Monday, 18 June 2018

वसंतगड - सदाशिवगड

वसंतगड सदाशिवगड



मित्र म्हणाले की भांडण आलंच. हे ट्रेकिंग चालू केल्या पासून बरेच  अनुभव आले. जसा जसा ग्रुप वाढत जात आहे तसे तसे बरेच काही किस्से घडत आहेत. त्यात काही विशेष नाही पण असच मनात आलं  म्हणून लिहीत आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. कुठे जायचं  पासून ते कसे पोचायचे पर्यन्त कल्ला  चालू असतो. माझा स्वभाव काही लोकांना आवडत नाही. काय आवडत नाही ते काही मला नीट  सांगितलं नाही पण एकंदरीत असे झाले आहे. त्यात आता Goechala  ची तयारी चालू केली आहे. आत्ता  तरी सर्व गॅंग येणार असे आहे. पुढे काय होता ते कळेलच. पण स्वभावाला औषध नाही. त्यामुळे मला असे वाटतं कि मित्रांमध्ये एकमेका विषयी जर का काही तक्रारी असतील तर त्या लगेच बोलून मिटवून टाकाव्यात. एकदा मित्र म्हणाल म्हणजे चांगले वाईट सर्व आलेच त्या बरोबर. जसे आहे तसे.
वसंतगड सदाशिवगड आणि दातेगड जायचं  ठरलं . पावसाळा छान चालू झाला होता. अर्थात नावाला. हवा तसा पाऊस नव्हता. वसंतगड हा किल्ला कराड च्या  जवळ आहे. तळबीड नावाचा गाव आहे खाली. सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या  समाधी मुले प्रसिध्द आहे. एक रस्ता तिथून गडावर जातो. आम्ही वसंतगड गावाच्या रस्त्यानी गेलो. वाट पूर्णपणे मळलेली आहे. किल्ला खूप मोठा आहे फिरायला . बघायला पण खूप काही आहे.
यावेळी पण ७ जण  होतॊ. ७ मित्र आणि त्याबरोबर सर्व हेवेदावे आणि इतर गर्दी. येतांना असते आणि जातांना काही तरी नवीन बरोबर घेऊन जातात. खूप आठवणी. या वेळी माझं  कारण काही तरी वेगळच होतं . मी एकटा होतो. खूप विचार चालू होते आणि मला शांतपणे मार्ग शोधायचा होता. ट्रेक चा नाही. त्यामध्ये मी खूप गुंतलो होतो. नाही मिळला नीटसा मार्ग. भारतात आलो तेव्हा एक बावळट माणूस, नोकरदार वर्गातील एक प्रामाणिक माणूस म्हणून आलो होतो. पण परिस्थिती आणि इथल्या पद्धतीमुळे पूर्ण मेलो. अर्थात हे पण खोटं आहे. पण दोष तर द्यायला हवा ना कुणाला तरी.
असो.
इथून काही अंतरावर सदाशिवगड आहे. साधारण १००० पाहिऱ्या आहेत. वर एक महादेवाचं मंदिर आहे. बाकी विशेष काही नाही.
वसंतगड इतिहास :
या किल्ल्याची बांधणी १२ व्या शतकात शिलाघर राजा भोज याने केली. इ.स. १६५९ मध्ये शिवरायांनी किल्ला स्वराज्यात आणला. गडाजवळच मसुरला सुलतानजी जगदाळे रहात होता. अफजलखान स्वराज्यावर चालून आला त्यावेळी जगदाळे त्यास जाऊन मिळाला. अफजल वधानंतर मराठ्यांनी अचानक छापा घालून जगदाळेस पकडून वसंतगडावर आणले व त्याचा शिरच्छेद केला. पुढे जिंजीहून परतल्यावर राजाराम महाराज काही दिवस या किल्ल्यावर मुक्कामाला होते. २५ नोव्हेंबर १६९९ रोजी औरंगजेबाने हा किल्ला जिंकला व त्याचे नाव ठेवले ‘किली द फतेह’ म्हणजे यशाची किल्ली असे ठेवले. नंतर १७०६ मध्ये मराठ्यांनी परत हा किल्ला जिंकला. इ.स. १८१८ मध्ये वसंतगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. 
तर, वसंतगड गावातून वर जायला ४५ मिन खूप झाली. जातांना घळीमधला एक देव आहे. छोटेसे मंदिर आहे.


