महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम - ॐ नमः शिवाय
गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आवाक्याच्या बाहेर गेला आहे. इतका मोठा की या शब्दामुळे जगातून लोकांनी भाग घेतला आहे. Online भाग. प्रयागराज हे स्थान जगात माहिती झाले आहे. गर्दी पासून दर्दी पर्यन्त, ढोंगी पासून भोगी पर्यन्त, श्रीमंत, गरीब, नामवंतांपासून ते निनावी माणसांपर्यन्त, सरकारी अधिकाऱ्यांपासून ते चपराशी पर्यन्त, योगी नागा आणि इतर तमाम साधक आणि पुज्यनीय संतांपासून ते खुद्द महादेवा पर्यन्त या ब्रह्मांडातील सर्वात मोठा सनातनी परंपरेचा महासंगम, हिंदू एकतेचे प्रतीक, हिंदू संस्कृतीचे दिव्या दर्शन अनुभवायला पोचले आहेत. महाकुंभ ला. गर्व से काहो हम हिंदू है. न या सारखे आधी कधी झाले न या सारखे परत काही होईल - या पृथीवर.
आयुष्यात ज्या काही आठवणीत राहणाऱ्या गोष्टी घडल्या आहेत त्या मध्ये बरेचशा आठवणी या मित्रांबरोबर आहेत. प्रवास असो वा नुसती गर्दी, बरेच वेळा काही नवीन बघायला किंवा अनुभवायला मिळाले आहे. अशाच एका संध्याकाळी PYC सारख्या उकच्भ्रू ठिकाणी आमची मेम्बरशिप नसतांना, आम्ही बसलो असतांना इतर चर्चा चालू असतांना महा कुंभ या चर्चेला वाचा फुटली आणि सर्व जण सरसावले. आपापली मते ठोकून तिथे किती गर्दी आहे आणि कसे ट्रॅफिक मध्ये लोकं अडकली आहेत पासून ते हा उत्सव किती भारी आहे आणि आपण कसे नल्ले आहोत की जात नाही आहोत याची चर्चा झाली. मग ' गंगेत जाऊन पाप मिटत असते तर अजून काय हवे होते' ' उगाच गर्दी करायची आणि जीवाची ओढाताण करून कशाला जायचे आहे ' ' आपण पापच केले नाही तर कशाला जायचे ' वगैरे चर्चा झाल्या. भिडे म्हणाला नाना तू काही ठरवले नाहीस त्याचमुळे एक गाडी निघणार आहे बुधवारी. ५ जण झाले आहेत. गांगल म्हणाला सोनाली ला पण यायचे आहे आणि आयुष्यात पहिल्यांदा टेबल वर यथेच्छ पीत असतांना बोललेल्या ट्रिप चा प्लॅन खरंच घडला. नाही तर हिमालय पासून कन्याकुमारी पासून ते इतर देशात ले सर्व प्लॅन शेवटी प्यासा ला जाऊन कमी पडलेल्या quarter मध्ये बुडाल्याचे अनेक किस्से आहेत. असो.
गांगल म्हणाला मी पण येतो आणि एकाच्या दोन गाड्या झाल्या. असे करत करत माझे पण जायचे नक्की झाले आणि १० जण प्रवासाला निघालो.
