Tuesday, 9 May 2023

खांदेरी



खांदेरी 

ग्रुप वर सचिन चा मेसेज आला की शुक्रवार शनिवार कोणी खांदेरी ला येऊ इच्छित आहे का ? क्षण भर विचार करून आणि काही कामाच्या गोष्टी मार्गाला लावून मी त्याला होकार दिला. हा ग्रुप म्हणजे ट्रेककरी ग्रुप. नावच त्याचे ते. साधारण एक ते दीड वर्षांपूर्वी मला या ग्रुप मध्ये प्रवेश मिळाला. सहज नाही हे बरका. परिमाण मोठे आहे. High Altitude ट्रेकिंग मध्ये eight  thousanders ला विशेष आदर असतो. ते आमच्या साठी एक आदर्श असतात. आणि त्यांचे कौतुक असते. ट्रेकिंग मध्ये त्यांनी केला काय आणि मी केला काय आनंद तोच असतो. इथे चढाओढ, राग, द्वेष आणि EGO ला कुठेच जागा नसते. एकमेकांना धरून आणि प्रोत्साहन देऊन पुढे कसे जाता येईल हेच बघायचे असते. आणि शेवटी त्या निसर्गानी जर का कृपा केली तर आपण शिखरावर पोचतो. त्याच्यामुळेच. तर या ग्रुप मध्ये असेच दिग्गज लोक आहेत. लपलेले तारे आमच्या ट्रेकिंग चे. सर्वांना एकत्र केले तर साधारण १००० वर्षांचा अनुभव सहज गोळा होईल. हे सर्व Three Hundreders आहेत असे मी म्हणतो. त्यांना त्याचे काही फार नाही. Three hundreders म्हणजे काय ? यातील बरेच लोकांचे ३०० हुन अधिक किल्ले झाले आहेत. काही लोकांचे काही किल्ले दोन वेळा पण झाले आहेत. 

तुम्हाला माहिती होते का, की आपल्या महाराष्ट्रात ३०० हुन अधिक किल्ले आहेत ? अहो ३५० किल्ले आहेत. नुसते किल्ले हिंडणारी जनता नाही ही. चालते बोलते encyclopedia आहेत. किल्ल्याचा इतिहास, त्याची बांधणी, झालेल्या लढाया, असलेली देऊळं आणि त्याचे महत्व. सर्व काही माहिती - त्या मध्ये सर्वात तज्ज्ञ आणि महितगार म्हणजे Dr. सचिन विद्याधर जोशी. डेक्कन कॉलेज - Post  Graduate and  Research Institute, मध्ये Archaeology डिपार्टमेंट मध्ये researcher आहे. अशक्य knowledge नी भरलेला हा माणूस आहे. सचिन नी पुस्तकं पण लिहिली आहेत, दुर्गवैभव, दुर्गा जिज्ञासा, दुर्गवेध. जमले तर नक्की वाचा. याच्या बरोबर ट्रेक ला जायचे म्हणजे एक वेगळेच सुख असते. दगडा दगडाची माहिती असलेला हा माणूस  "पुराव्यांनी शाबीत करिन" सारखा आहे. पण खरंच कुठलेली वाक्य पण संधर्भ न देता बोलत नाही. कधी कधी आमच्या भावनेंना टोचून पण जातो. कारण एकच - त्याचे अजून पुरावे मिळाले नाही - असे त्याचे म्हणणे असते. हेवा वाटतो त्याचा मला, त्याची passion बघून आणि त्याचे dedication पाहून. 

तर त्याच्या ग्रुप वर message आला आणि इथून २ गाड्या निघाल्या. वाघ्या उर्फ ऋषिकेश वाघ another ३०० + माणूस माझा कडे ६ ला पोचला. इथून मी भूषण केतकी आणि दोन ऋषिकेश अलिबाग च्या दिशेनी निघालो. वाटे मध्ये अजिंक्य भावे, राहुल घोलप, शशी, संतोष आणि काका असे पाच जण भेटले आणि आम्ही निघालो. वाटे मध्ये जातांना दोन ऋषिकेश एकाच कंपनी साठी पूर्वी काम करत होते असे कळले. त्यांची ओळख आणि इतर लोकांची ओळख झाली आणि गप्पा रंगायला सुरुवात झाली. या गप्पा रेकॉर्ड केल्या तर एखादा ग्रंथ बनेल. अर्थात त्यातील निरर्थक गोष्टी काढल्या तर त्याचा पण best seller बानू शकेल आज काल च्या self help आणि motivational पुस्तकांच्या दुनियेत. आमच्या साठी हेच ते जे काही आहे ते. Stress घालवण्याचे साधन, आला तर. आमच्या गप्पांचे रस्ते शिवकालीन घोडे मार्गांपाससून ते आत्ताच्या उभारलेल्या खरकट्या रस्त्यान पर्यन्त literally वळत होते. ब्रेकफास्ट झाला वडखळ नाक्या जवळ आणि आम्ही मांडवाच्या दिशेनी गेलो. वाटेत पेणच्या बाप्पाचे दर्शन घेतले. काही वर्षांपूर्वी मी आणि पप्या ( पुरुजीत) पुणे अलिबाग असे सायकल वर आलो होतो. तेव्हा आठवते मला की या मंदिरामध्ये काही काळ विसावले होतो. छोटेसे पण सुंदर मंदिर आहे. अर्थात गणू ची सर्वच मंदिरे भारीच असतात. 