घळीमधले मंदिर 

वर पोचल्यावर एक सुंदर बाप्पाच मंदिर आहे. या गडाचं  महत्व काही वेगळा असावं . इथे तशी बाया माणसांची गर्दी होती. वर एक मंदिर आहे. तिथे कदाचित नवस वगरे बोलायला लोक येत असावीत. पूजा अर्चा चालू होत्या. गडाची तटबंदी खूप शिल्लक आहे. खूप मोठा विस्तार आहे आणि इथे राहायला यायला नक्कीच आवडेल. 




दरवाजा 


वर गेल्यावर डावीकडे मारुती आहे 





दुसरा दरवाजा - हा प्रमुख दरवाजा असावा 













सदाशिवगड 








Tuesday, 12 June 2018

कोथळीगड / पेठ चा किल्ला


कोथळीगड
वामन माईणकर. चेतन चा शाळेतला मित्र. आणि त्यामुळे स्वाभाविक माझापण मित्र. मी त्याला common म्हणतो, काही त्याला वाम म्हणतात तर काही अजून काही. अमेरिकेत राहतो. कालच सकाळी पोचला भारतात. मला वाटलं की  हा येणार नाही, पण आला. ५ चे ६ झाले. नंतर शिरीष पण म्हणाला मी येतो. त्याला कर्जत ला गाठला आणि ६ चे ७ जण  झाले. खूप मजा आली. बी डी ची गाडी हा एक खूप मोठा चर्चेचा विषय झाला होता. त्यांनी गाडी घेऊन तब्बल दोन वर्ष झाली तरी गाडी पाहायला मिळाली नव्हती. ती आज मिळाली. Highway वर tire  burst झाले आणि ट्रेक चा शुभारंभ झाला. Thar घेतली होती. त्यात सर्व लोक कोंबून बसलो आणि कोथळीगडा कडे निघालो. पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली होती आणि सर्वत्र हिरवेगार होते. उन्हाळ्यातून काळे होऊन आम्ही सर्व पावसाळ्यात भिजायला तयार झालो. कोथळीगड इतिहास खूप मोठा आणि तिथे अनेक युद्ध झाले. रक्तपात झाला. गड बघायला खूप मोठा आहे, असे नाही पण तिथे जे आहे ते कुठे नाही हे गेल्यावर कळलं. असं  खरं  म्हणाल तर सर्वच गडांविषयी आपण म्हणू शकतो. पण इथे काही तरी  विशेष आहे. तिथे पण गर्दी होती. मुंबई ची खूप लोक तिथे आले होते. कर्जत हुन आंबिवली नावाच्या गावी गेलो. तिथून साधारण ४ कि मी चालत जाऊन पेठ नावाचे गाव आहे. तिथून किल्ला साधारण ४५ मी आहे. आंबिवली ला पोचलो तेव्हा साधारण ९ वाजले होते. तिथे parking मध्ये आधीच काही गाड्या व दुचाकी आणि एक बस असे उभे होते. तेव्हाच कळलं की इथे गर्दी आहे. या गावातून पेठ कडे जायला खूप खडबडीत रस्ता आहे. पण Thar असल्यामुळे आम्ही ठरवलं की चला. THAR घेऊन त्या रस्त्यावर निघालो. वर खाली डोकी आपटत पुढे मागे होत, THAR पेठ पर्यन्त वर चढवली. हा रस्ता खूप कंटाळवाणा आहे. १ तास जातो पोचे पर्यन्त. जातांना आधी पोचलेले लोक चालतांना दिसत होते. चालायचेच. त्यात काही सुबक ठेंगण्या पण असल्यानी  मुलांना चेव चढला होता. चाळिशीतले सर्व चोर बरोबर जमले की परत कॉलेज मध्ये पोचतात. अर्वाच्य शिव्या आणि आत्यंतिक घाण बोलणं. नंतर हसवून आणि हसून आनंद लुटणं. आहे काय त्यात. न पैसे  पडतात ना काही. निखळ आनंद मात्र. पेठ ला पोचलो आणि गाडी पार्किंग केली ( मराठीत park केली असं  नसून parking  केली असे म्हणतात). "तिथे करा ना jeep parking" जेवण ज्याच्या बरोबर केलं तो गावकरी म्हणाला. त्याला आलोच सांगितले व आम्ही तयार हुन किल्ल्या कडे निघलो. रस्ता मस्त जंगलातून आहे. खूप सुंदर आहे. चढण थोडंसं अंगावर येते पण विशेष काही नाही. उपेंद्र कालच गडावर जाऊन आला होता. त्यांनी ट्रेक ची तयारी चालू केली होती. मी पण या आठवड्यात चालू करणार आहे. पावसाच्या सरी येत जात होत्या आणि त्यामुळे शीण अजिबात जाणवत नव्हता. वाट मळलेली आहे. खाली इतिहास आणि काही फोटो आहेत ते जरूर बघा. हा किल्ला कर्जत भागातील किल्ल्या मधला पहिला किल्ला. आता इथले किल्ले सुरु करायचे. लोणावळा खंडाळा कर्जत माथेरान चालू. कोथळीगड - नाव पण काय विशेष आहे. किल्ला उरकून आम्ही खाली पोचलो. मित्रानी मस्त गरम गरम तांदूळ भाकरी आणि पिठलं केला होता. ते खाऊन तृप्त झालो. उतरतांना मात्र खूप पाऊस होता. संपूर्ण भिजलो होतो. पण तसेच पुढे निघालो. एक  गुहा आणि भिवगड करायचा होता. चड्डी नि extra socks आणले होते, good idea. Next time onward this will happen. The whole experience was as usual very beautiful. This is now every weekend thing that is happening since last 7 months and not a single sole wants to stop anywhere. This is something we all look forward to. Some aim in life, short term, might be, but so be it. At times, come Wednesday we start discussing about the weekend trek and then we all are in the zone. Travelling gives you experiences that none can compete with. In this journey or towards the end you can say, there is more than enough learnt. Enjoy the blog and do comment, good or bad.