पुणे ते प्रयागराज साधारण १५०० कि मी चे अंतर आहे. नाशिक कडून किंवा संभाजीनगर कडून समृद्धी वर निघायचे आणि नागपूर जबलपूर कटनी रिवा करत प्रयागराज ला पोचायचे. साधारण ५ च्या सुमारास आम्ही पुण्यातून निघालो आणि नाशिक ला मिसळ आणि इतर खादाडी करून समृद्धी महामार्गावर पोचलो. ५५० च्या आजूबाजूचे अंतर साधारण ५ तासात आम्ही कापले. भारतात असे काही होईल याची कल्पना नव्हती. बरेच वर्ष अमेरिकेत राहिलो आहे आणि २५ वर्षांपूर्वी जे तिथे अनुभवले ते २५ वर्षांनी का होईना इथे अनुभवायला मिळाले हाच तो काय तो आनंद. भारत मे देर है अंधेर नाही. अमेरिकेत सर्वच रस्ते असे आहेत ती गोष्ट सोडा. पण मजा अली आणि आम्ही नागपूर ला पोचलो. गाडी बदल, ड्राइवर बदल चालू होते. चहा आणि सँडविच, चिवडा आणि वेगवेगळे लाडू, तिखट पुऱ्या, ठेपले, लोणचे आणि पेपर डिश, चमचे आणि १० लोकांच्या १०+ बॅग, पाण्याच्या बाटल्या आणि १० लोक असे दोन गाड्यात, गादीत कापूस जसे कोंबतात, तसे कोंबून गाणी ऐकत गप्पा मारत भेंड्या खेळत जबलपूर चा पल्ला गाठला. इथे एका हॉटेल तत्सम कार्यालयात आमची चांगली सोया झाली.
अनिकेत बापट हा भिडे चा आत्ते भाऊ. HDFC मध्ये मोठ्या हुद्दयावर आहे. त्याच्या सहकाऱ्यांनी मदत करून हे हॉटेल कार्यालय आम्हाला मिळाले. १० लोकांच्या १० तर्हा. पण लक्ष एक. पोचायचे प्रयाग ला. पोचे पर्यन्त ९ वाजले. गप्पा आणि आवरा आवारी करून आणि बाकी कार्यक्रम उरकून जरा उशीर झाला होता. गप्पां मध्ये उद्या कसे जायचे कितीला निघायचे वगैरे चर्चा चालू होत्या आणि एक एक माउली कल्टी मारत खाली जाऊन जेवत होती आणि झोपायला जात होती. शेवटी आम्ही रात्रीचे जबलपूर च्या रस्त्यांवरून जेवण हुडकत निघालो. लोक पण इथले चांगले आहेत. नीट बोलतात, रस्ता नीट सांगतात, छान हिंदी बोलतात - त्यांना आपले मराठी हिंदी कळायला वेळ लागतो पण रात्रीच्या वेळात सर्व साधारण भाषा जगात कुठं पण गेलात तरी एकच असते. त्यामुळे समोरच्याला काय म्हणायचे आहे ते चटकन समजते. उत्तम तेलकट आणि चविष्ठ जेवण जेऊन आम्ही परत आलो आणि झोपलो.
दुसऱ्या दिवशी चेकऊट करून आम्ही प्रयाग च्या दिशेनी निघालो. गर्दी होती त्यात काही वाद नाही. पण शंभो च्या कृपेने आम्हाला काही म्हणजे काही गर्दी किंवा ट्राफिक जॅम लागला नाही. २५० कि मी ट्रॅफिक जॅम होता हे मात्र खूप लोकांनी सांगितले. आम्ही निवांत प्रयागराज मध्ये घुसलो कारण गावाच्या दुसऱ्या टोकाला आमचे दुसरे कार्यालय कम हॉटेल होते.
प्रयागराज - पूर्वी इलाहाबाद. इथे शिरताच पहिले काय जाणवते ते म्हणजे यांची अशक्य गॉड हिंदी भाषा, त्यांचे स्वर, शब्द, उचार आणि अदब. जय राम जी की म्हणतात आणि आपल्याला जिंकून टाकतात. टपरी वर चहा आणि शेजारी असलेल्या मारुती चे दर्शन घेऊन आम्ही प्रयाग मध्ये शिरलो. गेले काही दिवस ट्रॅफिक जॅम आणि कोट्यवधी लोक असलेल्या जागी तरी रस्ते मात्र स्वच्छ. लखलखीत दिवे आणि गर्दी या मधून वाट काढत आम्ही पुढे सरकत होतो. आणि गंगे च्या पुलावर आलो.
