Wednesday, 1 November 2023

विसापूर - पसरलेला


विसापूर - पसरलेला  

"काका आम्ही धर्मशाळेत राहणार आहोत. ट्रेक वगरे नसून ही एक ट्रिप आहे. अमोद ची काही काळजी करू नका." असे सांगून आम्ही पळ काढला. मी, आशुतोष भडभडे, अतुल वैद्य, कौस्तुभ देशमुख, भूषण घोरपडे आणि अमोद गद्रे. दुपारच्या लोकल नी निघायचे ठरले आणि तसे नियोजन झाले. डबे बांधले, हंटर शू, पिट्टू जुनाबाजार सॅक, कॅरी मॅट - मोठी शिट घेऊन कापून केलेली, चादर, आणि इतर आवश्यक सामग्री घेऊन आम्ही निघालो. एकत्र जमलो आणि एक एकाची वेष भूशा पाहून आज पण हसू येते. अमोद नी कामाची चे बूट, आणि एक ज्याला सुटकेस म्हणतात असे काही तरी घेऊन आल्याचे चांगले आठवते. भूषण फाटकी जीन्स आणि कमरेला कुठला तरी, हातानी पण वाकेल, असा रॅम्बो knife म्हणून घेऊन आला होता. आम्ही निघालो होतो भाजे, लोहगड आणि विसापूर ला. १९८९ मध्ये पहिल्यांदा इथे आलो होतो. त्या लेण्यांमध्ये रात्र काढली होती. जेवलो होतो. शाळातील ते दिवस आणि त्या आठवणी आज पण ताज्या आहेत. गद्रे काकांना मात्र आज तरी हे सांगितले पाहिजे की आम्ही कुठल्याश्या गुहेत राहिलो होतो, तिथे वट्वागुळांनी बाजार मंडल होता, विंचू आणि खेकडे दासमुंग्यां सारखे दिसत होते आणि एक अजगराने काही तरी खाऊन निपचित पडलेले दर्शन दिले होते. एक अजब ट्रेक होता पावसाळ्यातला. तेव्हा रस्ता नव्हता की काही. काल जाऊन आलो आणि सर्व आठवणींना उजाळा मिळाला. त्याच आठवणींच्या शिदोरी वर, वर्ष उलटून गेले एकमेकांना भेटून, तरी मैत्री तशीच. त्या विसापूर च्या तटबंदी इतकीच घट्ट. Miss You Atalya, हा मित्र सुखात आहे देवाकडे..... चला --------

पुण्यात थंडीची चाहूल लागली. पाऊस गेला. कोजागिरी चा चंद्र आला उत्तम प्रकाश पडला वगरे वगरे जे काही ते सुरस भाषेत, सर्व झाले आणि ट्रेक ठरला. खूप दिवसांच्या सुट्टी नंतर जायचे  पण झेपेल असा ट्रेक करू म्हणून विसापूर ठरले. मी पिंटू आणि बिडी तयार झालो. पुढच्या आठवड्यात सर्व मित्रांची एक सहल ठरली आहे ज्याच्या नियोजनाचा, भांडणांचा, कोण काय आणणार आणि कोण कसे आणि किती वाजता निघणार याच्या चर्चे चा सेशन ठरला आणि टेबले भरली. लोक पन्नाशीला आली तरी ट्रिप ठरली की लहान मुलांसारखे भांडतात. अहो प्रत्येकाच्या बुडाखाली गाडी अली तरी कोण काढणार याची चर्चा. आमच्या पोरांनी आम्हाला असे पहिले तर मला वाटते ओळख पण नाही दाखवणार. असो.  रात्री झोपायला थोडा उशिरच झाला. थोडी झाली पण होती. तरी ५ ला उठून पिंटू कडे पोचून आम्ही निघालो. बिडी नी त्याची गाडी काढल्याने आज समस्र मित्र परीवाला भरून आलेले मी माझा डोळ्यांनी पहिले. गहिवरून येते ना, तसेच काहीसे. 

