Tuesday, 12 June 2018

कोथळीगड / पेठ चा किल्ला


कोथळीगड
वामन माईणकर. चेतन चा शाळेतला मित्र. आणि त्यामुळे स्वाभाविक माझापण मित्र. मी त्याला common म्हणतो, काही त्याला वाम म्हणतात तर काही अजून काही. अमेरिकेत राहतो. कालच सकाळी पोचला भारतात. मला वाटलं की  हा येणार नाही, पण आला. ५ चे ६ झाले. नंतर शिरीष पण म्हणाला मी येतो. त्याला कर्जत ला गाठला आणि ६ चे ७ जण  झाले. खूप मजा आली. बी डी ची गाडी हा एक खूप मोठा चर्चेचा विषय झाला होता. त्यांनी गाडी घेऊन तब्बल दोन वर्ष झाली तरी गाडी पाहायला मिळाली नव्हती. ती आज मिळाली. Highway वर tire  burst झाले आणि ट्रेक चा शुभारंभ झाला. Thar घेतली होती. त्यात सर्व लोक कोंबून बसलो आणि कोथळीगडा कडे निघालो. पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली होती आणि सर्वत्र हिरवेगार होते. उन्हाळ्यातून काळे होऊन आम्ही सर्व पावसाळ्यात भिजायला तयार झालो. कोथळीगड इतिहास खूप मोठा आणि तिथे अनेक युद्ध झाले. रक्तपात झाला. गड बघायला खूप मोठा आहे, असे नाही पण तिथे जे आहे ते कुठे नाही हे गेल्यावर कळलं. असं  खरं  म्हणाल तर सर्वच गडांविषयी आपण म्हणू शकतो. पण इथे काही तरी  विशेष आहे. तिथे पण गर्दी होती. मुंबई ची खूप लोक तिथे आले होते. कर्जत हुन आंबिवली नावाच्या गावी गेलो. तिथून साधारण ४ कि मी चालत जाऊन पेठ नावाचे गाव आहे. तिथून किल्ला साधारण ४५ मी आहे. आंबिवली ला पोचलो तेव्हा साधारण ९ वाजले होते. तिथे parking मध्ये आधीच काही गाड्या व दुचाकी आणि एक बस असे उभे होते. तेव्हाच कळलं की इथे गर्दी आहे. या गावातून पेठ कडे जायला खूप खडबडीत रस्ता आहे. पण Thar असल्यामुळे आम्ही ठरवलं की चला. THAR घेऊन त्या रस्त्यावर निघालो. वर खाली डोकी आपटत पुढे मागे होत, THAR पेठ पर्यन्त वर चढवली. हा रस्ता खूप कंटाळवाणा आहे. १ तास जातो पोचे पर्यन्त. जातांना आधी पोचलेले लोक चालतांना दिसत होते. चालायचेच. त्यात काही सुबक ठेंगण्या पण असल्यानी  मुलांना चेव चढला होता. चाळिशीतले सर्व चोर बरोबर जमले की परत कॉलेज मध्ये पोचतात. अर्वाच्य शिव्या आणि आत्यंतिक घाण बोलणं. नंतर हसवून आणि हसून आनंद लुटणं. आहे काय त्यात. न पैसे  पडतात ना काही. निखळ आनंद मात्र. पेठ ला पोचलो आणि गाडी पार्किंग केली ( मराठीत park केली असं  नसून parking  केली असे म्हणतात). "तिथे करा ना jeep parking" जेवण ज्याच्या बरोबर केलं तो गावकरी म्हणाला. त्याला आलोच सांगितले व आम्ही तयार हुन किल्ल्या कडे निघलो. रस्ता मस्त जंगलातून आहे. खूप सुंदर आहे. चढण थोडंसं अंगावर येते पण विशेष काही नाही. उपेंद्र कालच गडावर जाऊन आला होता. त्यांनी ट्रेक ची तयारी चालू केली होती. मी पण या आठवड्यात चालू करणार आहे. पावसाच्या सरी येत जात होत्या आणि त्यामुळे शीण अजिबात जाणवत नव्हता. वाट मळलेली आहे. खाली इतिहास आणि काही फोटो आहेत ते जरूर बघा. हा किल्ला कर्जत भागातील किल्ल्या मधला पहिला किल्ला. आता इथले किल्ले सुरु करायचे. लोणावळा खंडाळा कर्जत माथेरान चालू. कोथळीगड - नाव पण काय विशेष आहे. किल्ला उरकून आम्ही खाली पोचलो. मित्रानी मस्त गरम गरम तांदूळ भाकरी आणि पिठलं केला होता. ते खाऊन तृप्त झालो. उतरतांना मात्र खूप पाऊस होता. संपूर्ण भिजलो होतो. पण तसेच पुढे निघालो. एक  गुहा आणि भिवगड करायचा होता. चड्डी नि extra socks आणले होते, good idea. Next time onward this will happen. The whole experience was as usual very beautiful. This is now every weekend thing that is happening since last 7 months and not a single sole wants to stop anywhere. This is something we all look forward to. Some aim in life, short term, might be, but so be it. At times, come Wednesday we start discussing about the weekend trek and then we all are in the zone. Travelling gives you experiences that none can compete with. In this journey or towards the end you can say, there is more than enough learnt. Enjoy the blog and do comment, good or bad.

