सर्व प्रथम
गो ब्राम्हण प्रतिपालक, प्रौढप्रताप
पुरंदर,
क्षत्रिय
कुलावतंस्, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, महाराज,
छत्रपती शिवाजी महाराज की
जय..
काय लिहू आणि
काय नको असे
झाले आहे. शिवनेरी
ची पहिली भेट
शाळेत असतांना झाली.
इतिहास काय तर
महाराजांचा. घरी आजोबा
कुठल्या गोष्टी सांगत तर
आग्र्याहून सुटका आणि कसे
त्या अफझल खानाचा
वध केला. शाहिस्तेखानाची
कशी बोटे चिरली
आणि सिंहगडाला कसे
नाव पडले. महाराज
हे आपल्या सर्व
मराठी माणसाच्या घरात,
मनात आणि हृदयात
आहेत. जेव्हा पासून
हे गड किल्ले
परत करायला सुरु
केले आहे, तेव्हा
पासून इतिहासाची जवळीक
परत साधली गेली
आहे. आमच्यात काही
मंडळी म्हणजे भूषण
ढेरे (हरितात्या ), चेतन
देशमुख ( नुसता तात्या ), पप्या
etc वाचनात तसे बरे
आहेत. जातांना येतांना
त्यामुळे बऱ्याच कथा कळतात.
गडाचा इतिहास आणि
त्यावरील मग चर्चा.
या ट्रेक मध्ये
दोन किल्ले करायचे
होते. एक किल्ला
हडसर जो आधी
केला होता पण
काही लोकांना यायला
जमलं नव्हते, म्हणून,
आणि त्यामधले राजकारण
संपवायला म्हणून, अशा दोन्ही
कारणांसकट, किल्ला अप्रतिम आहे
म्हणून परत करण्यात
आला.
शिवनेरी कुठे आहे
हे मी सांगणार
नाही आणि कसे
जायचे ते पण
नाही. महाराष्ट्रात राहून
या किल्ल्याचा पत्ता
विचारणे म्हणजे पुण्यात राहून
शनिवार वाडा कुठे
आहे असे विचारण्या
सारखे आहे. अर्थात
पुण्यात बरेच लोकं
सापडतील आता की
ज्यांना शनिवार वाडा माहित
नसेल. हडसर संपवून
आम्ही शिवनेरीच्या वाटेनी
निघालो. या वेळी
गाडी पूर्ण भरली
होती. सर्व गॅंग
आल्यामुळे खूपच बरं
वाटत होते. माझे
दिवस फार काही
छान चालू नसल्यानी,
हाच तो काय
एक विरंगुळा, ताकद
पुढच्या आठवड्यात परत fight मारायला.
गडाबद्दल थोडसं - पूर्वी आणि
आत्ता मध्ये खूप
फरक आहे हे
सांगायला नको. वर
जायला cement चा रस्ता
आहे. Parking आणि त्याला
लागणारे पैसे आहेत.
नीट छान पायऱ्या
बांधलेल्या आहेत. गडावर जातांना
खाली जणू जत्रा
आहे असे स्टॉल्स
आहेत. त्यात खाणे
पिणे खेळ इतर
सर्व आहे. किल्ला
चढायला सुरु झाले
की मात्र खूप स्वच्छ
आहे. ठीक ठिकाणी
कचरा कुंड्या आहेत.
नीट ठेवला आहे.
नवीन बांधकाम पूर्ण
झाला आहे. restoration efforts खुपच छान
घेतले आहेत. वर
पोचलात की या
किल्ल्या ला ७
दरवाजे आहेत. पहिला महादरवाजा,
दुसरा पीर दरवाजा,
तिसरा परवानगीचा दरवाजा,
चौथा हत्ती दरवाजा,
पाचवा शिपाई दरवाजा,
सहावा फाटक दरवाजा
आणि सातवा कुलाबकर
दरवाजा. पाचव्या दरवाज्याच्या उजवीकडे
शिवाइ देवीचे सुंदर
मंदिर आहे. छान
बांधले आहे मंदिर
आता. हा किल्ला
पूर्वी इतर किल्ल्यांसारखाच
होता. म्हणजे जसा
होता तसा. संवर्धनामुळे
खूप पडक्या गोष्टी,ठिकाणे बांधली आहेत
परत. तसेच हे
मंदिर. मंदिराच्या मागे काही
गुहा आहेत.
