Tuesday, 21 May 2019

११ मारुती - एक आठवण

११ मारुती - जय जय रघुवीर समर्थ 
गड किल्ले हिंडणे जसे चालू होते त्याच बरोबर महाराष्र्टातील त्या काळात आणि राष्ट्रस्थापने  साठी बांधलेल्या काही वास्तू, मंदिरं हिंडण्याचे पण आम्ही ठरवले. मंदिरात नुसता देव नसून त्याला एक इतिहास आहे हे तिथे गेलो की कळते. ह्या सर्व वास्तू काही ना काही विशिष्ठ कारणांसाठी बांधल्या होत्या. तिथल्या जागेचे पण काही तरी महत्व होते. Strategic  locations असे म्हणा. त्यात व्यापार, कारभार, सौरक्षण व इतर बऱ्याच गोष्टीचा विचार झाला असावा. असाच एक प्रवास म्हणजे ११ मारुती. रामदास स्वामींनी स्थापन केलेले हे ११ मारुती. तरुण पिढी मध्ये व्यायामाचे महत्व समजून देण्यासाठी याची स्थापना केली.  तरुण बलवान असेल तर राष्ट्र सौरक्षणाला त्याचा फायदा होईल हे मनात. हे सर्व मारुती सातारा कराड आणि कोल्हापूर परिसरात उभे आहेत. आता थोडीशी आमची गोष्ट. 
बंटी पाटील हा आमच्यातील एक पहेलवान. धष्ट पुष्ठ व्यायाम करणारा आणि सर्वांना हसवणारा हा एक कलाकार म्हणा. त्यांनी अचानक फोन केला व विचारणा केली की रविवारी जायचे आहे तर येशील का. हिंडायला आपण एका  पायावर तयार असतो. आणि खरं सांगायचे तर पप्या व त्याच्या दुसऱ्या ग्रुप कडून ११ मारुतीचे खूप कौतुक ऐकले आहे. म्हणून जायचे होतेच. बंडोपंत, सूर्यनमस्कार आणि जोर, देव आणि देवींचे भक्त, आपले वाहन घेऊन सज्ज झाले होते. बाकी मी पप्या निरंजन तुळपुळे उर्फ अधिकारी व अरविंद असे गाडीत बसून ६.३० ला सकाळी निघालो. जाताना असे ठरले की आधी डावीकडचे मारुती करायचे मग u turn मारून उजवीकडचे करून चाफळ ला आपली मारुती यात्रा संपवायची. धम्माल चालू झाली आणि किस्से बाहेर यायला लागले. ऊन खूप होते. बंटी मागे बसून लोकांना अशक्य हसवत होता. वर्षभराचे हसणे मला वाटते त्याच १२ तासात संपवले असेल. या काही मित्रांची काही वैशिष्ठे या अशा प्रवासातून कळून येतात. त्याचेच पुढे किस्से होतात आणि त्याच त्या कथेवरून हसणे होते. मग केलेल्या प्रवासातील किस्से असो, घराचे असो व दारुचे. sorry दारचे. काय ते इथे लिहू नाही शकणार. असो. तर आम्ही सर्व बजरंगबली भक्त या प्रवासाला निघालो. उंब्रज पासून दर्शन चालू केले. तिथून मसूर आणि मग शहापूर. बाहे मारुती करून u turn मारला आणि वाठार ला आलो. तिथे मनपाडळे आणि पारगाव च्या मारुती चे दर्शन घेतले. येतांना बत्तिसशिराळा करून चाफळ ला पोचलो. आधी शिंगणवाडी आणि माजगाव च्या मारुतीचे दर्शन घेऊन चाफळ च्या सुंदर राम मंदिरात पोचलो. दास मारुती आणि वीर मारुतीचे दर्शन घेऊन संध्याकाळी ६ च्या सुमारास ११ मारुती पूर्ण झाले. 