पाडव्याला पोचल्यावर बरेच वेळा अग्निपथ चा dialogue झाला - ' हवा तेज चलती है दिनकर राव, टोपी सांभाळो नाही तो उड जायेगी'. आमच्या साठी बोट वाट पाहत उभी होती. ३ दिवस सुट्टी असल्यानी रस्त्यावर गर्दी होती. 

सर्वांनी आपापल्या सॅक बोटीवर चढवून प्रस्थान केले. लांबवर Bombay High आणि त्याच्या मागे मुंबई ची सुंदर Skyline दृष्टीस पडत होती. स्पीड बोट मध्ये उड्या मारत कसे बसे मोबाइल मधून फोटो काढत आम्ही गोल चक्कर मारून खांदेरी च्या दिशेनी जायला लागलो. खांदेरी समोर आणि त्याच्या डाव्या हाताला उंदेरी असे दोन बेटांवर दोन किल्ले दृष्टीस पडले. लांबवरून दोन गोष्टी चुकू शकत नाही - एक म्हणजे Light House  आणि दुसरे म्हणजे २६/११ नंतर बांधलेले अत्याधुनिक रडार. बोट खांदेरी ला टेकली आणि तिथे इतर कोळी लोकांनी दोर ओढून बोटीला बोट लावली. एका वरून दुसऱ्या बोटीवर उड्या मारत आम्ही खांदेरीवर पाऊल ठेवले. सर्व सामान काढून आम्ही निघालो. सचिन  आणि अजून काही मंडळी आधीच तिथे पोचले होते. त्यात संदीप परांजपे नावाचा एक गृहस्थ भेटला. तो माझा आधीच्या परिचयाचा होता. एकंदरीत आम्ही १४ लोक तिथे पोचलो होतो. 

किल्ल्या वर जातांना उजवीकडे काही ख्रिती कोळी लोक नव्या क्रॉस ची बांधणी करतांना दिसले. इथे तुम्हाला मंदिर, चर्च तत्सम, बुद्ध मूर्ती आणि एक कबर असे सर्व बघायला मिळते. सर्व धर्म समभाव असा हा किल्ला आहे. 

ऊन बरेच होते आणि आम्ही वर Light House  च्या परिसरात सुखावलो. सचिन नी जेवायची सोया केली होती. थोडे निवांत बसून गप्पा झाल्या. त्यानी सांगितले की जेवण उरकून थोडा वेळ विश्रांती घेऊन किल्ला बघायला सुरु करू. खांदेरी एक बेट आहे. २१ बुरुजांनी त्याला सर्व बाजूनी सौरक्षण दिले आहे. किल्ल्याची तटबंदी अजून शाबूत आहे. थोडीशी विश्रांती झाली आणि आम्ही एक दगड बघायला गेलो. त्या दगडावर अजून एका दगडानी मारल्यास धातू वर जसा आवाज येईल तास आवाज येतो. काही तरी नवीन.












आत्ता पर्यन्त पाहिलेल्या किल्ल्यामध्ये सर्वात घाण केलेला किल्ला म्हणून याचा नंबर १ आहे. असंख्य दारूच्या बाटल्या आणि इतर घाण यांनी कोपरा ना कोपरा व्यापलेला होता. जिथे दगड दिसेल तिथे लोकांनी आपली नावे लिहिली होती. कदाचित या नावाचे मूर्ख इथे येऊन गेले हे त्यांना लोकांना सांगायचे असावे. बघून खरंच राग येतो आणि हताश होतो. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. असो. 

दगड बघून आम्ही sea peer वर गेलो. तिथून किल्ल्याची तटबंदी खूपच भारी दिसत होती. वाऱ्यात गप्पा मारून आम्ही वेताळ बाबा चे दर्शन घेण्यासाठी पोचलो. काय काय अजब प्रथा असतात. इथली म्हणजे सर्व कोळी लोक Swordfish ची sword इथल्या वेताळाला अर्पण करतात. वर्षातून एक उत्सव असतो तेव्हा हा कार्यक्रम होतो. त्यावर लोकांनी आपली नवे लिहून तिथे ठेवल्या होत्या. 