इतिहास :
औरंगजेबाने नोव्हेंबर १६८४ मध्ये अब्दुल कादर व अलईबिरादरकानी र्‍यांना संभाजींच्या ताब्यातील किल्ले घेण्यासाठी पाठवले. ’कोथळागड’ हा महत्त्वाचा असून जो कोणी तो ताब्यात घेईल, त्याचा ताबा तळकोकणावर राहील हे लक्षात घेऊन अब्दुल कादर याने हा किल्ला घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तो या किल्ल्याच्या जवळपास गेला आणि तेथे राहणार्‍या लोकांना त्याने आपले नोकर म्हणून ठेवून घेतले. मराठे या किल्ल्यातून शस्त्रांची नेआण करतात, हे कळताच अब्दुल कादर व त्याचे ३०० बंदूकधारी नोव्हेंबर १६८४ मध्येच गडाच्या पायथ्याशी पोहोचले. मराठ्यांनी त्र्‍यांना मागे हटवले, पण तरीही काही लोक किल्ल्याच्या मगरकोट दरवाज्याजवळ पोहोचले आणि त्र्‍यांनी ‘दरवाजा उघडा‘ अशी आरडाओरड सुरू केली. किल्ल्यावरील मराठा सैन्याला वाटले की आपलेच लोक हत्यारे नेण्यासाठी आले आहेत, म्हणून त्र्‍यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच मोगल सैनिक आत शिरले मराठे व मोगल र्‍यांच्यात लढाई झाली. अब्दुल कादरच्या मदतीसाठी माणकोजी पांढरेही आले, झालेल्या लढाईत मोगलांना यश आले.