स्वामींनी साताऱ्या जवळील जरंडेश्वर इथल्या हनुमंताचे दर्शन घेऊन आपले कार्य सुरू केले. जरंडेश्वरच्या मारुतीरायासमोर उभे राहिल्यावर त्यांना एकदम स्फुरले. 
रामदूत वायुसूत भीमगर्भ जुत्पती, जो नरात वानरात भक्तीप्रेम वित्पती, दास दक्ष स्वामिपक्ष निजकाज सारथी वीरजोर शीरजोर धक्कधिंग मारुती।।
आज काळ च्या gym and fitness center च्या जगात असा प्रवास घडला की आपले मूळ कुठे हे लक्षात येते. पूर्वी Law College चे असुदे अथवा शिवाजी मंदिर, व्यायामशाळेत मारुती नाही ही कल्पनाच नव्हती, आणि तसे नसायचेच. मला आठवते अजून पण, दर शनिवारी law college gym मध्ये नारळ आणि साखर प्रसाद असायचा आणि मग टेकडी वर पळत जाऊन त्या मारुतीचे दर्शन घेऊन यायचे. या देवाचे प्रेमच काही वेगळे आहे. व्यायाम हा आपल्या दिनक्रमेचा एक भाग हे बाबांनी लहानपणी पासून शिकवल्यामुळे आज पण एक दिवस सुद्धा व्यायाम बुडत नाही. आता माझ्या कडे बघून असे वाटत नसेल हे खरे आहे. व्यायाम हा देव आहे आणि त्याचे पूजन केले पाहिजे हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे हे आज काल च्या पिढीला कितपत माहित आहे मला कळत नाही. रात्र रात्र बोंबलत हिंडणारे आम्ही संध्याकाळी मात्र व्यायामात ओले चिंब झालेलो असायचो. दिवस बदलत चालले आहेत आणि तालमीत जाणे लोकांचे कमी झाले आहे. diet plans वर भर जास्त आहे. आज दीक्षित तर उद्या atkins, मग GM नावाचे काही तरी येते आणि नंतर परत इतर काही तरी. जे खातो तेच विष आहे तर त्यात अजून diet करून काय मिळणार आहे मला कळत नाही. असो. उगाच लोकांच्या भावना दुखावतील. जाता येता च्या गप्पांमध्ये election results  हा एक विषय चाटून गेलाच. पण त्यावर जास्त वाद विवाद झाले नाही कारण भांडायला कोणी नव्हतं. अरविंद फार काही बोलत नाही. फक्त हसतो आणि त्यावेळी त्याचे डोळे नाहीसे होतात. ते पाहून बाकी लोकांना हसायला येत. तो निवांत माणूस आहे. बंड्या चे विषयच वेगळे आहेत त्यात बाकी लोकांना फारसे कळत नाही. म्हणजे अशी माझी कल्पना आहे असे म्हणा. त्याच्या सुरस कथा ऐकायच्या आणि मजा घ्यायची. गप्पा आणि गाणी या मध्ये १२ तास झालेला प्रवास कसा गेला आणि कधी ते काही कळले नाही. ऊन खूप होते. शेवटचे चार मारुती हे चाफळ जवळ आहेत. चाफळ चे राम मंदिर हे बघण्यासारखे आहे. सुंदर आणि स्वछ. राम सीता आणि लक्षुमण - सुंदर उभे आहेत. मन प्रसन्न होतं त्यांच्या कडे बघून.
सूर्यास्त जवळ येऊ लागला तसा  हवेत थोडा गारवा जाणवायला लागला. छोट्या टेकडीवर खडीचा मारुती आहे, शिंगणवाडीला, तिथे पोचलो. प्रवास संपायला आला होता. पुढे काय करायचे त्याचे planning चालू झाले होते. येतांना सातारा गाठायचा आणि Lake View नावाच्या हॉटेल मध्ये जेवायचे ठरले. आपले नेहमीचेच हॉटेल. उत्तम जेवण. पोटोबा केला आणि परत गाडीत बसलो. मला वाटते ५०० - ५५० कि मी प्रवास नक्कीच झाला असेल. घरी पोचायला १२. ३० वाजले. ११ मारुती, बजरंगबलीच्या कृपेने नीट, निर्विग्न पार पडले.























































Monday, 22 April 2019

पांडवगड - उन्हाळ्याच्या सुट्टीतला



पांडवगड
सातारा जिल्ह्यातील वाई जवळपास अनेक किल्ले उभे आहेत. त्यात वैराटगड, केंजळगड, कमळगड, रायरेश्वर पठार आणि पांडवगड एकमेकांकडे पाहत धोम धरणाच्या काठाशी सापडतील. अर्थात वैराटगड जरा पुढे आहे. मागच्या वेळी हनुमान जयंतीला चंद्रोदय कुर्डुगडामागुन झालेला आम्ही सर्वांनी पहिला होता. जणू शंकराच्या पिंडीमागून गंगा. ती मंतरलेली  रात्र आम्ही सर्व मित्रांनी एकत्र अनुभवली होती. या वर्षी पांडवगड चा योग आला आणि मी पप्या BD Chetan आणि पिंटू THAR  मधून दुपारचे निघालो. ऊन रणरणतं होते हे सांगायला नको. पण मला आनंद की ट्रेकिंग परत चालू झाले. बराच मोठा break होता तसे म्हणायला गेलो तर. 
वाई हुन गणपती मंदिर डावीकडे ठेऊन धोम धरणा कडे रस्ता जातो. तो रस्ता पुढे केंजळ रायरेश्वर ला जातो. वाई हुन साधारण ८ ते १० कि मी वर उजवीकडे मेणवली नावाच्या गावाचा रस्ता जातो. हेच ते पायथ्याचे गाव. गुंडेवाडी नावाचे दुसरे गाव आहे पलीकडच्या बाजूला आणि तिथून पण किल्ल्यावर जाता येते. THAR घेऊन पोचलो आणि एक सुंदर, खूप मोठं आणि सळसळणारं, लांब पारंब्यांचे झाड शोधले आणि गाडी तिथे लावून टाकली. 