भव्यता काय असते हे समुद्र बघूं कळते. दिव्यता काही असते हे हिमालय बघून समजते. पण हे जे काही माणसांनी सध्या केले आहे त्याला शब्द नाहीत. हजारो अक्रेस वर पसरलेले तंबू पुलाच्या डावी आणि उजवीकडे डोळे पोचतील तितके लांब प्रकाशात झळकत होते. गंगेच्या दोन्ही बाजूला भाविकांची राहायची सोया होती. मी चक्क गाडी थांबवली आणि हे नक्की काय आहे ते बघायला उतरलो. पुलाच्या कडेला गाडी लावून आम्ही पाहत होतो तेव्हड्यात तिथे जवान आला. हातात AK असेल. आम्हाला म्हणाला ' लेलो जिताने चाहे फोटो लेलो, पर जल्दी निकल पडो' आम्ही फोटो घेऊन जय हिंद करून तिथून निघालो. पुढची गाडी कार्यालयात पोचली होती. वाटेत हजारो भाविक गोर गरीब, लहान मोठे सर्व हिंदू बांधव न कटकट करता इकडे तिकडे हिंडतांना दिसत होते. अहो हा अनुभवच काही और होय !!!
कुंभ म्हणजे नक्की काय आहे ? भावना आणि नितांत श्रद्धा याचा एक अनोखा संगम आहे असे मला वाटते. इथे मला माननीय श्री योगी आदित्यनाथजी यांचा उल्लख केला नाही तर त्यात काही अर्थ नाही. करोडो लोकांची नीट नेटकी व्यवस्था आणि व्यवस्थापन करणे हे चंद्रावर यान पाठवण्या इतकेच कठीण आहे. तिथे यान गेले किंवा नाही फक्त पैसे जातील.. इथं करोडो लोकांच्या भावना आणि जीव ठेचले जातील. अहो ५०% हुन अधिक देशांची लोक संख्या इतकी नाही तितके लोक इथे येऊन गेले आहेत. जात आहेत. खरं सांगू का देव म्हणजे काय असते ते इथे येऊन पाहावे. या वेड्या श्रद्धेला काही मोल नाही. अनमोल आहे हे सर्व. शब्दच अपुरे तर काय करू.
Sector ५ का कुठे तरी आम्ही पोचलो आणि तिथे एका कार्यालयात खोल्या मिळाल्या तिथे राहिलो. तिथेच जेवण मिळाले आणि आम्ही शांत पणे झोपी गेलो. सकाळी लवकर उठून आवरून चहा पिऊन सर्व १० लोकं तयार झाली. आम्ही मुलांनी भिडे नी आणलेली भगवी बंडी आणि भगवी लुंगी चढवली आणि तयार झालो. दोन तीन रिक्षा बोलावल्या आणि संगमाकडे निघालो. काही अंतरावर रिक्षा सोडल्या आणि चालत चालत १० ते १५ मिनिटात गंगे च्या तीरावर पोचलो. तुम्हाला अनुभव आहे का हो कोकणाचा - की नाही का आपण डोंगर आणि घाट उतरून गावातल्या रस्त्यानी, आजूबाजूला ताडामाडाची झाडे, लाल माती आणि कोकणातील वाड्या, आणि अचानक एका वळावरून पाहतो तो अथांग समुद्र. त्या गल्लीतून चालत बाहेर पडलो आणि समोर अथांग गंगामाते चे दर्शन एकीकडे आणि सनातनी धर्म जपणारे त्याचा अभिमान बाळगणारे माझे बंधू भगिनींचा समुद्र दुसरी कडे अनुभवास मिळाला. बाप्पा ला परत सोडायला जातांना न गर्दीचा त्रास होतो न अजून कसला. डोक्यात फक्त बाप्पा असतो. इथे तसेच काही से झाले. थोडी फार चुकामुक झाली पण सर्वांनी डुबकी मारली.