दुसर्‍याच दिवशी मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला, फार मोठी लढाई झाली. या लढाईत बाणांचा व बंदुकींचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.या लढाईत किल्ल्यावरचा दारूगोळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. गडावर जाणारी सामुग्री मराठ्यांनी लुटल्यामुळे मुघल सैन्याला दारूगोळा व धान्य मिळेनासे झाले. दरम्यानच्या काळात अब्दुल कादरच्या मदतीला कोणीच न आल्यामुळे त्याची परिस्थिती कठीण झाली. वेढा टाकल्यानंतर दहा बारा दिवसांनी जुन्नरचा किल्लेदार अब्दुल अजिजखान याने आपला मुलगा अब्दुलखान याला सैन्यासह अब्दुल कादरच्या मदतीला पाठवले. अब्दुलखान तेथे पोहचला तेव्हा त्याची वाट अडवण्यासाठी मराठ्यांचा सरदार नारोजी त्रिंबक र्‍यांनी तेथील खोरे रोखून धरले होते. येथेही लढाई झाली नारोजी त्रिंबक व इतर सरदार धारातीर्थी पडले आणि कोथळागड मुघलांच्या ताब्यात गेला. इहमतखानाने नारोजी त्रिंबकाचे डोके रस्त्यावर टांगले किल्ला जिंकून सोन्याची किल्ली औरंगजेबाकडे पाठवण्यात आली. औरंगजेबाने कोथळागड नावाचा असा कोणता गड अस्तित्वात आहे का? याची खात्री करून मगच अब्दुलखानाला बक्षिसे दिली. मुघलांनी गडाला ‘मिफ्ताहुलफतह‘ (विजयाची किल्ली) असे नाव दिले. फंदफितुरीमुळे मराठ्यांच्या हातून हा मोक्याचा किल्ला निसटला.

गड परत मिळवण्यासाठी मराठ्यांनी प्रयत्न सुरू केले. डिसेंबर १६८४ मध्ये गडाकडे जाणार्‍या मुघल सैन्याला मराठ्यांनी अडवले. नंतर मऱ्हामतखानालाही ७००० मराठ्यांच्या तुकडीने अडवले. पण मराठ्यांना यश लाभले नाही. त्यानंतर एप्रिल १६८५ मध्ये ७०० जणांच्या तुकडीने पुन्हा हल्ला केला. २०० जण दोरीच्या शिडीच्या मदतीने किल्ल्यात उतरले. बरेच रक्त सांडले, पण मराठ्यांची फत्ते होऊ शकली नाही. मराठ्यांनी हा महत्त्वाचा किल्ला गमावला होता. पुढे १८१७ च्या नोव्हेंबरमध्ये दुसर्‍या बाजीराव पेशव्याच्या वतीने बापुराव नामक शूर सरदाराने हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यातून सोडवला. सुमारे १८६२ पर्यंत किल्ल्यावर माणसांचा राबता होता. ( ref - trekshitiz)
थोडे वर गेल्यावर उजवी कडच्या बुरुजाकडून एक वाट वर जाते आणि दुसरी दरवाज्या कडे जाते, डावीकडून. चुकण्यासारखा काही नाही. आम्ही बुरुजाकडून वर गेलो.
या बुरुजाकडून किल्ल्याकडे जाऊ शकता. तिथे एक छोटीशी गुहा आहे. त्यात साधारण ८ ते १० लोक राहू शकतात. पुढच्यावेळी नक्कीच तिथे राहण्याचा बेत आहे.



देवीचे मंदिर 


भैरोबा  ची गुहा 


कातळातल्या कोरलेल्या पाहिऱ्या 








गडाचा विस्तार तास छोटा आहे. हा किल्ला एक watch tower म्हणून उपयोगात असावा असे वाटते. 



