Monday, 22 April 2019

पांडवगड - उन्हाळ्याच्या सुट्टीतला



पांडवगड
सातारा जिल्ह्यातील वाई जवळपास अनेक किल्ले उभे आहेत. त्यात वैराटगड, केंजळगड, कमळगड, रायरेश्वर पठार आणि पांडवगड एकमेकांकडे पाहत धोम धरणाच्या काठाशी सापडतील. अर्थात वैराटगड जरा पुढे आहे. मागच्या वेळी हनुमान जयंतीला चंद्रोदय कुर्डुगडामागुन झालेला आम्ही सर्वांनी पहिला होता. जणू शंकराच्या पिंडीमागून गंगा. ती मंतरलेली  रात्र आम्ही सर्व मित्रांनी एकत्र अनुभवली होती. या वर्षी पांडवगड चा योग आला आणि मी पप्या BD Chetan आणि पिंटू THAR  मधून दुपारचे निघालो. ऊन रणरणतं होते हे सांगायला नको. पण मला आनंद की ट्रेकिंग परत चालू झाले. बराच मोठा break होता तसे म्हणायला गेलो तर. 
वाई हुन गणपती मंदिर डावीकडे ठेऊन धोम धरणा कडे रस्ता जातो. तो रस्ता पुढे केंजळ रायरेश्वर ला जातो. वाई हुन साधारण ८ ते १० कि मी वर उजवीकडे मेणवली नावाच्या गावाचा रस्ता जातो. हेच ते पायथ्याचे गाव. गुंडेवाडी नावाचे दुसरे गाव आहे पलीकडच्या बाजूला आणि तिथून पण किल्ल्यावर जाता येते. THAR घेऊन पोचलो आणि एक सुंदर, खूप मोठं आणि सळसळणारं, लांब पारंब्यांचे झाड शोधले आणि गाडी तिथे लावून टाकली. 

भरपूर पाणी होतं त्यामुळे तशी काही काळजी नव्हती. मागच्या वेळी मी आणि पप्या माणिकगड केला तेव्हा शिकलो होतो चांगलाच धडा. मळलेली वाट आहे. किल्ला डावीकडे ठेऊन सरळ चालत राहा. तुम्हाला लांबवरून काही भगव्या खुणा दिसतील . रस्ता तोच घ्या. सोंडेवर वगरे जाऊ नका उगाच दमछाक होते. सरळ लांब वर तुम्हाला एक खिंड दिसेल आणि तिथे एक मंदिर. मंदिराच्या मागून मळलेली वाट आहे जी थेट तुम्हाला गडावर नेते. 

मेटावर पोचायला आम्हाला तास भर गेला. खूप ऊन होतं आणि आम्ही थांबत थांबत जात होतो. गड मोठा आहे आणि चढायला बराच आहे. मेटावर पोचलो तेव्हा ४ वाजले होते. तिथे काही वस्ती आहे, एक विहीर आहे आणि एक मंदिर आहे. भैरोबाचे. तिथून किल्ल्यावर पोचायला ३० मी लागतात. 



किल्ल्यावर पोचलात की एक पडके प्रवेशद्वार आहे. तिथून माचीवर प्रवेश होतो. गोल चक्कर मारून बालेकिल्ल्यावर जाण्याचा रस्ता आहे.  डावीकडे सुंदर मारुती मंदिर आहे. मंदिरासमोर चुन्याचे घाणे आहे. पप्या आणि पिंटू नी काही निष्फळ प्रयत्न केले चक्र फिरवायचे. मंदिरात निवांत बसलो. ५. ३० ला काही झालं तरी उतरायचे असे ठरले त्यामुळे घाई घाईनी उरलेला किल्ला बघायला सुरु केला. 






