Tuesday, 3 April 2018

कुर्डूगड 31.03.18

कुर्डूगड / विश्रामगड

मी, भूषण , चेतन , उपेंद्र  आणि हृषीकेश

ऊन खूपच वाढत चाललं  होतं  आणि त्यामुळे पुढचे तीन महिने, रात्री नाही तरी  पहाटे ट्रेक करायचे ठरले. शनिवारी काम संपवून निघायचा प्लॅन केला होता. त्या दिवशी हनुमान जयंती होती आणि पौर्णिमा. त्यामुळे खूपच छान योग् आला होता. भूषण नेहमी प्रमणे ऐत्यावेळी उगवला. आला हेच खूप झाले. मग tents, carrymats आणि इतर सर्व जमवा जमव झाली. आधी हरिश्चंद्र चा  प्लॅन ठरला होता. पण सुट्ट्या होत्या आणि कळले होते की  तिथे आता बाजार झाला आहे. खूप गर्दी असते आणि वर गोलगप्पे वगरे विकायला लागले आहेत. म्हणजेच इतर जनता येऊन गर्दी करायला लागली आहे. मग तिथे जाऊन कॅम्पिंग करण्यात तसा  काही रस उरला नाही. सचिन जोशी नी मग एक किल्ला सांगितला आणि तो म्हणजे कुर्डूगड किंवा त्याला विश्रामगड असे पण नाव आहे. पुण्याहून जातांना ताम्हिणी घाट पूर्ण उतरून आपण निजामपूर च्या  दिशेनी जायला लागतो की  उजवीकडे  posco ही मोठी कंपनी जाते. त्याच रस्त्यावर पुढे जाऊन एक  पूल ओलांडला की  जिते नावाच्या  गावाची पाटी  लागते. तोच रस्ता पकडायचा आणि सरळ जायचे. ८ ते १० कि मी वर हा किल्ला आहे. दिसत काहीच नाही. गाडी गावात लावावी आणि मंदिरा  कडून, डावीकडे पुतळा ठेऊन रस्ता थेट गडावर जातो.



हा रस्ता समोरील डोंगरावर  वळण देऊन जातो. पुढे गेल्यावर परत काही घरं  दिसतात आणि तिथूनच रस्ता वर जातो. लक्षात ठेवा की विजेची line वर जाते तसाच रस्ता वर जातो. हा ट्रेक काही सोपा नाही. वर जायला किमान १. ५ तास लागतो  असे धरून चला. त्यात आमच्या  पाठीवर खूप सामान होतं  त्यामुळे आम्ही जरा हळूच चाललो होतो. ५ चा सुमारास आम्ही वर जायला सुरुवात केली. गप्पा टप्पा करत करत वेळ कसा जातो काही कळत नाही. तोच निसर्ग दर वेळी काही तरी वेगळं  सांगून जातो. वर जायचा रस्ता खूप steep आहे. सावकाश जावे. आता गड  किल्ले करत असतांना अजून एक  मौज आहे ती म्हणजे करवंदांची. या वेळी सुद्धा काही काळी मिळाली, पण तरी बरीच कच्ची होती. पण तरी सुद्धा शोधून खालली . मला वाटतं दोन आठवड्यात आम्हाला मस्त डोंगरची मैना मिळेल.
लांब वर जो मधला सुळका दिसत आहे तो हा किल्ला. तिथे जायचं आहे.
वर पोचलो तेव्हा ६.३० वाजले होते. बरोबर सूर्यास्त बघायला आम्ही वर पोचलो. हा तर अनुभव विलोभनीय असतो. खरं  तर अनेक पाहिले पण तरी दर वेळी त्यात काही तरी वेगळीच मजा असते. ते रंग काही वेगळेच असतात.

वर कुर्डुपेठ नावाची एक  छोटीशी वस्ती आहे. १० घरं  असतील. तिथे जाऊन रहिवाश्यांना सांगून थोडीशी मैत्री करून आम्ही tents टाकायला जागा केली. पाण्याची तशी काहीच सोय नाही. त्यामुळे जरा गडबड होईल असे वाटत होते. आम्ही बरेच पाणी आणले होते पण किती पुरेल  आणि किती नाही याचा काही अंदाज नव्हता. तिथेच एक  पाण्याची टाकी आहे आणि गडावर पाणी आहे. तिथून एक  pipe टाकला आहे. पण तो वणव्यात जळाला  आहे. या गावातून १५ min  मध्ये गड माथा आहे. 

इथून पुढचा जो काही अनुभव आहे तो फारच अभूतपूर्व  आहे. बाबु नावाचा एक गावकरी आम्हाला भेटला आणि त्यांनी एक  पाण्याची कळाशी आणून दिली. या छोट्याशा गावा मध्ये जसे पूर्वीचे दगड दिसतात तशीच हरवलेली आणि आपल्याला न माहित असलेली माणुसकी नावाची गोष्ट पण मिळते. आम्ही सर्व मित्र त्या जादुई दुनियेत गप्पा मारत हरवून गेलो होतो. पुऱ्या खाणं झालं. सर्व गडाकडे बघत पडलो होते. आणि थोड्या वेळात त्या शंभो सारख्या दिसणाऱ्या अफाट मोठया पाषाणा मागून गंगे चा उगम झाल्याचं भासलं. 


