Thursday, 9 August 2018

मृगगड

मृगगड

श्रावण जवळ आल्याची चाहूल लागली. पावसाच्या सरींनी आणि वातावरणातल्या बदलांनी या ट्रेक ची मजा काही वेगळीच होती. लोणावळा खंडाळा परिसरात जिथे या वेळी तुडुंब गर्दी असते, त्याच वेळी त्याच परिसरात असलेल्या या मृगगडावर मात्र फक्त आमचीच गर्दी होती. Tiger  Valley  परिसरात हा एक  लपलेला किल्ला. मी उपेंद्र आणि चेतन जरा निवांतच निघालो. अभंगवाणी आणि त्यानंतर J  Krishnamurthy lectures ऐकत ऐकत १० - १५ km रस्ता चुकलो. खोपोली हुन पाली कडे जाणाऱ्या रस्त्यावर जांभुळपाडा नावाचे गाव आहे, तिथूनच रस्ता पुढे भेलीव नावाच्या गावी जातो. हेच ते पायथ्याचे गाव. गावातल्या शाळेपाशी गाडी लावून तिथल्या एक गावकऱ्याला घेऊन आम्ही किल्ल्यावर जायला निघालो. वाटाड्या नक्की  हवा. इथे जंगल आहे आणि हरवायला होते.

किल्ला वर जाई पर्यन्त तसा सोपा आहे. पण शेवटचा टप्पा कठीण आहे आणि काळजी घ्यावी. वजनदार माणसांनी तर नक्कीच. माझ्या  सारख्या.
पावसाळ्यात ट्रेकिंग म्हणजे जितकी मजा असते तितकीच काळजी घेणे खूप गरजेचे आहे. खूप घसरडे असते आणि नक्की आपटण्याचा  धोका असतो. एकदा तरी पृष्ठभाग शेकून निघतो. इथे risk  जास्त आहे कारण पडले तर वर जायची शक्यता नाकारता येणार नाही. आमच्याबरोबर दळवी म्हणून गृहस्त आले होते,  सांगत होते की मागील आठवड्यात एकाचे डोके फुटले. असो . काळजी घ्या.
भेलीव नावाचे हे एक छान गाव आहे. ५० तरी घरे असतील. तिथल्या शाळेत आजूबाजूकडचे सर्व धरून ६० विद्यार्थी आहेत. Typical  Indian  Village. ३ बाजूला डोंगर रांगा आणि मध्ये हे गाव. तिथे बसलो चहा पीत तेव्हा घरातल्या स्त्रिया व मुलं काही ना काही काम करत होत्या. कपडे, भांडी घासणे, लहान मुलांना जेवण देणे ..... हे सर्व चालू असतांना एकमेकांशी गप्पा चालू होत्या...असा वाटत होतं की हे सर्व एक मोठे कुटुंब आहे. खूप छान वाटलं. पुण्यात दुकानात चटणी मागितली की आधी हाथ पुढे करतात. पैसे द्या म्हणून. हा संधर्भ जरा जुना आहे. लक्षुमी रस्तावर एक जनसेवा नावाचे खूप जुने दुकान होते. अर्थात तिथे जे काही खाणे मिळायचे ते उत्तम चवीचे होते. पण तिथले वेटर आणि मालक महा मझुर्डे. तेव्हाच एकदा तिथे सामोसा का काही तरी खायला गेलो असतांना चटणी चा विषय झाला. अर्थात निघतांना पुणेरी भाषेत अपमान करून निघालो. काही वर्षात दुकान बंद पडले हे ऐकण्यात आले. असो. तर त्या गावात चहा पितांना धपाटे खात होतो तर त्या काकूंनी आपणहून लसूण चटणी आणून दिली. 'माणुसकीचे औंश आज कुठ टिकून असतील, तर ते खेडयांत...(पु ल). पण इथे कोणी सुबक ठेंगणी दिसली नाही. ' :-) :-). सांगायचे तात्पर्य म्हणजे हे गाव सुंदर होते. वीज अली होती, पण नव्हती ते सांगायला  नको. पण एक कळले की इथे अपघात झाला तर काही वैद्यकीय सेवा नाही. अशा वेळी काय करायचं. आपण एक पाहुणे, पण इथे राहणाऱ्या लोकांनी काय करायचं. आमच्या मनात एक विचार येऊन गेला की आपण या बद्दल काही तरी करावे. एक Medical  Kit  असावे. तिथे ठेवावे आणि दर काही दिवसानी refill  करावे. नुसते तिथे नाही तर किल्ल्यांवर सुद्धा काही एक जागा असावी जिथे हे kit  ठेवले जाऊ शकेल. साधे पण उपयोगी. अर्थात चोरी होऊन सुद्धा, त्याचा औषध / उपचार या शिवाय काहीही उपयोग नसल्याने त्यांनी पण कुणाला तरी फायदाच होणार आहे. जर तुमच्या पैकी कोणी या संधर्बात काही माहिती, सल्ला देऊ इच्छितो तर नक्की द्यावा.
गडावर गेल्यावर भवानी मातेच्या बहिणीचे मंदिर आहे. हे पहिल्यांदाच पहिला.