Two Ps


बजरंगबली च्या मंदिरात निवांत एक क्षण 

बालेकिल्ल्यावर बरेच काही अवशेष पहिला मिळतील. पांडजाई देवीचे एक पडके मंदिर आहे. त्यामागे शंकराचे पडलेले मंदिर आहे. काही मुर्त्या इथे आढळतील. थोडे पुढे एक पाण्याचे टाके आहे. सुकलेले आहे. बालेकिल्ल्यावर येताना खाली खूप सुंदर टाक्या आहेत. ७ ते ८ टाक्या आहेत. तिथे पुढे तो प्रसिद्ध पारशाचा बंगला आहे. बरेच काही ऐकले होते या किल्ल्या बद्दल. परवानगी  लागते,तो येऊ देत नाही, कुत्री सोडतो वगरे वगरे .... असे काहीच नाही. किल्ल्यावर आम्ही सोडून कोणीच नव्हते मात्र. शांत निवांत वाटत होते. 














इतिहास 
चालुक्र्‍यांच्या राज्र्‍यांनतर शिलाहारांनी पन्हाळा - कोल्हापूर दख्खन या भागावर राज्य चालविले. १९९१ - १९९२ मध्ये सापडलेल्या ताम्रलेखानुसार शिलाहार राजा दुसरा भोज याने हा किल्ला बांधला, असे पुरावे आढळतात. हा किल्ला प्रथम आदीलशाहीत होता. ७ ऑक्टोंबर १६७३ मध्ये मराठ्यांनी तो जिंकला. पुढे १७०१ औरंगजेबाने हा किल्ला घेतला. त्यानंतर शाहु महाराजांनी किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला इ.स १८१८ मध्ये इगजांनी पांडवगड आपल्या ताब्यात आणला. ref - trekshitiz

ट्रेक छान झाला. उन्हाचा तसा फार त्रास कोणाला झाला नाही. तिथून निघून मांढरदेवी घाटातून भोर ला पोचलो. निवडणूका  जवळ आल्या होत्या त्यामुळे विषय चालूच होते. इकडून तिकडून विविध चर्चा आणि हसणे हसवणे चालू होते. खूप महिन्यांनी मी परत जागेवर आल्याचे जाणवले, मलाच. मानसिक शांतता असली की कोणाचे बोलणे टोचत नाही. कालच पौर्णिमा झाली होती त्यामुळे चंद्रोदय झाला तेव्हा सर्व जण त्या तांबूस गोऱ्या दिसणाऱ्या चंद्राकडे बघून खुश झालो. पुढच्या ट्रेक ची चर्चा चालू होईलच. जय बजरंगबली. 
फोटो contribution - चेतन, पिंटू आणि मी. 













Monday, 4 March 2019

माणिकगड - बलाढ्य


माणिकगड 
रतनगड कळसुबाई झाल्यावर बराच काळ गेला होता. कामामुळे म्हणा नाही तर इतर कारणांनी काही weekend तसेच गेले. पप्या आणि शिरीष पाताळगंगा MIDC मध्ये काही कामा  निमित्तानी जाणार असे कळले आणि हा ट्रेक पार पडला. २ ची त्यांची मीटिंग आहे, त्यामुळे सकाळी ६ ला निघून पाताळगंगा MIDC च्या मागे आहे तो माणिकगड करून टाकू. २ ला बरोबर वेळेवर मीटिंग ला. चूक. भली मोठी. 