भरपूर पाणी होतं त्यामुळे तशी काही काळजी नव्हती. मागच्या वेळी मी आणि पप्या माणिकगड केला तेव्हा शिकलो होतो चांगलाच धडा. मळलेली वाट आहे. किल्ला डावीकडे ठेऊन सरळ चालत राहा. तुम्हाला लांबवरून काही भगव्या खुणा दिसतील . रस्ता तोच घ्या. सोंडेवर वगरे जाऊ नका उगाच दमछाक होते. सरळ लांब वर तुम्हाला एक खिंड दिसेल आणि तिथे एक मंदिर. मंदिराच्या मागून मळलेली वाट आहे जी थेट तुम्हाला गडावर नेते. 

मेटावर पोचायला आम्हाला तास भर गेला. खूप ऊन होतं आणि आम्ही थांबत थांबत जात होतो. गड मोठा आहे आणि चढायला बराच आहे. मेटावर पोचलो तेव्हा ४ वाजले होते. तिथे काही वस्ती आहे, एक विहीर आहे आणि एक मंदिर आहे. भैरोबाचे. तिथून किल्ल्यावर पोचायला ३० मी लागतात. 



किल्ल्यावर पोचलात की एक पडके प्रवेशद्वार आहे. तिथून माचीवर प्रवेश होतो. गोल चक्कर मारून बालेकिल्ल्यावर जाण्याचा रस्ता आहे.  डावीकडे सुंदर मारुती मंदिर आहे. मंदिरासमोर चुन्याचे घाणे आहे. पप्या आणि पिंटू नी काही निष्फळ प्रयत्न केले चक्र फिरवायचे. मंदिरात निवांत बसलो. ५. ३० ला काही झालं तरी उतरायचे असे ठरले त्यामुळे घाई घाईनी उरलेला किल्ला बघायला सुरु केला. 






Two Ps


बजरंगबली च्या मंदिरात निवांत एक क्षण 

बालेकिल्ल्यावर बरेच काही अवशेष पहिला मिळतील. पांडजाई देवीचे एक पडके मंदिर आहे. त्यामागे शंकराचे पडलेले मंदिर आहे. काही मुर्त्या इथे आढळतील. थोडे पुढे एक पाण्याचे टाके आहे. सुकलेले आहे. बालेकिल्ल्यावर येताना खाली खूप सुंदर टाक्या आहेत. ७ ते ८ टाक्या आहेत. तिथे पुढे तो प्रसिद्ध पारशाचा बंगला आहे. बरेच काही ऐकले होते या किल्ल्या बद्दल. परवानगी  लागते,तो येऊ देत नाही, कुत्री सोडतो वगरे वगरे .... असे काहीच नाही. किल्ल्यावर आम्ही सोडून कोणीच नव्हते मात्र. शांत निवांत वाटत होते. 














इतिहास 
चालुक्र्‍यांच्या राज्र्‍यांनतर शिलाहारांनी पन्हाळा - कोल्हापूर दख्खन या भागावर राज्य चालविले. १९९१ - १९९२ मध्ये सापडलेल्या ताम्रलेखानुसार शिलाहार राजा दुसरा भोज याने हा किल्ला बांधला, असे पुरावे आढळतात. हा किल्ला प्रथम आदीलशाहीत होता. ७ ऑक्टोंबर १६७३ मध्ये मराठ्यांनी तो जिंकला. पुढे १७०१ औरंगजेबाने हा किल्ला घेतला. त्यानंतर शाहु महाराजांनी किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला इ.स १८१८ मध्ये इगजांनी पांडवगड आपल्या ताब्यात आणला. ref - trekshitiz

ट्रेक छान झाला. उन्हाचा तसा फार त्रास कोणाला झाला नाही. तिथून निघून मांढरदेवी घाटातून भोर ला पोचलो. निवडणूका  जवळ आल्या होत्या त्यामुळे विषय चालूच होते. इकडून तिकडून विविध चर्चा आणि हसणे हसवणे चालू होते. खूप महिन्यांनी मी परत जागेवर आल्याचे जाणवले, मलाच. मानसिक शांतता असली की कोणाचे बोलणे टोचत नाही. कालच पौर्णिमा झाली होती त्यामुळे चंद्रोदय झाला तेव्हा सर्व जण त्या तांबूस गोऱ्या दिसणाऱ्या चंद्राकडे बघून खुश झालो. पुढच्या ट्रेक ची चर्चा चालू होईलच. जय बजरंगबली. 
फोटो contribution - चेतन, पिंटू आणि मी. 













सुवर्णदुर्ग - कनकदुर्ग - स्वर्गीय

सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग - स्वर्गीय  साधारण २००७ ची गोष्ट असेल. पुरंदरे काकू एका ट्रिप ला जाऊन आल्या. आल्यावर भेट झाली तेव्हा त्यांनी त्या जागे...