Monday, 26 March 2018

हडसर

हडसर  - 17/03/2018

Me, Pintu, BD ani Upya

First of all, let me tell you that if you have not been to Hadsar, GO NOW. Super किल्ला. आणि खूप काही बघण्या  सारखे आहे. जीवधन, नाणेघाट,  शिवनेरी, हडसर, निमगिरी, हनुमंतगड हे सर्व किल्ले जुन्नर भागात नटून थटून उभे  आहेत. नारायणगाव हुन डावीकडे वळलात की जुन्नर कडे रस्ता जातो.  On the same road you will find Shivneri on your left. तिथून पुढे गेलात की  डावीकडून नाणेघाटाच्या दिशेनी रस्ता जातो. Follow the road which will take you Hadsar. There are two different routes to Hadsar. You have to go to Hadsar village and start climbing. This one will take you to the rock patch which you can climb. खुंट्या आहेत which makes it easier to climb. पण climbing ची नक्कीच थोडी तयारी हवी. तिथून वर गेल्यावर तुम्ही गडाच्या मागच्या बाजूस पोचता. दुसरी वाट हडसर गावाहून थोडी पुढे गेल्यावर आहे.   त्यावाटेनी वर जाणं खूपच सोपं आहे you will reach the top in about 40 min. शेवटच्या साधारण २०० पाहिऱ्या आहेत. दगडातून कोरलेल्या या सुंदर पाहिऱ्या आहेत. जसं जसं वर पोचतो तसं तसं कळतं की हा किल्ला अजब आहे. प्रमुख दरवाज्या पासूनच या किल्ल्याच्या प्रेमात पडाल.  This fort surely will prove that the 'fort architecture' is some subject that was at its best during those days, no doubt. The steps are carved in stone and a beautiful site to watch.
इथून आत आल्यावर दोन टेकड्या दिसतात. डावीकडे जाणारी वाट अजून एक दरवाज्यातून किल्ल्याच्या वरच्या भागात नेते. उजवीकडे जाणारी वाट किल्ल्याच्या उजवीकडील टेकडीवर नेते. तिथेच एक चुन्याचा घाणा आहे.  वर एक बाप्पाचे मंदिर आहे. तिथूनच पुढे काही पाण्याच्या टाक्या आहेत, आणि बघण्यासारखे खूप काही आहे.  इथे मी सर्व काही  लिहिणार नाही. एक तर मी काही  लेखक नाही आणि दोन काहीही आणि कितीही छान लिहिले तरी तिथलं वर्णन करणं शक्य नाही. जस सूर्योदयाचं  आणि सूर्यास्ताचं  वर्णन करणं अशक्य आहे. डावीकडील बाजूस वर जात असता काही परत पाहिऱ्या लागतात. आता याचे काम ज्यांनी केला आहे, व design  engineering ज्याचं  आहे त्याचे पाय धून पिऊ. हे असं काही नसतंच. ..... . Its just super amazing to see civil engineering, architecture, mechanical engg and most importantly logic at its best. Looking at this, I wonder how some people in this time and age build wrong structures. Cannot compare. Once you climb the steps and go to the left hand side of the fort, there is altogether a different World that greets you. खूप मोठं  टाकं आहे, तलाव म्हणाल तरी चालेल. त्याच्या मागे  मंदिर आहे. तिथे एक बाबाजी राहतात. एकटेच. नामस्मरण करतात म्हणे. देवालाच माहिती काय मिळतं हे करून. इथून एक रस्ता देवळाच्या मागच्या बाजूनी, किल्ल्याच्या मागच्या बाजूस जातो. ती खुंटीची वाट तिथून वर येते.  .... मारुतीची एक छान मूर्ती आहे तिथे आणि इतर बरेच काही बघण्याजोगे आहे. मंदिराच्या उजवीकडून गेले असता काही अंतरावर लेण्या आहेत.  एकाच दगडातून कोरलेल्या आहेत. What might be the instruments to know that this rock is solid all the way and one can actually carve in to make a cave which can be used for multiple activities. This is marvelous and you have to actually experience the moment being in this space. Hadsar is an experience, its a collection of moments that you have to cherish. Hadsar has jumped up in the top 10 forts in my list.
Upya Me Bd ani Pintu all enjoyed the experience. We missed Chaddi Deshmukh on this trek. When we reached Pune, he was waiting to pounce on us for not going to some other fort than Hadsar :-). We told him that we are always ready to go back there again.

Hadsar will be remembered and I will be going back again, this time will climb the rock patch.

इतिहास : ref trekshitiz
हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड. सातवाहनकालात या गडाची निर्मिती झाली असून, या काळात गडावर मोठ्या प्रमाणावर राबता होता. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला. १६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो. यानंतर १८१८ च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले. हडसर किल्ल्याच्या वाटा ब्रिटिशांनी सुरुंग लावून फोडल्या.















































No comments:

Post a Comment

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...