भैरोबा 




















Tuesday, 5 June 2018

सुरगड

सुरगड -
कोलाड जवळील एक सुंदर किल्ला. महाराजांनी बांधलेल्या किल्यान मधला हा एक किल्ला. हा किल्ला लक्षात राहील कारण वर जातांना व खाली उतरतांना, दोन्ही वेळेला वाट चुकलो. :-)
आज खूप पाऊस आहे असं  वेधशाळेने सांगितलं आहे. त्यामुळे येतांना नक्की रेनकोट आणावा. याचा अर्थ आज अजिबात पाऊस पडणार नाही आणि परत ऊन वाट लावून जाणार आहे. तसेच झाले. करायचा होता सुरगड मानगड. पण झाला फक्त सुरगड. दोन्ही करणं शक्य आहे. सर्व प्रथम काही सूचना.
कोलाड हुन वैजनाथ आणि तिथून घेरा सुरगड हे गाव गाठावे. तिथे मारुती  मंदिरापाशी गाडी लावून रस्ता गडावर जातो. मळलेली वाट आहे वगरे सर्व बरोबर आहे पण आम्हाला काही दिसली नाही. आदल्या दिवशी खूप पाऊस झाला होता. वादळी पाऊस आणि त्यामुळे सर्वत्र लाल पानांचा सुंदर सडा पडला होता. अत्यंत सुंदर असं हे दृश्य होतं. पण त्या सुंदर दृश्यामध्ये आमची वाट लपली होती जी काही आम्हाला सापडली नाही. थांबायचं नाही हे धोरण असल्यानी थेट वर चढायला सुरुवात केली. रस्ता चुकलो व अव्हगड वाटेनी आर्ध्यावर पोचलो. तिथून गडाच्या माथ्याकडे बघत जात असतांना राजमार्ग सापडला. थोडक्यात गड उजवीकडे ठेऊन वाट वर जाते. तिथे एक रस्ता देवीच्या मंदिर कडे जातो तर दुसरा गडावर. जाऊदे, सापडेल तुम्हाला पण रस्ता. एक छोटासा रॉक patch आहे पण फारशी काळजी चे कारण नाही. तिथून तुटलेल्या पाहिर्यानी तुम्ही गडावर जाता.
आम्ही चौघे सोडून गडावर कोणीही नव्हता. आज जाता येता सर्वात महत्वाची म्हणजे Goecha-la Trek ची चर्चा  होती. कोण येणार आहे. कसे planning करायचे. त्यामुळे खूप उत्साही वातावरण होते. As usual discussing about all the possibilities and how all can manage to make it happen. Generally, after Talli, everyone is ready to go everywhere. But during the day in case we decide and people say yes, then we take it seriously. Everything was in planning stage. Me upya chaddi and pintu were already in and we were trying to convince others for the same. Lets see what happens.
कुंडलिका एक बाजूला तर भीमा दुसऱ्या बाजूला. किल्ला छोटा आहे. पण पाहायला बरेच काही आहे. तटबंदी, मंदिर आणि इतर सर्व. खाली चित्र आहेतच.

इतिहास :
सुरगड किल्ला दक्षिण कोकणातील शिलाहार राजांच्या काळात बांधला असावा. शिवरायांनी जे गड नव्याने वसविले त्यात सुरगडाचाही समावेश आहे. राजाराम महाराजांच्या काळात सुरगड शंकरजी नारायण सचिवयांनी सिद्दीकडून जिंकून घेतला नंतर इसवीसन १७३३ मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी सुरगड सिद्दीकडून जिंकून घेतला.त्याकाळात सुरगडावर ठेवण्यात आलेल्या कैद्यान्बद्दल नोंद आढळते.गडावरील शिलालेखावरून असे दिसून येते कि ,गडाचा हवालदार व गडबांधणार्याचे नाव सूर्याजी व किल्ल्याचे सुभेदारचे नाव तुकोजी हैबत असे होते.

इसवी सन १८१८ मध्ये फेब्रुवारी महिन्यात कर्नल प्रॉथर याने हा किल्ला घेतला. सुरगडावरून पश्चिमेला कुंडलिकानदीचे खोरे, घोसाळगड आणि अवचितगड दिसतो तर पूर्वेकडे उसर गावाजवळील वरदायिनी देवीचा डोंगर दिसतो. - (ref Trekshitiz )








Rock patch


तटबंदी अजून शाबूत आहे. 


There is a 50 ft fall below. But the rock patch is not that difficult. Precaution is better than cure. Carry a rope along for safety. 



शिलालेख खूप सुंदर आहे. नक्की पहा. 








मारुतीची मूर्ती गडावर गेल्या गेल्या उजवीकडे आहे. पानवती ला पायाखाली चिरडले आहे. माझा आयुष्यात टी अजून जिवंत आहे. तिला कधी चिरडणार मी मलाच माहित नाही. पण लवकरच. नाही तर ती मला चिरडलं आता. 


शंभो 



वज्रगड प्रदक्षिणा

 वज्रगड प्रदक्षिणा  अधिक महिना या वर्षी. त्यामुळे श्रावण चालू झाला नसून पण 'क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे' ही बालकवी य...