चार पाच टाके आणि सर्व बुरुज बघत आम्ही खांदेरी प्रदक्षिणा मारली. काही बुरुजांवर अजूनही चाकं असलेल्या तोफा आहेत. जबरदस्त आहेत. यांच्या बद्दल तिथेच बसून सचिन नी खूप माहिती दिली. तोफ या बद्दल आपण त्याच्या कडून ऐकूच. 


सर्व किल्ला फिरून आम्ही Light House बघण्यासाठी पोचलो. १८६७ साली एका इटालियन कंपनी नी बांधलेले Light House आहे. अजूनही उभे आहे. अर्थातच तेव्हा लाच, पैसे खाणे, undertable वगरे काही नसल्यानी अजूनही कडक उभे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे त्याचे Mechanical construction हे इतके अशक्य आहे की काही विचारू नका. ४ th second आणि ६ th second ला दिवा, गोल फिरतांना एका पॉईंट ला दिसतो. त्यावरून हे कुठले Light House आहे हे बोटींना कळते. आम्ही चप्पल बूट काढून light house बघण्यासाठी प्रवेश केला. वर गेल्यावर संपूर्ण किल्ल्याचे दर्शन होते. हे दृश्य आयुष्यात मी पहिल्यांदा पहिले. सर्व बाजूनी लाटा आदळतांना दिसतात. लांब लांब वर क्षितिजावर बोटी तरंगतांना दिसतात. इथून सचिन नी आम्हाला आजूबाजूला असणारे किल्ले दाखवले. उंदेरी, सागरगड, कुणकेश्वर मंदिर आणि काय काय. थोडा वेळ तिथे थांबून दुर्बिणीतून काही दिसते का पाहून आम्ही खाली उतरलो. 

सूर्यास्त जवळ येऊ लागला होता. Navy चे हेलिकॉप्टर उतरायला छोटीशी जागा केली आहे. तिथे सर्व जाऊन बसलो. पिंटू आणि बिडी काही अंतरावर एका बुरुजावर जाऊन टेकले. २० मिनिटे शांतपणे त्या, न टोपीवाल्या दिनकरावांना झोपी जातांना पहिले. अगदी शेवटच्या क्षणापर्यन्त. चला दिवस मावळला. 

















दुसरीकडे ते ख्रिस्ती कोळी तो त्यांचा क्रॉस वर चढवून बसवण्यात व्यस्त होते. दिवस भर काम करून त्यांनी तो क्रॉस उभा केला आणि मग जल्लोष चालू झाला. खालच्या एका बांधलेल्या शेड मध्ये काही काळातच गाणी चालू झाली. सध्या ती गाणी Live नव्हती. मला वाटतं  जशी जशी त्यांची बोट हवेत उडायला लागली तशी तशी कोळी मंडळी नाचायला लागली आणि काही काळात Live Band नी जोरदार असा परफॉर्मन्स चालू केला. फुल कोळी गीते. धम्माल चालू होती आणि आम्ही लांबवरून ते सर्व ऐकत गप्पा मारत होतो. सचिन नी या किल्ल्याचा इतिहास सांगितला  आणि बरेच काही अजून उलगडे केले. आपण त्याच्या बरोबर गप्पा मारू तेव्हा तो सांगेलच सर्व. तिथून निघून आम्ही परत मांडव्याला आलो आणि तिथेच मुक्कामी राहिलो. रात्री लोक काही टेन्ट मध्ये तर काही चक्क  लांबलचक पुलावर - Peer वर वाऱ्यात आणि चंद्राच्या लक्ख प्रकाशात कधीच घोरायला लागली होते. 

सकाळी उठून समुद्र काठी बर्फाचा गोळा खाणे झाले. शहाळी आणि ताडगोळे झाले. परत येतांना संदीप आमच्या गाडीत होता. या माणसानी अनेक किल्ले केले आहेतच पण त्याच बरोबर अनेक सुळक्यावर क्लाइंबिंग केले आहे. Rescue mission मध्ये भाग घेतला आहे. येतांना त्याचे किस्से आणि अनुभव ऐकत ४ तास कसे गेले याचे भानच उरले नाही. तसे झाले नसते तर मी तर अशक्य बोर झालो असतो गाडी चालवून. Long Weekend ची गर्दी काही केल्या संपत नव्हती. १ मे ची सुट्टी होती त्यामुळे अलिबाग कडे येणाऱ्या हजारो गाड्यांनी रस्ता भरलेला होता. हटके ट्रेक / ट्रिप झाली होती. 

खांदेरीतून निघालो तेव्हा,आम्ही इथे आलो होतो, याची तिळमात्र खूण न सोडता सुखरूप पुण्य नगरीत परत आलो. 