पुढचे दरवाजे पार केले
की समोर एक
अंबारखाना आहे. तिथे
आता काही बांधकाम
चालू आहे असे
दिसले. छान होईल
असे वाटते आहे.
इथून एक वाट
टेकडीवर जाते अन
दुसरी शिवकुंजापाशी नेते.
जातांना खूप साऱ्या
टाक्या दिसतात. पाऊल वाट
छान केली आहे.
कमानी मस्जिद, हमामखाना
इत्यादी बघायला मिळते. आणि
मग लांबून दिसते
ती दोन माजली
इमारत, जी इतिहासातील
पुस्तकात पाहिली होती, मनात
घर करून राहिली
आहे. शिवजन्मस्थानाची इमारत.
इथेच सर्व चालू
झाले. ती इमारत
पाहून अंगावर काटा
येतो. वाटतं की
एकदा दर्शन घडावं
महाराजांचे. भारी वाटते.
खाली एक पुतळा
आणि एक पाळणा
आहे. वर खोली
आहे. या इमारतीच्या
पुढे बदामी तलाव
आहे तर तिथून
पुढे गेलात की कडेलोट टोकावर नेऊन
ठेवतो. इथून गुन्हेगारांना
फेकून द्यायचे. आता
त्याला न्याय म्हणायचं की
तिहार जेल मध्ये
गुन्हेगारी केल्लेल्या पुढाऱ्यांना पोसण्याला
न्याय म्हणायचे. इथे
न्याय देणारेच विकले
गेलेत तर काय
सांगा. त्यामुळे मनात विचार
येऊन जातो हे
असं आत्ता असते तर
? तो हजारफुटी कडा
खालून वर भरला
असता. आणि वरून
टाकणाऱ्या गुन्हेगाराला खर्चटण्यापेक्षा काही झाले
नसते. राज्यकर्ते जेव्हा
खायला लागतात तेव्हा
कोणीच काही करू
शकत नाही. महाराज
पण. त्यामुळे जनता
जागृत होते आहे.
संतांच्या नावानी, जाती पातींच्या
जीवावर, महाराजांच्या नावावर नाही तर
फक्त आणि फक्त
प्रगतीला पुढे आणणार.
आज शेतकरी बंधूंचे
खांदे पकडतात, elections पुरते.
असो. विषय भरकटत
चालला आहे. शिवनेरी
उतरून खाली आलो
आणि दोन सरबतं
मारून घरच्या वाटेल
लागलो.
हा ट्रेक नसून एक
तीर्थक्षेत्राची सहल होती.
साधारण नाही, म्हणता म्हणता
५ - ७ हजार
लोकं तरी असतील
गडावर. अनेक शाळांच्या
ट्रिप्स आल्या होत्या आणि
चिल्ली पिल्ली दंगा करत
होते. खूप मजा
आली. मी चड्डी
पप्या पिंटू उप
आणि बीडी ट्रेक
करून घरी पोचलो.
इतिहास:
जीर्णनगर’,
’जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे
शहर इसवीसनापूर्व काळापासून
प्रसिद्ध आहे. जुन्नर
ही शकराजा नहपानाची
राजधानी होती. सातवाहन राजा
गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा
नाश केला आणि
जुन्नर व येथील
सर्व परिसरावर आपले
वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट
हा पुरातन व्यापारी
मार्ग, या मार्गावरून
फार मोठ्या प्रमाणावर
वाहतूक चालत असे.
यावर नजर ठेवण्यासाठी
या मार्गावर दुर्गांची
निर्मीती करण्यात आली. सातवाहनांची
सत्ता स्थिरावल्यानंतर या
भागात अनेक ठिकाणी
त्यांनी लेणी खोदवून
घेतली. सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य, राष्ट्रकूट
या राजवटींच्या सत्तेखाली
होता.
इ.स. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक उत्तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इ.स. १४७० मध्ये मलिक उत्तुजार प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंदी करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्युनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते. यानंतर १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजामाता गरोदर असताना जाधारावांनी ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानी सिवाई, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन, त्याऊपर शिवाजीराजे यांचा जन्म जाला. शके १५५६ क्षये नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार’.
इ.स. १६३२ मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि १६३७ मध्ये तो गड मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरूद्ध येथील कोळ्यांनी बंड केले, यात मोगलांचा विजय झाला. इ.स. १६७३ मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अपयश पदरात पडले. पुढे ४० वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहुमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरीत करण्यात आला.

Mast re...
ReplyDeleteKeep writing...