इतिहास :
औरंगजेबाने नोव्हेंबर १६८४ मध्ये अब्दुल कादर व अलईबिरादरकानी र्‍यांना संभाजींच्या ताब्यातील किल्ले घेण्यासाठी पाठवले. ’कोथळागड’ हा महत्त्वाचा असून जो कोणी तो ताब्यात घेईल, त्याचा ताबा तळकोकणावर राहील हे लक्षात घेऊन अब्दुल कादर याने हा किल्ला घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तो या किल्ल्याच्या जवळपास गेला आणि तेथे राहणार्‍या लोकांना त्याने आपले नोकर म्हणून ठेवून घेतले. मराठे या किल्ल्यातून शस्त्रांची नेआण करतात, हे कळताच अब्दुल कादर व त्याचे ३०० बंदूकधारी नोव्हेंबर १६८४ मध्येच गडाच्या पायथ्याशी पोहोचले. मराठ्यांनी त्र्‍यांना मागे हटवले, पण तरीही काही लोक किल्ल्याच्या मगरकोट दरवाज्याजवळ पोहोचले आणि त्र्‍यांनी ‘दरवाजा उघडा‘ अशी आरडाओरड सुरू केली. किल्ल्यावरील मराठा सैन्याला वाटले की आपलेच लोक हत्यारे नेण्यासाठी आले आहेत, म्हणून त्र्‍यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच मोगल सैनिक आत शिरले मराठे व मोगल र्‍यांच्यात लढाई झाली. अब्दुल कादरच्या मदतीसाठी माणकोजी पांढरेही आले, झालेल्या लढाईत मोगलांना यश आले.

दुसर्‍याच दिवशी मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला, फार मोठी लढाई झाली. या लढाईत बाणांचा व बंदुकींचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.या लढाईत किल्ल्यावरचा दारूगोळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. गडावर जाणारी सामुग्री मराठ्यांनी लुटल्यामुळे मुघल सैन्याला दारूगोळा व धान्य मिळेनासे झाले. दरम्यानच्या काळात अब्दुल कादरच्या मदतीला कोणीच न आल्यामुळे त्याची परिस्थिती कठीण झाली. वेढा टाकल्यानंतर दहा बारा दिवसांनी जुन्नरचा किल्लेदार अब्दुल अजिजखान याने आपला मुलगा अब्दुलखान याला सैन्यासह अब्दुल कादरच्या मदतीला पाठवले. अब्दुलखान तेथे पोहचला तेव्हा त्याची वाट अडवण्यासाठी मराठ्यांचा सरदार नारोजी त्रिंबक र्‍यांनी तेथील खोरे रोखून धरले होते. येथेही लढाई झाली नारोजी त्रिंबक व इतर सरदार धारातीर्थी पडले आणि कोथळागड मुघलांच्या ताब्यात गेला. इहमतखानाने नारोजी त्रिंबकाचे डोके रस्त्यावर टांगले किल्ला जिंकून सोन्याची किल्ली औरंगजेबाकडे पाठवण्यात आली. औरंगजेबाने कोथळागड नावाचा असा कोणता गड अस्तित्वात आहे का? याची खात्री करून मगच अब्दुलखानाला बक्षिसे दिली. मुघलांनी गडाला ‘मिफ्ताहुलफतह‘ (विजयाची किल्ली) असे नाव दिले. फंदफितुरीमुळे मराठ्यांच्या हातून हा मोक्याचा किल्ला निसटला.

