विनाशाची सुरुवात तर करणारा नाही ना हीच भीती आहे. आता भीती आली की परत देव आला की परत कोणता देव की परत धर्म आला  ... ..... ..... ....

नव नवीन पक्षी दिसायला लागले आहेत अचानक. खरे पक्षी......






















Monday, 16 March 2020

मधुमकरंद गड 14.03.2020



मधुमकरंद गड

रस्ते मोकळे, टोल नाके रिकामे, पाचगणी आणि महाबळेश्वर येथे जणू काही नाकाबंदी आहे, असे वातावरण. पहाटे ५. ३० ची वेळ असेल जेव्हा आम्ही पुणे सोडले. चड्डी च्या घरी मी पिंटू आणि भूषण पोचलो आणि २ महिन्यांच्या गॅप नंतर परत पुढच्या ट्रेक ला निघालो. करोना virus नी जगाला शांत केले होते. पुण्य नगरीत जिथे रस्ता क्रॉस करणे आता कठीण झाले आहे, जिथे श्वास घेणे मुश्किल झाले आहे, तिथे पण हा येऊन पोचला होता. शाळा कॉलेज मॉल आणि इतर बरेच काही सर्व बंद ठेवण्याचा आदेश आला होता. धंदे ठप्प पडले होते आणि शेअर बाजार कोसळले  होते. अशाच एका शनिवारी, आम्ही मधुमकरंद गडावर जायचे ठरवले. माची पर्यन्त जीप जाऊ शकते असे कळले त्यामुळे THAR घेऊन आम्ही निघालो. खंबाटकीच्या अलीकडे उजवीकडे कामत च्या समोर नेहमीच्या हॉटेल मध्ये गरम गरम चहा पोहे खाऊन महाबळेश्वर पोलादपूर मार्गाच्या दिशेनी गाडी नेली. पुण्यापासून साधारण १५० कि मी असणारा हा किल्ला, तसा लपलेला म्हणायला हरकत नाही. पोलादपूर चा वळणदार घाट उतरत आणि मागे बसलेल्या बिडी आणि पिंटू च्या शिव्या ऐकत आम्ही पार नावाच्या पाटी पाशी पोचलो. THAR मध्ये मागे बसणे म्हणजे एक शिक्षा आहे. मी आणि चड्डी पुढे सुखी होतो आणि त्यांची मजा घेत होतो. बिडी चे "तुझी बॅट आहे त्यामुळे batting तूच करणार" वगैरे मागून ऐकू येत होते. 
पार फाट्यावर डावी कडे वळून रस्ता चतुर्बेट नावाच्या गावाशी पोचतो. हेच ते पायथ्याचे गाव. तिथून एक खडबडीत रस्ता घोणसपूर नावाच्या वस्तीवर जातो. हे माचीवरच्या गाव. तिथे १० - १५ घरांची वस्ती आहे. खाली एक सुंदर मंदिर आहे. मल्लिकार्जुन मंदिर असे म्हणतात. 




गाडी तिथे लावून आम्ही गडावर निघालो. वाट मळलेली आहे, चढण आहे पण २० मि च्या आत तुम्ही मकरंदगडावर पोचता. पडलेला गडाचा दरवाजा लेगच दिसून येतो. 



गडावर जायच्या आधी एक वाट उजवीकडे जाते. त्या वाटेनी गेलात तर खांब टाक्याजवळ पोचता. असे म्हणातात की तिथे गुहा आहेत. खांब आहेत त्यामुळे कदाचित आत बरेच काही असेल असा अंदाज आहे. 



परतीच्या वाटेवरच उजवीकडे गडावर जायच्या पाहिऱ्या आहेत. सावकाश जावे कारण या तुटलेल्या आहेत. ५ मिनिटात गड माथ्यावर असलेल्या महादेव मंदिरापाशी जाऊन पोचता. बाहेर असलेला नंदी आणि आत सुदर शंकराची पिंड, जी बऱ्यापैकी मोठ्या गाभाऱ्यात आहे. तिथे बाहेरच्या बाजूला १० जण राहू शकतील अशी सोय आहे. 







मंदिरा समोर एक चौथरा आहे आणि काही अवशेष. तिथे एक समाधी तत्सम काही तरी आढळून येते. 


मंदिराच्या मागच्या बाजूला बाकी काही नाही. तसा डोंगरमाथा छोटा आहे. या गडाचा उपयोग Watch  tower  म्हणून करत असावेत. आम्ही चौघेजण मंदिरासमोरच्या झाडाखाली बसून धपाटे, चटणी, मिरची चेपली आणि खाली उतरायला सुरुवात केली. जायच्या वाटेवर एक दगड आहे, भोक पडलेला. Nature's creation . 



गडावरून खाली उरतलो आणि प्रतापगड नावाच्या ठिकाणी जायचे ठरले. त्याला ठिकाण, रिसॉर्ट, हिल स्टेशन असेच म्हणणे योग्य आहे. तो काही गड उरला नाही. भवानी मातेचे मंदिर आणि तिथे ठेवलेल्या हंबीरराव मोहित्यांची तलवार, ज्यानी ६०० हुन अधिक गनिमांना चिरले, पाहण्यासाठी तरी प्रतापगड वर नक्कीच जावे. बाकी काय गोलगप्पे आणि सामोसे, आणि कारंजातून येणारे मलाई छाज ( आपल्या भाषेत ताक) वगैरे हवे ते मिळतेच. जमेल तेव्हड्या लवकर तिथून पळ काढून आम्ही चौघे भोर च्या दिशेनी निघालो. एक अप्रतिम ट्रेक झाला. फार दमणून नाही झाली, पण ऊन असल्यानी जरा त्रास झालाच. बिडी चे कंबरडे मागे बसून मोडले आणि वेळेवर पिंटू ला पुढे बसवल्यामुळे माझी गाडी वाचली. नाही तर साफ करायला खूप कष्ट पडले असते. मांढरदेवी घाटातून भोर ला उतरून आम्ही राजघर ला Northridge मध्ये जाऊन सुखावलो. सूर्यास्त पाहत पडलो. 


















महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...