ट्रेक खूप छान झाला. बाप्पा मोरया.









भवानी मातेची बहीण 




जोड  गोळी. 











Wednesday, 1 August 2018

मानगड - आणि बरेच काही 01/08/18

मानगड

मागच्या आठवड्यात खंड पडला. ट्रेक काही होऊ शकला नाही. बाबांना हृदयविकाराचा त्रास झाला आणि त्यामुळे त्यांना ICU मध्ये ठेवण्यात आले होते. 
माझ्या घरातले नेहमी मला म्हणतात की तुझी first  priority  तुझे मित्र / काम आहे, मग हिंडणे आणि नंतर वेळ झाला तर आम्ही. आता त्यात तथ्य आहे का नाही हे मला माहित नाही. पण इतकच की ज्या वेळी जे करायचे ते त्यावेळी केले की झालं. आता हे का सांगत आहे ती बडबड ऐका. बुधवार होता आणि नेहमी सारखे संध्याकाळी हुंदडायला निघालो. बुधवार कानडे चा वार म्हणून प्रसिद्ध आहे. CarOBar  करत करत गाणी ऐकत मैफिल रंगत होती. रानजाई नावाच्या ठिकाणी मटण भाकरी खायला पोचलो तोच चेरी चा फोन आला की घरी पोच . बाबांना जोशी हॉस्पिटल मध्ये न्यायचे आहे. मला जरा गंभीर वाटलं त्यामुळे तिथून निघताच मी राहुल ला फोन केले. हा माझा सर्वात लाडका भाऊ आहे. मित्र आहे. थोडा येडा आहे पण तसे आम्ही सर्वच आहोत. त्यानी बाबांना लगेच - म्हणजे वेळेवर म्हणा जोशी हॉस्पिटल मध्ये नेले. तोवर आम्ही सर्व पोचलोच तिथे. उपचार चालू करून त्यांना ICU  मध्ये हलवलं. नव्हती त्यांची परिस्थिती चांगली त्यामुळे मी जरा गडबडून गेलो होतो. खाली औषधं आणायला आलो तर गाडीत होते ते ३, आणि इतर ५ असे ८ मित्र खाली जमले होते. गौतम अवधूत स्वानंद माझे भाऊ जमले होते. त्यांना बघून मात्र मला खूप धीर आला. त्याच वेळी मी गीता ला फोन केला आणि म्हणालो की  तू आलीस तर बरं होईल. ती पण nz हुन लगेच निघाली.  रात्री ११. ३० च्या सुमारास तिथे ही सर्व गर्दी जमली होती. कोणी काय काय केले हे मी लिहिणार नाही. पण वेळ निभावून नेली हे खरं. त्या दिवशी पासून, ते बाबा ICU  मधून बाहेर येई पर्यन्त हे सर्व मित्र संध्याकाळी ६ पासून ते दुसऱ्या दिवशी ५ वाजे पर्यन्त तिथे एकमेकांची हसत खेळत करमणूक करत माझ्या  पाठीशी उभे होते. मित्रांना काहीच नसतं. ते असतात - संपला विषय. अर्थात तसे मित्र मिळवायला भाग्य लागतं आणि तुम्ही पण तसेच असावे लागता. त्या लायकीचे. ज्यांना मित्र नाहीत ते माझ्या दृष्टींनी खरंच गरीब आहेत. या सर्व मध्ये आई आणि चेरी मात्र खंबीर होत्या. असो. बाबा घरी आले आणि आमचे परत ट्रेकिंग चालू झाले. 
अवचित बिरवाडी मानगड, विश्रामगड / कुर्डूगड मानगड, असे बरेच वेळा झाले, पण सर्व झाले मानगड नाही. उप्या म्हणाला कोणी नाही तर मी आहे. मी जाणार मानगड ला. मानगड सर्वांना करायचा होता, मग काही लोकांना जमत नव्हतं आणि तरी आम्ही गेलो त्यामुळे वादविवाद सुरु झाले. पण मला त्याचे पण कौतुक आहे. माझ्या  शिवाय हा गड झालाच कसा मध्ये सुद्धा भारीपणा आहे. त्या गडाबद्दल म्हणा नाही तर मित्रांच्या बद्दल आणि हिंडायचे म्हणा, एक छुपे प्रेम आहे. अर्थात ते प्रेम फक्त शिव्या घालून आणि whatsaap  वर खूप त्रास झाला तर group  सोडून वगरे व्यक्त केले जाते आज काल. समोर येऊन फारशी भांडणं होत नाहीत. कारण मी म्हणालो  तसे ती प्रेमाची असतात. असो. त्यामुळे मी आणि उप्या वेळेवर निघालो आणि ताम्हिणी वाटे मानगड ला पोचलो. निजामपूर अलीकडे मस्जिदवाडी पाशी हा एक छोटासा किल्ला आहे. किल्ला बघून वाटलं की त्याच वेळी सहज झाला असता आणि ही भांडणं टळली असती. 