पुणे मुंबई रस्त्यावर अनेक किल्ले आहेत. पाताळगंगा MIDC ला जातांना उजवीकडे डावीकडे प्रबळगड, कर्नाळा, इर्शाळगड असे सुंदर किल्ले आहेत. कलावंतीण आहे. तिथूनच पुढे गेल्यावर डावीकडे एक न दिसणारा, लपलेला आणि तसा फार प्रसिद्ध नसलेला माणिकगड  किल्ला उभा आहे. खूप उंच आहे. वडवली गावापर्यन्त ST जाते. तेच ते पायथ्याचे गाव. जातांना श्रीकृष्ण लोणावळा येथे खादाडी करून साधारण ९.३० च्या सुमारास गडाच्या पायथ्याशी पोचलो. गाडी लावून तिथे एका गवळ्याला विचारून निघालो. त्यांनी निघतांना सांगितले की पुढे एक वस्ती लागेल, तिथे वाटाड्या घ्या आणि मग वर जा. आम्ही ते विसरलो. 
१....... सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे, या किल्ल्यावर जातांना वाटाड्या घ्या नाही तर भोगा. रस्ता मिळत नाही. सापडत नाही. आम्ही हरवलो आणि हरवत हरवत वर पोचलो. दोन टेकड्या आहेत समोर आणि त्या मागे माणिकगड आहे. या दोन्ही टेकड्याच्या उजवीकडून रस्ता पठारावर जातो. तिथून खरा किल्ला दिसतो. गावापासून किल्ल्याच्या माथ्यावर पोचायला २.५ तास सहज लागतात. 
२....... उन्हाळ्यात हा ट्रेक शक्यतो करू नका आणि केला तर मात्र पाणी भरपूर जवळ ठेवा. वर काही पाण्याचे टाके आहेत पण पाणी पिण्या सारखे नाही. 
मी आणि पप्या गप्पा मारत मारत रस्ता शोधत पुढे चाललो होतो. ऊन वाढत चाललं होतं. जमीन तापत चालली होती. FALL ज्याला म्हणातात त्याप्रमणे पूर्ण जमीन रंगीबेरंगी पानांनी सारवली होती. सुंदर दृश्य. याचे सौंदर्य इतके की सर्व पाऊलवाटा झाकलेल्या. 




त्यामुळे दिशा एकच होती. गडाच्या दिशेनी. दोन टेकड्यांच्या वर पोचून मोठ्या पठारावर पोचलो आणि रस्ता मिळाला. मारुती चे मंदिर दिसले आणि हुश्श् झालं. तिथून गडाचे दर्शन सुंदर होते. पूर्ण वळसा मारून गडावर जायचा रस्ता आहे. तटबंदी काहीशी उरली आहे. हा एक watch  tower असावा. वर गेल्यावर काही टाक्या आहेत, माहादेव मंदिर आहे आणि वाड्याचे अवशेष आहेत. या किल्ल्यावर आम्ही सोडून कोणीच नव्हते. आमच्या सारखे वेडे आम्हीच. पाणी संपले आणि उतरतांना १ च्या सुमारास जो काही त्रास झाला आहे की ब्रम्हांड आठवले. ट्रेक पूर्ण झाला, एक काम होते  MIDC मध्ये, ते झाले आणि पुण्याला परत पोचलो. 
















वरील काही उत्तम फोटो हे शिरीष आणि पुरुजीत न काढलेले आहे. 
ट्रेक नक्की करावा पण दोन तीन गोष्टींची खबरदार घेणे गरजेचे आहे. 




















Sunday, 17 February 2019

Run Jokers Run in Prahar to How's the JOSH in URI !!!