विसापूर ला जायला आता रस्ता आहे.  पूर्वी मळवली स्टेशन वरून आम्ही भाजा ला जायचो आणि मग तिथून किल्ल्यावर. आता  घाट झाल्यामुळे गाडी लोहगड आणि विसापूर  मध्ये पर्यन्त जाते.  थोडक्यात भाजे आणि पाटण असे दोन मार्ग आहेत. आम्ही गायमुख खिंडीतून गडावर गेलो. धबधबा वाट म्हणायला हरकत नाही. 

विसापूर हा किल्ला एका नजरेत मावत नाही. गडाचा विस्तार अशक्य मोठा आहे. वर चढायला खडा चढ. ४० ते ४५ min मध्ये गडाच्या माथ्यावर पोचता येते. गडाच्या पायथ्याशी गाडी लावून आम्ही तिथे असलेल्या एका छोट्या हॉटेल मध्ये शिरले. आत एक काठमांडू नेपाळ चा नेपाळी होता. त्याला माणूस असे न म्हणता आपण सर्रास नेपलीच म्हणतो. त्याच्या हातचे उत्तम पोहे आणि मॅग्गी खाऊन तिथून निघालो. आजूबाजूला रिसॉर्ट्स तत्सम बरेच काही झाले आहे. गर्दी पण छान वाढली आहे. गडाच्या दिशेनं आम्ही निघालो. अगदी पायथ्याशी एक छोटेसे हॉटेल आहे. त्यांच्या कडे उत्तम सोय आहे. खाली नाव व फोन नंबर आहेत फोटो मध्ये. तिथून मळलेल्या वाटेनी आम्ही वर चढायला सुरुवात केली. सर्वत्र हिरवेगार होते. घनदाट जंगलातून ही वाट एका धबधबा मार्गाशी संपते. जंगातून जातांना माकडांचे आवाज आणि इतर पक्षांची आरडा ओरड जणू काही कोणी शत्रू आले आहेत, अशा तारेने चालू होती. हे संगीत ऐकत ऐकत आम्ही पहिल्या टाक्याशी पोचलो. 

तिथून खडा चढ आहे. दगडांची वाट आहे जी माथ्यावर जाऊन पोचते. वर पोचल्यावर कळते की काही शे acres चा हा किल्ला आहे. थोडे थांबून पाणी पिऊन आम्ही किल्ला बघायला सुरु केले. भूषण फोटो काढण्यात मग्न होता. पिंटू त्याचा त्याचा चालत होता. एकाच दिशेने आम्ही वेगवेगळे चालत हरवलो होतो. गार वारा आणि कडक ऊन याच्या मध्ये आम्ही निवांत भटकत होतो. 

पहिल्या बुरुजावर जाऊन आम्ही आमची प्रदक्षिणा चालू केली. अनेक टाके, अनेक बुरुज, मारुती, तटबंदी, मोडके वाडे, पडलेल्या वास्तू आणि एक महादेवाचे मंदिर - बघायला ३ तास हुन अधिक गेले असतील. इतिहासात हरवून गेलो आम्ही. गोल चक्कर मारून मंदिराच्या मागे क्षण भर विश्रांती साठी बसलो. तिथे बसलो असतांना एक गावकरी आमच्या पाशी आला. साधारण ५'५" उंची, ढगाळ कपडे, एक बरणी आणि गळ्यात GPAY चा कोड हारासारखा घालून, म्हणाला मस्त लस्सी देतो. घरची आहे. मी त्याला म्हणालो भाऊ लस्सी नाकी, असेल तर ताक द्या. आलोच म्हणाला. तिथून पळ काढता काढता मला विचारले, आहेत ना इथेच. नाही, लस्सी वर लक्ष ठेवा ताक घेऊन आलोच. त्याला माझे नाव श्रीरंग आहे हे माहित नव्हते. :-) धावत जाऊन सुमारे १० मिनिटांनी तो परत एक बरणी घेऊन आला. आम्ही तिघांनी मनसोक्त ताक पियाले. तहान भागवून उरलेला किल्ला  बघायला निघालो. दुसरी वाट म्हणजे पाहिर्यांची वाट. तिथे खाली उतरून मारुतीचे दर्शन घेतले. आत साधारण ५० लोक सहज राहू शकतील अशा गुहा दिसल्या. त्याचे कौतुक करून आम्ही परत गडमाथा गाठला. आता मात्र उन्हाचा तडाखा जाणवत होता. ज्या वाटेनी वर आलो तीच वाट शोधत आम्ही परत खाली उतरायला सुरु केले. वाटेत बरीच लहान मोठी पोरं आमच्या आजूबाजूला होती. आमच्या गप्पा ऐकून त्यातील एक पोर विचकले - 'मोठे झालो की आपण पण अशेच बोलणार की काय' त्याच्या बरोबर चे engineering  ला असलेले बाकी मित्र हसले. अजून पण काही बोलले पण ते मी इथे नाही लिहू शकणार. त्याला म्हणालो बेट्या आमच्या वयाचे झालात की इथेपर्यन्त पोचा म्हणजे झाले. बडबड काही का कराल. हीच पोरं आणि पिंटू यांचा एक खाली उतरतांना किस्सा झाला. 