किल्ले मानगड 



विंझाई माता मंदिर 


अवशेष 


छान बुरुज 



प्रमुख दरवाजा. एक चोर दरवाजा पण आहे. नीट दिसला नाही आम्हाला. 



जय बजरंगबली 







पाण्याच्या टाक्या शेजारी एक छान गुहा आहे. तिथे २० जन सहज राहू शकतील. 


गड पायथ्याशी एक शंकराचे खूप जुने पडलेले मंदिर आहे. त्या काळात या मंदिराचे काही वेगळेच आणि भव्य रूप असेल याची जाणीव झाल्या शिवाय राहत नाही. 



मानगड झाला. आम्ही वेळेवर घरी पोचलो. ताम्हिणीतून जायचे होते आणि पाऊस पण खूप पडत होता. अन्या  गण्या पक्या ईज्या बंड्या जनता बनियान वर full  tight , टांगा पलटी घोडे फरार, दिसेल त्या पाण्यात घाण करत होती. पण आम्ही वाचलो, कारण traffic  jam  ची सुरुवात नुकतीच झाली होती. येतांना Paradise  मध्ये जेवलो आणि घराकडे परत निघालो. आज मन नाही लागलं गड किल्ला बघतांना. घराची ओढ, जी मला कधीच नसते ती आज मात्र त्रास देऊन जात होती. मृगगड करायचा plan  होता पण नको वाटलं. बाबाच्या आठवणी आल्या डोळ्या समोर आणि क्षण सरलेले स्पर्श करून गेले. आज त्यांना माझी गरज आहे, ही भावना नसून, मला त्यांची आहे आणि त्यामुळे मी परत गेलो. आज पण मी आई बाबांच्या घरी राहतो. ते माझ्या घरी नाही राहत. आज पण कधी तरी बाहेर जातांना मी त्यांच्या कडे पैसे मागतो. माझे ATM आहेत ते प्रेमाचे आणि अर्थात अर्थाचे पण :-).





























महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...