गड परत मिळवण्यासाठी मराठ्यांनी प्रयत्न सुरू केले. डिसेंबर १६८४ मध्ये गडाकडे जाणार्‍या मुघल सैन्याला मराठ्यांनी अडवले. नंतर मऱ्हामतखानालाही ७००० मराठ्यांच्या तुकडीने अडवले. पण मराठ्यांना यश लाभले नाही. त्यानंतर एप्रिल १६८५ मध्ये ७०० जणांच्या तुकडीने पुन्हा हल्ला केला. २०० जण दोरीच्या शिडीच्या मदतीने किल्ल्यात उतरले. बरेच रक्त सांडले, पण मराठ्यांची फत्ते होऊ शकली नाही. मराठ्यांनी हा महत्त्वाचा किल्ला गमावला होता. पुढे १८१७ च्या नोव्हेंबरमध्ये दुसर्‍या बाजीराव पेशव्याच्या वतीने बापुराव नामक शूर सरदाराने हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यातून सोडवला. सुमारे १८६२ पर्यंत किल्ल्यावर माणसांचा राबता होता. ( ref - trekshitiz)
थोडे वर गेल्यावर उजवी कडच्या बुरुजाकडून एक वाट वर जाते आणि दुसरी दरवाज्या कडे जाते, डावीकडून. चुकण्यासारखा काही नाही. आम्ही बुरुजाकडून वर गेलो.
या बुरुजाकडून किल्ल्याकडे जाऊ शकता. तिथे एक छोटीशी गुहा आहे. त्यात साधारण ८ ते १० लोक राहू शकतात. पुढच्यावेळी नक्कीच तिथे राहण्याचा बेत आहे.



देवीचे मंदिर 


भैरोबा  ची गुहा 


कातळातल्या कोरलेल्या पाहिऱ्या 








गडाचा विस्तार तास छोटा आहे. हा किल्ला एक watch tower म्हणून उपयोगात असावा असे वाटते. 



भैरोबा 




















Tuesday, 5 June 2018

सुरगड

सुरगड -
कोलाड जवळील एक सुंदर किल्ला. महाराजांनी बांधलेल्या किल्यान मधला हा एक किल्ला. हा किल्ला लक्षात राहील कारण वर जातांना व खाली उतरतांना, दोन्ही वेळेला वाट चुकलो. :-)
आज खूप पाऊस आहे असं  वेधशाळेने सांगितलं आहे. त्यामुळे येतांना नक्की रेनकोट आणावा. याचा अर्थ आज अजिबात पाऊस पडणार नाही आणि परत ऊन वाट लावून जाणार आहे. तसेच झाले. करायचा होता सुरगड मानगड. पण झाला फक्त सुरगड. दोन्ही करणं शक्य आहे. सर्व प्रथम काही सूचना.
कोलाड हुन वैजनाथ आणि तिथून घेरा सुरगड हे गाव गाठावे. तिथे मारुती  मंदिरापाशी गाडी लावून रस्ता गडावर जातो. मळलेली वाट आहे वगरे सर्व बरोबर आहे पण आम्हाला काही दिसली नाही. आदल्या दिवशी खूप पाऊस झाला होता. वादळी पाऊस आणि त्यामुळे सर्वत्र लाल पानांचा सुंदर सडा पडला होता. अत्यंत सुंदर असं हे दृश्य होतं. पण त्या सुंदर दृश्यामध्ये आमची वाट लपली होती जी काही आम्हाला सापडली नाही. थांबायचं नाही हे धोरण असल्यानी थेट वर चढायला सुरुवात केली. रस्ता चुकलो व अव्हगड वाटेनी आर्ध्यावर पोचलो. तिथून गडाच्या माथ्याकडे बघत जात असतांना राजमार्ग सापडला. थोडक्यात गड उजवीकडे ठेऊन वाट वर जाते. तिथे एक रस्ता देवीच्या मंदिर कडे जातो तर दुसरा गडावर. जाऊदे, सापडेल तुम्हाला पण रस्ता. एक छोटासा रॉक patch आहे पण फारशी काळजी चे कारण नाही. तिथून तुटलेल्या पाहिर्यानी तुम्ही गडावर जाता.
आम्ही चौघे सोडून गडावर कोणीही नव्हता. आज जाता येता सर्वात महत्वाची म्हणजे Goecha-la Trek ची चर्चा  होती. कोण येणार आहे. कसे planning करायचे. त्यामुळे खूप उत्साही वातावरण होते. As usual discussing about all the possibilities and how all can manage to make it happen. Generally, after Talli, everyone is ready to go everywhere. But during the day in case we decide and people say yes, then we take it seriously. Everything was in planning stage. Me upya chaddi and pintu were already in and we were trying to convince others for the same. Lets see what happens.
कुंडलिका एक बाजूला तर भीमा दुसऱ्या बाजूला. किल्ला छोटा आहे. पण पाहायला बरेच काही आहे. तटबंदी, मंदिर आणि इतर सर्व. खाली चित्र आहेतच.