संगम कुठला, नक्की कुठे डुबकी मारायची, नक्की जागा कुठली - म्हणजे डुबकी चुकीच्या ठिकाणी आणि पाप तसेच हो. जागा चुकली असे नको ना. म्हणून लोकांची गडबड चालू होती. मी आणि माझा बरोबरचे काही समोर पाणी दिसले आणि चार लोक आनंदानी डुबकी मारत होती तिथे गेलो आणि मस्त थंडगार पाण्यात बुडी मारली. इतके गार पाणी की शरीर बधिर झाले काही वेळ. पण थोड्या वेळानी OK झालो. उगवत्या सूर्याला नमस्कार केला गंगामैया ला नमस्कार केला. आणि काय, आलो बाहेर. गंगेत घोडे नहायले !!! आजूबाजूला हजारो लोक काही न काही प्रथा / देव पूजा / कर्म कांड / तंत्र मंत्र करत धार्मिकतेनी तिथे स्नान करत होते. हरिद्वार सारखे इथे बाजार भुंडंगे नव्हते - हे करतो पैसे द्या आणि ते करतो पैसे द्या. कोणीच पैसे मागत नव्हते. घाटावर स्त्री वर्गाची कपडे बदलायची व्यवस्थित सोय केली होती. बोटी होत्या rescue साठी. लोकं पाण्यात जे काही टाकत होते हार तुरे ते काढत काही माणसे सदैव तत्पर होती. घाटावर शेकडो कार्यकर्ते रस्ते साफ करत होते. शेकडो पोलीस लोकांची भावना न दुखावता पण थोडेसे घट्ट आवाजात सर्व खेळ सांभाळत होते. मधूनच घाटावर VIP च्या गाड्या खूप आवाज करत यायच्या आणि कुठल्याशा संगमाच्या दिशेनी जायच्या. त्यांची पापं साफ करायला सामान्य संगम कसा चालेल. त्यामुळे 'VIP पापं' धुण्यासाठी साठी सेपरेट संगमाची व्यवस्था केली गेली आहे. वरून पाहिलात तर गंगा तिथे काळी झालेली दिसेल असं आपले मझा मनात आले. विधायक पासून ते मॅजिस्ट्रेट पर्यन्त तिथे गर्दी करत होते. अहो आम्ही गेलो तेव्हा तिथे आपले श्री देवेंद्र फडणवीस साहेब पण आले होते डुबकी मारायला विथ फॅमिली असे ऐकले खरे. अर्थात त्यांचा पण संगम स्पेसिअल होताच. आम्ही आवरले आणि मी तिथून पळ काढला. पूल ओलांडून कॅम्प्स village मध्ये शिरलो. तीन चार तास खूप हिंडलो. दाढी वाढलेली, कुरळे केस मोकळे आणि भगवी वस्त्रे पाहून येत जात लोकं मला नमस्कार करत होती. मनातल्या मनात, मी अतिसामान्य असतांनाही, मिळालेले प्रेम आणि सम्मान मी आनंदानी घेत होतो आणि परत देत होतो. ते नाही पूर्वीच्या महाभारतात टीव्ही वर नितेश भारद्वाज नी कृष्णाचे पात्र केले आहे, नंतर कृष्ण म्हणजे तोच असा समज झाला होता. माझं तसेच झाले होते. स्वतःबद्दल. त्यामुळे काही काळ का होईना भारी वाटले. मनात येऊन गेले की हा धंदा म्हणूनच चालतो. ना पाळतायेणारे तत्वज्ञान, उगाच अति क्लिष्ट भाषेत भयंकर complicate करून लोकांच्या समोर ठेवले की झाला बाबा.
भोळी भाबडी लोकं पाया पडायला लागली तेव्हा मात्र मी ओशाळून गेलो. मी त्यांच्या परत पाय पडायचो आणि तिथून निघायचो. भगव्या वस्त्राची ताकद, त्याचे पावित्र्य, त्याबद्दल च्या भावना याचा संपूर्ण साक्षात्कार इथे झाला. एका कोपऱ्यात एक साधू महाराज दिसले. एकटेच बसले होते. त्यांची परवानगी घेऊन मी त्यांच्या शेजारी जाऊन बसलो. आधी नमस्कार केला आणि मग बसलो. ते ऋषिकेश च्या पुढे कोणत्या तरी गावातून आले होते आणि परतीचा प्रवास चालू होणार आहे असे मला म्हणाले. आमच्या १५ मिनिटे छान गप्पा झाल्या. त्या माझा पाशी योग्य. परत नमस्कार करून मी त्यांची रजा घेतली. या तिराहून त्या तीरावर जाण्यासाठी अनेक पूल केले आहेत. सर्व पूल हे Oneway आहेत. त्यामुळे येत जात काही त्रास नाही. घाटावर ठीक ठिकाणी जेवायची सोया आहे. तिथेच एका ठिकाणी जाड पुरी आणि भाजी खाऊन मी परत चालायला लागलो. आमच्यातील काही मंडळी मोठ मोठे पाण्याचे डबे घेऊन गंगेला त्यात मवावयाचा प्रयत्न करत इकडे तिकडे त्याचे ओझे वाहत होते. एका ठिकाणी दमून एका तंबू मध्ये शिरलो. हनुमान भक्त महंत तिथे विराजमान होते. त्यांचे दर्शन घेतले. खूप छान आणि प्रसन्न वाटले. काही काळ तिथे विसावा घेतला. राहुल आणि सोनाली ला अजून एक कॅन गंगा हवी आहे असे सांगून ती आणायला पसार झाले. मी आणि भिडे तिथेच निवांत बसलो. इतर लोक हॉटेल च्या दिशेनी निघून गेले.