शाळेत असतांना प्रहार नावाचा नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आला होता. माला आठवते  की निलायम टॉकीज़ ला तो पाहिला होता. NDA  वेड अणि Armed Forces  मध्ये जायची इच्छा खुप लहानपणी पासून होती. अजूनही आहे. अर्थात तेव्हा कळले की तिथे जायची पात्रता माझा मध्ये नाही. Forces  मध्ये प्रवेश मिळवायला Mental, physical and emotional  fitness खूप गरजेचा आहे. प्रहार पाहिला आणि तेव्हा सुद्धा Bus मधल्या अतिरेक्यांना मारल्या वर जय हिंद आणि भारत माता की जय च्या आरोळ्या ठोकल्या. १९९१ ला चित्रपट आला. २०१९ ला उरी पाहिला गेलो आणि अंगात संचारल्या सारखे परत शेवटी त्याच आरोळ्या ठोकल्या. छान वाटलं ओरडून. शेजारी करण आणि तन्वी बसले होते. त्यांना कदाचित वाटले असेल की बाबा असे काय करतोय. असे काय वागतोय. खरं सांगू ना तर त्यांना मी सांगू शकत नाही की मी इतकच करू शकतो. आरोळ्या ठोकण्याशिवाय आणि फेसबुक वर जाऊन काही तरी लिहिण्याशिवाय अथवा इथे blog  वर विचार मांडण्याशिवाय ..... प्रयत्न कमी पडले, मी नाही clear करू शकलो  S S B. नाही तर मला पण ठोकायला मिळाले असते या पाकिस्थानी अतिरेक्यांना. खूप त्रास होतो आणि रक्त खवळते. आजही. आजही तेव्हडेच तसेच त्याच कारणांनी ....त्याच आपल्या बांधवांच्या मृत्यूमुळे .... त्यांच्या बलिदानामुळे ....
१९९१ - २०१८ काय फरक पडला आहे. माझ्या भावना जर त्याच असतील तर काय फरक पडला आहे. मी विचार करत होतो. एक सकारात्मक विचार, ज्याला शांतपणा, सद्सद्विवेक बुद्धी, सहनशीलता वगरे ठेऊन केला जातो आणि दुसरा शंभो विचार.

१९९१ प्रहार time  पासून ते आत्ता २०१९ उरी time भारतात बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. Development च्या दृष्टींनी आपण १०० वर्ष पुढे आलो आहे. भारताची १०० वर्ष. एकीकडे अवकाशात सॅटेलाइट पाठवणारे ISRO, पासून ते जगात नाव कमावणारे Infosys, TATA सारखे बलाढ्य समूह. जगात Google आणि Microsoft चालवणारे पण आज आपलीच माणसे आहेत. जगावर प्रभाव टाकत गेले किती तरी वर्ष भारत सर्व अतिरेकी हल्ले सहन करत आला आहे. आपला देश हा सहनशील आहे. युद्ध झाले  तर development मार खाईल. आणि नागरिक मारले जातील. जिवीत हानी होईल. त्यामुळे एकीकडे सौरक्षण आणि एकीकडे आधुनिकरण असे प्रयत्न चालू आहेत. गम्मत म्हणजे त्यावेळी बोफोर्स चे घोटाळे होते आणि आज Rafale चे घोटाळे समोर आणण्याचा प्रयत्न. भारत हा प्रगतीपथावर आहे त्यामुळे युद्ध नको. आत्ता सहन करा. आपलं काय जातंय. कोणी तरी Director / Producer already स्पॉट वर जाऊन फोटो काढून चित्र रंगवून नवीन dialogues लिहायला सुरु केले असतील. पुढं चित्रपट लवकरच येईल तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात......