धबधबा वाट संपली आणि परत आम्ही जंगलात शिरलो. पोरं पुढे गेली होती. आम्ही खाली उतरत असतांना ती परत पळत वर येतांना दिसली. म्हणाली की तीन मोठे हुप्पे आहेत आणि ते आम्हाला खाली काही जाऊ देत नाहीत. मी पुढे गेलो आणि काठी वाजवत माकडा पाशी थबकलो. खरंच मोठी होती आणि भीतीदायक. पिंटू आणि बिडी ला म्हणालो की जवळ राहा आणि घोळक्याने पुढे चला. मी बजरंगबली चे नाव घेतले आणि पाठ दाखवून हळू हळू पुढे गेलो. तेव्हड्यात मागच्या एका मुलावर हुप्प्याची उडी मारली आणि बॅग घेण्याचा प्रयत्न केला. गडबड उडाली आणि एकत्र असलेली सर्व पांगलो. आम्ही पुढे गेलो आणि पिंटू मात्र मागे राहिले. मला आणि बिडी ला याचा अंदाज आला नाही. खाली पोचलो आणि सरबत पितो तर पिंटू चा फोन आला की वर या मला माकडांनी घेरले आहे. धावत परत वर गेलो तेव्हा एका कोपऱ्यात पिंटू, डावीकडे एक आणि उजवीकडे एक माकड आणि तिसरे त्याच्या सॅक मध्ये काय काय आहे याची तपासणी करत काही मिलत आहे का बघत होते. आम्हाला पाहून मात्र त्यांनी पळ काढला आणि पिंटू बचावला. त्याला घेऊन आम्ही खाली उतरलो. हे सर्व चालू असतांना उरलेले engineering पोरं घाबरून जंगलात पसार झाली होती. काहीशा वेळानी परतले. 

सरबत पिऊन आम्ही परत गाडी पाशी आलो. ट्रेक छान झाला. हा किल्ला इतका अशक्यच मोठा आहे, की नीट पाहायचाच असेल तर एक दिवस पण कमी पडेल. किल्ल्यावर बरीच वस्ती असेल असा अंदाज आहे. 

इतिहास 

विसापूर किल्ल्याबाबत एतिहासिक कागदपत्रांमध्ये पुढिल माहिती मिळते,
मराठे १६८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहोचला. तेथे झालेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले , तो पाठलाग करत तेथे पोहोचेपर्यंत मराठे कुसापुर गावाजवळ पोहोचले. १६८२ मध्ये मराठ्यांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता.
४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले. http://trekshitiz.com/marathi/Visapur-Trek-V-Alpha.html



































सुवर्णदुर्ग - कनकदुर्ग - स्वर्गीय

सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग - स्वर्गीय  साधारण २००७ ची गोष्ट असेल. पुरंदरे काकू एका ट्रिप ला जाऊन आल्या. आल्यावर भेट झाली तेव्हा त्यांनी त्या जागे...