काही क्षण शांततेत मी बसलो होतो. मनात एक न अनेक विचार चालू होते. आठवणी येणे जाणे चालू होते. बाबा ला हे सर्व फार आवडले असते. वेगवेगळे साधू, तपस्वी, संत आणि अघोरी याचे दर्शन घडले. हे कोण असतील ? त्यांचे आई बाबा त्यांना शोधत असतील का ? हे कुठून आले आणि परत कुठे जाणार ? जायचे यायचे जेवायचे खायचे पैसे कोण देत असेल ? त्यांच्या कडे असतील तर ते कसे ? नक्की उपासना म्हणजे काय करतात. आम्हाला जसे क्रियायोगाची दीक्षा मिळाली, त्यांना कोणती दीक्षा मिळाली असेल ? त्यांच्या साधनेचे मूळ काय ? त्यांना त्याचा काय परिणाम दिसतो आहे आणि कसा ? हाच तो मार्ग हे यांना माहिती होते का ? का ते पण शोधात आहेत ? असे अनेक प्रश्न मनात घर करून होते. दुसऱ्या टोकाचा विचार हा पण मनात आला की हा सर्व एक प्रकार चा स्वार्थ नाही का ? फक्त स्वतः चा विचार करणे. मला मोक्ष कसा मिळेल आणि मला हे कसे मिळेल आणि मला ते कसे जमेल. साधना करतांना जनहिताचे, देशहिताचे काही विचार असतील का ? असो. इथे आलो तेव्हा हे नक्की कळले की या सर्व प्रश्नाची उत्तरे ही इथेच अशा ठिकाणी मिळणार हे नक्की. शोधायला आणि सापडावयाला तशी ताकद यावी लागेल आणि त्यासाठी सुद्धा तशी तपश्चर्या करावी लागेल.
त्या तंबूतून आम्ही निघालो आणि परत हॉटेल ला पोहचलो. ज्या साठी केला होता अट्टाहास !!! परत आलो आणि सामान उचलून गाडीत भरून आम्ही वाराणसी कडे निघालो. बाहेर पडताना खूप जास्त ट्रॅफिक लागला आणि वाराणसी ला पोचेपर्यन्त १० वाजले. सोनाली ज्या हॉटेल मध्ये मागील वर्षी राहिली होती तिथेच आम्ही राहिलो.