१९९१ प्रहार time  पासून ते आत्ता २०१९ उरी time भारतात बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत......Bombay  Attack, Parliament, Gujarat, Pune, हैदराबाद, कुठले शहर जिथे हे झाले नाही..... जम्मू काश्मीर खोऱ्यात तर दररोज चालू आहे. कधी अतिरेकी मारतात तर कधी दहशदवादी, कधी उल्फा तर कधी नक्षलवादी..... काही नाही तर गल्ली बोळातले या दळभद्री आणि खरकट्या राज्यकर्त्यांनी पाळलेले गुंड. ते इथे राहून हल्ले करतात, सामान्य माणसावर हे अतिरेकी आत्मघातकी हल्ले करतात. डोकी शून्य असलेली. मरतात कोण तर आपलीच माणसं. मग मनात विचार येतात. ताज च्या हल्यात पोलिसांनी अतिरेक्यांना मारून टाकले. त्यांच्या चिथड्या केल्या. म्हणजे त्यांना हे सर्व शक्य आहे. मग त्यांना इथेच राहणाऱ्या दररोज दिसणाऱ्या गुंडांना मारणं का शक्य नाही. हे का विचार हे पण सांगतो. आज आपण इतके सहनशील झालो आहोत की शहरातल्या गुंडांना काही करू शकत नाही. हे तर मोठे अतिरेकी आहेत. त्यांच्या कडे सर्व शास्त्र आहेत. ते षंढ पण आहेत कारण लपून हल्ले करतात. मग या गांडुळांचे खत म्हणून वापर करण्याशिवाय काय करावे. Wednesday सारखे चित्रपट येतात आणि अजून काही तरी  सांगून जातात. सहन किती करायचे आणि कधी पर्यन्त करायचे. इथे जात पात धर्म काही नाही. इथे फक्त वाईट आणि चांगले हे दोनच. महाराजांचा आदर्श ठेवणारे आपण, का नाही या गनिमांना, एकत्र येऊन मारत. का नाही क्रांती होत परत. का नाही देश एकत्र येऊन या सर्वांचा या प्रवृत्तीचा नाश करत. Indian  Armed   Forces are more than capable to crush the bastards. Then why not. फक्त जवानांनीच आहुती द्यायची आणि त्यांनीच बलिदान द्यायचे असे का ? नागरिक या नात्यानी देश सौरक्षणाची आपली काही जवाबदारी नाही काय ? US  चे अनुकरण करतो आपण.....बऱ्याच बाबतीत. मग तिथे १८ वर्ष झाला मुलगा की त्याला एक वर्ष देशासाठी द्यावे लागते वेळ आली की. एक हल्ला झाला WTC वर आणि त्या नंतर कोणीही डोळे वर करून पाहू शकले नाहीत. मग आपण इतके वर्ष का सहन करत आहोत. 

या हल्ल्यातून एकच एक गोष्ट समोर येते की हे परत परत होणार. मुळापासून उखडले नाही तर हे परत होणार. या हल्यात हे पण नक्की आहे की हा एक माणूस नुसता या मागे नाही. कारण त्यांना इतके डोकंच नाहीये. कोणीतरी मदत करत आहे. सर्व हालचालींवर डोळा आहे. आणि त्यामुळेच हे घडू शकले. "या हल्ल्याचा निषेध व्यक्त करतो" - घंटा निषेध. आता हे निषेध वगरे सर्व बस झाले. आता उध्वस्त करायची वेळ आली आहे. काश्मीर आमचं आहे आणि ते आमचच राहणार आहे. तुम्हाला आता शाल श्रीफळ देऊन घरी पाठवणार.... शालीचा रंग लाल आणि श्रीफळाचा काळा..... 

थांबवले पाहिजे. मी तयार आहे. बलिदान द्यायला, देशासाठी मारायला......... जय हिंद !!! 



