इतिहास :
सुरगड किल्ला दक्षिण कोकणातील शिलाहार राजांच्या काळात बांधला असावा. शिवरायांनी जे गड नव्याने वसविले त्यात सुरगडाचाही समावेश आहे. राजाराम महाराजांच्या काळात सुरगड शंकरजी नारायण सचिवयांनी सिद्दीकडून जिंकून घेतला नंतर इसवीसन १७३३ मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी सुरगड सिद्दीकडून जिंकून घेतला.त्याकाळात सुरगडावर ठेवण्यात आलेल्या कैद्यान्बद्दल नोंद आढळते.गडावरील शिलालेखावरून असे दिसून येते कि ,गडाचा हवालदार व गडबांधणार्याचे नाव सूर्याजी व किल्ल्याचे सुभेदारचे नाव तुकोजी हैबत असे होते.

इसवी सन १८१८ मध्ये फेब्रुवारी महिन्यात कर्नल प्रॉथर याने हा किल्ला घेतला. सुरगडावरून पश्चिमेला कुंडलिकानदीचे खोरे, घोसाळगड आणि अवचितगड दिसतो तर पूर्वेकडे उसर गावाजवळील वरदायिनी देवीचा डोंगर दिसतो. - (ref Trekshitiz )








Rock patch


तटबंदी अजून शाबूत आहे. 


There is a 50 ft fall below. But the rock patch is not that difficult. Precaution is better than cure. Carry a rope along for safety. 



शिलालेख खूप सुंदर आहे. नक्की पहा. 








मारुतीची मूर्ती गडावर गेल्या गेल्या उजवीकडे आहे. पानवती ला पायाखाली चिरडले आहे. माझा आयुष्यात टी अजून जिवंत आहे. तिला कधी चिरडणार मी मलाच माहित नाही. पण लवकरच. नाही तर ती मला चिरडलं आता. 