मंतरलेली रात्र होती. खूप शांत वाटतं. मनात पण कसला कल्लोळ नाही अशी वेळ खूप कमी असते. आणि त्याचा अनुभव खूप छान  सर्वांना आला. दुपारी ४० degree असलेल्या जागी रात्री थंडी पडली होती. मग ढगांनी थोडासा चमत्कार करून दाखवला. आम्ही सर्व तो खेळ मनापासून बघत होतो. थोड्यावेळानी परत भूक लागली आणि मग maggie करायचे ठरले. चूल पेटवली आणि छान  मॅगी  खाऊन आमचा दिवस संपला.
दुसऱ्या दिवशी सकाळी ५ ला उठून आम्ही पॅकिंग केले. आवरा आवर  झाली आणि गडावर जाऊन गड बघून निघायचं  ठरलं. गडाच्या  खाली एक  मंदिर आहे. आदल्या दिवशी रात्री त्याच मंदिरात पौर्णिमेची पूजा चालू होती आणि ध्वज  उडवण्याचा कार्यक्रम चालू होता. जपलेल्या काही गोष्टीं मध्ये प्रथा ही पण एक छान गोष्ट इथे पहिला मिळते. तर हे मंदिर आहे ते कुर्डाई देवी चे.  विशेष म्हणजे याच मंदिरात ४ इयत्ते पर्यन्त शाळा भरते. मास्तर दररोज गड  चढून वर  येतात आणि इथे मुलांना शिकवतात.


गडावर जायला निघालो आणि १० min  मध्ये वर पोचलो असू. गेल्या गेल्या एक सुंदर पाण्याचा टाकं आहे. तिथेच  गावातल्या माणसांनी आमच्या  पाण्याचा बाटल्या भरून दिल्या. त्या तिथेच ठेऊन आम्ही वर जायला निघालो.
रस्ता गडाचा डावीकडून वर जातो. तसा रस्ता सोपा आहे पण काळजी नक्कीच घ्यावी लागते. बरेच ठिकाणी दरडी कोसळून रस्ते block झाले आहेत. गडाच्या  डावीकडून रस्ता पाहिर्यांच्या  मार्गानी वर जातो. वर पोंचलो  की  डावी कडे  मारुतीची मूर्ती दिसेल. पायाखाली पनवती  ला चिरडले  आहे असे म्हणतात. अत्ता कळालं  ही पनवती कोण ते. इतकी  वर्ष, जिने छळलं ती सापडली आणि बजरंगबली नी मारली. त्यामुळे आता आयुष्यातून पानवती मेली.

हा रस्ता तसाच पुढे एक खूप मोठ्या गुहे कडे जातो. पु लं च्या  भाषेत "१००० - १५०० पान सहज उठेल". पण या किल्याचे  एक कळाले  की  तो पडत चालला आहे. जिथे तिथे  दगडं  पडत आहेत. गुहेत गेलो तरी तिथे दगडांचा सडा पडला आहे
गडाच्या  मागच्या  बाजूला एक  मस्त बुरुज दोन माजली आहे असे म्हणायला हरकत नाही. तिथून खूपच सुंदर पण अति भयंकर असे या पर्वत रांगेचे दर्शन घडते.



गडाच्या  दुसऱ्या बाजूला एक पाण्याची टाकी, काही अवशेष दिसतात आणि एक  खिडकी आहे. तिथे  चढायला rope ची गरज पडते त्यामुळे आम्ही काही जायचे धाडस केले नाही. पण या किल्ल्यावर आल्यावर खूप भारी वाटलं. इथे राहणारी माणसं, त्यांचे आयुष्य आणि त्यांचे विचार खूप लांब आहेत. आपल्या आकलनाच्या  पलीकडे आहेत असं  मला वाटलं. तिथून खाली आलो आणि एक सद्गृहास्तानी चहा दिला. तिथेच गप्पा टप्पा मारत बसलो आणि ८ चा सुमारास खाली उतरायला लागलो.



मी आणि चड्डी चेतन एकत्र खाली उतरलो. बाकी लोक मागून येत होती. नाही म्हणता म्हणता एक तास लागलाच  उतरायाला . खाली येत असतांना थोडासा रस्ता चुकलो आणि एक मंदिरापाशी पोहचलो. हे मंदिर कुठलं  हे पाहण्यासाठी आत गेलो तर जातांना खूप वीरगळी, शंकराच्या पिंडी आणि इतर अवशेष दिसले. न चुकता  हे मंदिर पहा. याचा उल्लेख कुठेही नाही त्यामुळे लगेच नाही कळत पण पायथा अला की  मंदिर शोधा . गावातच आहे. सुंदर झाला आमचा ट्रेक. अजून एक. दर वेळी आलो की जातांना काही तरी घेऊन जातो बरोबर. या वेळी एक अदभूत रात्र परत आठवण म्हणून नेत आहे.
















































1 comment:

  1. खूपच छान वर्णन.तुमचा हा किल्ले भ्रमंतीचा उपक्रम मस्त आहे.

    ReplyDelete

सुवर्णदुर्ग - कनकदुर्ग - स्वर्गीय

सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग - स्वर्गीय  साधारण २००७ ची गोष्ट असेल. पुरंदरे काकू एका ट्रिप ला जाऊन आल्या. आल्यावर भेट झाली तेव्हा त्यांनी त्या जागे...