Saturday, 26 January 2019

कळसुबाई - उंच आभाळातली

कळसुबाई  

कालचा दिवस स्वर्गीय पार पडला. पायांना पण ते जाणवत होते. रतनगड वर निवांत वेळ घालवून संपूर्ण पाहून साधारण १६ कि मी चालणे झाले होते. ट्रेकिंग झाले होते. अमृतेश्वर मंदिर पाहून खरंच मन भरले. ट्रेक करून आम्ही कॅम्पिंग करायचे ठरवले होते, आणि तशी सर्व तयारी पण केली होती. भंडारदरा, काठाशी कॅम्प लावून छान संध्याकाळ पाण्या शेजारी सूर्यास्त बघत घालवावी, असा विचार मनात होते. रतनवाडी हुन निघालो आणि भंडारदरा काठाशी पोचलो. डावीकडे पहिला तर साधारण १०० एक tents आधीच लागली होती. music चालू होते आणि तिथे Watersports  वगरे activities  चालू होत्या. एकंदरीत बाजार भरला होता. बसेस, गाड्या अश्या असंख्य वाहनांनी ती जागा पूर्ण भरून गेली होती. तिथला आनंद घेणे अशक्य होते. त्यामुळे तिथून निघालो आणि एक सामान्य हॉटेल मध्ये येऊन टेकलो. आवराआवर करून एक समाधान नावाच्या छोट्याश्या पण अत्यंत चविष्ठ अशा ठिकाणी जाऊन जेवलो. तिथे गेलात तर समाधान मध्ये नक्की जेवण करा, अप्रतिम आहे. तिथले वेटर काका मध्येच english मध्ये बोलत होते. का माहित नाही. जेवण करून आम्ही सर्व गाड झोपी गेलो. 
सकाळी ६ ला निघायचा बेत होता. तसे उठून चहा पाणी करून आम्ही साधारण ६. ३० ला निघालो आणि ७ ला कळसुबाई च्या पयाथयशी पोचलो. Geography मध्ये महाराष्ट्र शिकत असतांना हे नाव आले होते. महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिखर कुठले तर कळसुबाई. तिथे गेल्यावर हा काय प्रकार आहे हे नक्कीच कळले. उजाडत होते आणि वर दिव्यां चा प्रकाश हलताना दिसत होता. खूप लोक तिथे वर आहेत याची जाणीव झाली. खूप म्हणजे नंतर कळले की साधारण १००० लोक तरी असतील सहज. आम्ही निघालो. चालायला सुरु केले आणि वाटेवर वेगवेगळ्या टपऱ्या लागत होत्या. सर्व प्रकार चे अन्न मिळत होते. टप्प्या टप्प्यात, सपाटीवर ही  सर्व हॉटेल्स छान बसली होती. चढायला लागलो की कळत नाही की हा डोंगर किती मोठा आहे. एका टप्प्यावर आलातकी  पुढचा दिसतो आणि पुढचा टप्पा तेव्हडाच मोठा आहे हे तेव्हा कळते. २ तास न थांबता एका वेगानी आम्ही चढत वर पोचलो. वरच्या टप्प्यात शिड्या आहेत. आणि इथेच प्रचंड गर्दी होते. 
माथ्याच्या पायथ्याशी सर्व सुखसोई आहेत. राहायची सोय आहे. तिथे साधारण रु ७०० per  head  घेऊन tent  लावून देतात. जेवण छान मिळते आणि एक विहीर आहे त्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम नाही. त्याच हॉटेल / टपऱ्यांमध्ये आदल्या दिवशी आनेक  ट्रेकिंग club ची पोरं पोरी आल्या होत्या. मुंबई आणि त्या भागातील मंडळी जास्त होती. एकंदरीत वातावरण, दृश्य :-) सुंदर होते. असे काही असेल याची कल्पना नव्हती त्यामुळे पोरांचा शीण क्षणात निघून गेला. 
कळसुबाई चे मंदिर माथ्यावर आहे. तिथून अलंग मदन कुलंग चे दृश्य खूप सुंदर दिसते. त्या किल्ल्यावर कधी जायचा योग येईल माहित नाही. 
मानसिक आहे, पण कळसुबाई केल्यावर एक वेगळाच आनंद मिळाला. इथे तुमच्या स्टॅमिना ची नक्कीच कसोटी आहे. तुमचा fitness नक्कीच टेस्ट होतो. अर्थात सर्वात मोठे शिखर आहे, महाराष्ट्रातले. वर एक तासभर थांबून आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. गाडी पाशी विहिरीवर almost  पोरांनी अंघोळी केल्या, खादाडी केली आणि गाडीत  बसून परतीच्या मार्गावर आम्ही निघालो. नारायगाव ला भुजबळ बंधूंचे  एक हॉटेल आहे श्रीराज नावाचे. तिथे मटण भाकरी आणि मासवाडी चेपली आणि घराकडे निघालो. आमचा ट्रेक छान झाला. पुढच्या weekend चा काय प्लॅन यावर चर्चा सुरु होईलच.





































वज्रगड प्रदक्षिणा

 वज्रगड प्रदक्षिणा  अधिक महिना या वर्षी. त्यामुळे श्रावण चालू झाला नसून पण 'क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे' ही बालकवी य...