शंभो 



Tuesday, 29 May 2018

लोहगड

लोहगड

बाकी काही लिहिण्य आधी मला वाटतं एक माझी आठवण तुम्हाला सांगावी. मी भूषण घोरपडे उर्फ वाष्ट्या, आमोद गद्रे उर्फ जाड्या, आशुतोष भडभडे उर्फ तोष, कौस्तुभ देशमुख उर्फ कौस्त्या आणि स्व. अतुल वैद्य उर्फ आतल्या असे जिवाभावाचे मित्र, शाळेत असतांना या ठिकाणी आलो होतो. लोकल नी  मळवली  ला उतरून चालत भाजा च्या लेण्यात राहून हे दोन किल्ले केले होते. लोहगड आणि विसापूर. मला वाटतं मी तेव्हा ८ मध्ये  होतो. आमचा मुलांचा एकटे जाण्याचा पहिलाच ट्रेक. जाड्याचे वडील काही त्याला सोडत नव्हते, म्हणून त्यांना पटवायला मला नेले होते. हा ट्रेक नसून ट्रिप आहे, व आम्ही तिथे एक धर्मशाळेत राहणार आहोत जिथे माझे एक ओळखीचे आहेत. ते आमची सोय करणार आहेत आणि जेवण व राहणं त्यांच्या  कडे लागलं  आहे. आत्मविश्वास काय असतो हे तेव्हा मला कळले. कदाचित बरेच वेळेला बऱ्याच विषयात इंजिनीरिंग ला नापास होऊन एकदाही orals मध्ये नापास झालो नाही हे त्याचमुळे . आमोद नी त्यामुळे येतांना कामाची चे बूट एक बॅग व काही छान  कपडे  बरोबर आणले होते. तुफान पाऊस होता आणि त्याचे बूट फाटले व बॅग तुटली. अर्थातच हा ट्रेक होता तेव्हा. ट्रिप नाही. दर क्षणी आम्ही इतर मित्र त्याला हसत होतो आणि आज पण तो ट्रेक उर्फ ट्रिप चा विषात निघाला कि हसू येते. तेव्हा त्या लेण्यां मध्ये खूप वटवागूळ  होती आणि त्यांनी रात्री सर्वांना रंगवलं  होतं . तिथे छान शेकोटी केली होती आणि खिचडी शिजवली होती. आता सर्व बंद केला आहे तिथे. काही करू देत नाही आणि राहू पण देत नाहीत. अर्थात काही समाज कीटकांनी घाण करून टाकली आहे. यांना बापाचा राज्य आहे असे वाटते आणि त्यामुळे कुठेही काहीही करू शकतील हा आत्मविश्वास आला आहे. पुढाऱ्यांचे तट्टू नाही तर किरकोळ अक्कल असलेल्या आणि काही दिवस भाई म्हणून राबणाऱ्या कुठल्यातरी गल्लीतले छोटे गुंड. किंवा याच्याशी ओळख आहे, तो भाऊ आहे म्हणून दम देणारे छक्के इतके वाढले आहेत की यांची स्वच्छता करणे खूप गरजेचे झाले आहे. महाराज म्हणायचं आणि इथेच येऊन घाण करायची. गडाखाली गाडी वर मोठं  महाराजांचा चित्र, आणि गडावर येऊन हागणाऱ्या  ह्या लोकांनी सर्वत्र घाण केली आहे. माफ करा. माझा संताप तुम्हाला कळेल जर तुम्ही या पवित्र ठिकाणी पोचलात तर. असो.
तर असे हे दोन किल्ले . लोहगड आणि विसापूर.
लोहगड बद्दल सांगायचं तर भारतीय पुरातत्व विभागाने अत्यंत उत्तम असे काम केले आहे. गडावर जाण्यासाठी नीट पाहिऱ्या, वर जातांना नकाशा, स्वछता, वर सर्वत्र कचराकुंड्या ठेवल्या आहेत. तरी सुद्धा हे न वापरणारी काही मूर्ख माणसं  दिसतात. मग त्यांना नम्र भाषेत जमलं तर सांगावे. नाही ऐकलं तर काठीने बदडून काढावे.  लोहगडावर बघण्या सारखे खूप काही आहे. त्यातील काही फोटो खाली आहेत. पण तिथे जाऊनच अनुभव घ्यावा. सहल म्हणून आता लोहगडावर आता सहज जाता  येते. खाली गाडी लावावी आणि वर जावे. पार्वती इतका चढायला आहे. वर पाहायला खूप आहे आणि साधारण २ तास जातात. विंचूकाट्या पर्यन्त आता नीट रस्ता केला आहे. किरकोळ ट्रेकिंग चा अनुभव घेता येतो. गणेश, नारायण, हनुमान आणि महादरवाजा असे सुंदर चार दरवाजे आहेत. तटबंदी अजून शाबूत आहेत. अप्रतिम दगडांनी बांधलेला हा किल्ला खूप देखणा आहे. इथे आलो की कळतं  किंवा अंदाज येतो कि इतर किल्ले कसे असतील. शान, श्रीमंती, ताकद काय असेल ते इथे आलं की  कळतं. इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. अंगावर काटा येतो. या किल्ल्यांची खूप वेगवेगळे राजे महाराजे पहिले आहेत. दगडादगडावर नीट पहिले तर सर्व उमटलेले दिसेल. रक्तपात दिसेल.
 कान लावाल तर घोड्यांच्या टापांचे आवाज ऐकू येतील. लोहगड काही औरच आहे.

इतिहास :
लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आहे. किल्ल्याची निर्मिती जवळ असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच सत्तावीशसे वर्षांपूर्वी झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या. इ.स १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले, त्यापैकीच लोहगड हा एक महत्वाचा किल्ला होता. इ.स १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुर्‍हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ.स १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. इ.स १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरत लूटेच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. इ.स १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंगर्‍यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा, शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुर्‍यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुर्‍यांचा कैलासवास झाला. १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला पण नंतर दुसर्‍या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले. (Ref - Trekshitiz)


 































वज्रगड प्रदक्षिणा

 वज्रगड प्रदक्षिणा  अधिक महिना या वर्षी. त्यामुळे श्रावण चालू झाला नसून पण 'क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे' ही बालकवी य...