पहाटे २ ला उठून अंघोळ करून मी आणि लिमये साहेब रांगेत उभे राहिलो, काशी विश्वनाथ देवाचे दर्शन घ्यायला. दोघे ३.५ तास रांगेत उभे होतो. आमच्या बरोबर अनेक लोकं म्हणजे हजारो, त्याच रांगेत उभे होते. लहान मोठे, म्हातारे, लहान लहान मुलांना घेऊन आलेले, काही तरुण - असे विविध जातीचे हिंदू एका रांगेत शांत उभे होते. जसे जसे जवळ आलो देवळाच्या तसे तसे आम्हाला कळले की इथे पण पाप धुण्याची स्पेसिअल रांग आहे. पैसे द्या आणि दर्शन लवकर घ्या. काही अडचण नाही. पण १० VIP पापी मागे निदान १०० सामान्य पापी सोडायला काही हरकत नव्हती. पण असे काही होत नव्हते. एकंदरीत सर्व बघता आम्हाला इथे काही थांबावेसे वाटले नाही. देवळा पाशी पोचलो आणि मी आणि लिमये साहेबांनी ठरवले की नाही जायचे पुढे. काही तसे वाटले पण नाही. रांगेतून बाहेर आलो आणि लांबवर दिसणाऱ्या कळसाला नमस्कार ठोकून तिथून बाहेर पडलो. मातीच्या भांड्यातून गरम गरम चहा घेतला आणि सुमारे ७ ला हॉटेल मध्ये येऊन झोपलो.
बनारस / वाराणसी बघायला किमान ४ दिवस हवेत. इथली हवाच काही और आहे. अशक्यच कर्कश्शय हॉर्न वाजवणे सोडले तर अहो इथे माणसे पण खूप चांगली आहेत. इथे एका पेट्रोल पम्पावर पेट्रोल टाकायला गेलो असतांना गाडीचा नंबर बघून अहो चक्क तिथल्या माणसांनी विचारले ' साहब चाय पानी कुछ लोगे ? एके पुणेकराला तात्काळ छातीत कळ यावी असे उद्गार हे. अहो इथे बरेच ठिकाणी ' पहिले खाओ और फिर पैसे देना. आप क्या हमारा नसिब लेके भागोगे क्या ? असे अशक्य गोड़ शब्द कानावर पडत होते. नाही तर लक्षुमी रोड चे जनसेवा - साला सामोसा घेऊन चटणी मागितली तर म्हणाला आधी एक रुपया द्या. तिथे एक संस्कृतीचे महेर घर आणि इथे पुणे एक संस्कृती आणि विद्येचे महेर घर. हे होते असे म्हणायला काही हरकत नाही वाटत आता. वाईट वाटते पण काही इलाज नाही.
आमचा अचानक दहा जणाचा प्लॅन झाला काय आणि आम्ही निघालो काय. ३२०० किमी दोन गाड्या आणि एक पंगचर नाही की एक ओरखडा नाही. कोणाला तब्येतीचा त्रास नाही. ट्रॅफिक जॅम नाही. जिथे तिथे हरी येऊन मार्ग दाखवत होता. ब्रह्म अजून काय मग असेल ?
कुंभ - असे या ब्रह्मांडात कधी झाले नाही आणि परत कधी होणे नाही. परत एकदा आदरणीय मोदीजी आणि योगीजीं बरोबर सर्व कार्यकर्त्याचे मनापासून आभार. गेला नसाल अजून तरी वेळ गेली नाही. आज नाही तर उद्या नाही तर जमेल तेव्ह जाऊन या. जय शंभो गंगे हरहर !!!
Nice blog, Vedic Rudraksha offers authentic rudraksha malas that connect you to divine vibrations, enhancing focus and positivity. Whether for personal use or gifting, a rudraksha mala in Haridwar carries blessings and timeless spiritual significance for every seeker.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete
ReplyDelete" Nice blog ,Fantastic experience at the Digital Marketing Agency in Patna The atmosphere was so calm, the accommodations were spotless, and the team was incredibly welcoming. An ideal place for a productive and peaceful retreat."
ReplyDeleteThanks for such an Informative blog Your Blog is very nice natural rudraksha mala in Haridwar ,Your effort is truly appreciable! If you’re looking for authentic and certified Rudraksha beads, I highly recommend Vedic Rudraksha. They offer genuine Rudraksha products with proper certification and spiritual guidance. For anyone seeking original Rudraksha beads and spiritual items, Vedic Rudraksha is a trusted and reliable choice!
Wonderful information! Vedic Rudraksha truly offers trusted, authentic, and spiritually powerful Rudraksha beads. If anyone is looking for safe, reliable, and high-quality Rudraksha for health, protection, and well-being, Vedic Rudraksha is definitely worth considering. Thanks for sharing such helpful insights! Original Rudraksha Online .
ReplyDelete