Thursday, 23 March 2023

इरशाळगड


इरशाळगड - विलोभनीय किल्ला 

पाय मोडला आणि या वर्षी चा ट्रेक season बोंबलला. चालायचेच म्हणा. कोंकण दिवा झाला आणि पोरं नवनवीन ट्रेक च्या शोधात लागली. त्या आणि या मध्ये साधारण ३ महिने गेले. आजारपणं झाली, ट्रिप झाल्या आणि ट्रेक सोडून इतर सर्व झालं. सरकार पण पडले. म्हणजे महाराष्ट्राला त्यात काही नवीन नाही. पूर्वी पासून ट्रेक ला येतांना नाही तर जातांना एक चर्चा म्हणजे राजकारण, ज्या मधले, गाडीत बसलेल्यांना 'मत' देणे सोडून काहीही कळत नाही, तरी आपले कसे बरोबर हे ठाम पणे पटवून देऊन चर्चा करायची. तिथे राजकारणी लोक सर्व मतदारांना विकून राष्ट्र विकत घेऊन मस्त घोरत पडले असत. आणि इथे हे. असो. सांगायचे म्हणजे असे, की खूप दिवसांनी परत ट्रेक चा योग् आला आणि आम्ही निघालो. 

किती लोकांनी ऐकले आहे माहित नाही पण हा गड तसा लपलेला. बघायला गडावर काहीही नाही. एक टाके, गुहा आणि एक नेढे. पण तरी जावेसे वाटले. याचे कारण म्हणजे त्याच्या कडे पाहताच तो तुम्हाला बोलावून घेतो. कसला जबरी आहे हा गड. त्याचा एकंदरीत आकार बघता आणि चढ उतार बघता हा ट्रेक करायला नक्कीच धम्माल अली. त्या नेढ्या ला पोचे पर्यन्त मात्र वजनाचे ओझे तुडुंब जाणवले. इथे मला माझा CG  सांभाळायला लागला नाही तर सिलेंडर सारखा खाली घरंगळत गेलो असतो. 

रायगड जिल्ला आणि कर्जत विभागात येणारा हा किल्ला माथेरान  डोंगर रांगेतला आहे. या भागा मध्ये अलीकडे पलीकडे बरेच किल्ले आहेत. पेब, प्रबळगड, माणिकगड, मलंग, म्हैसमाळ हे किल्ले लोह मार्गावरून सहज दिसतात. आम्ही रसायनी चा exit घेतला आणि गाडी कर्जत च्या दिशेने नेली. चौक नावाचे गाव शोधत गाडी तिथे नेली. हेच ते पायथ्याचे गाव. गाडी तिथे लावून साधणार ७.३० ला सकाळी आम्ही किल्ला चढायला सुरु केले. आमच्या आधी ६ ते ७ मुलांची एक टोळी मुंबई हुन अली होती. बाकी किल्ल्यावर शुकशुकाट होता. सकाळच्या वेळी अजून उन्हाचा तडाखा नसून थोडासा गारवाच होता. उजवीकडे मोरबे धरणाचे पाणी दिसत होते. 






मी पिंटू आणि उप्या पटकन बूट चढवून, पाणी भरून वर जायला निघालो. २ km साधारण कच्चा रस्ता आहे. जसे जसे वर चढायला सुरु केले गडाचे संपूर्ण दर्शन होत गेले. उजवीडे असलेल्या मोरबे धरणात उगवत्या सूर्य किरणांना कॅमेरा मध्ये टिपण्यासाठी पिंटू ची धावपळ चालू झाले. अचानक मला आणि उप्या ला हाक मारून पिंटू ओरडला .... अरे ती बघ त्या पाण्यात tubelight लागली दिसत आहे. नीट बघून घ्या. आम्ही आपले हो ला हो म्हणालो पण त्याच्या डोळ्यातील आनंद बघून बरे वाटले. ट्रेक ही एक अजब गोष्ट आहे. कोणाला कशातून मजा येईल आणि कोणाला कशातून आनंद मिळे याचा काही ताल मेळ नाही. पिंटू खुश होता  tubelight पाहून हे नक्की. उगवत्या दिनकाराचे प्रतिबिंब अशक्य दिसत होते त्यात वाद नाही. नमस्कार ठोकून पुढे निघालो. साधारण इरशाळवाडी ला पोचे पर्यन्त तास भर गेला असेल. तिथे आधी सांगितले तर जेवणाची सोय होऊ शकते. 

गावापासून साधारण ३० - ४० मी मध्ये तुम्ही गडावरील झेंड्या पाशी पोचता. तिथे एका टपरीवर मस्त सरबत केळी काही सँडविच नेलेले खालले. झेंड्या च्या डावीकडून एक निमुळती वाट गडमाथ्यावर नेते. लहान आहे वाट आणि काळजी घ्यावी. तिथूनच नेढ्या कडे जाणारी एक दगडी वाट लागेल. साधारण ८० deg वर ते नेढे लपलेले दिसते. वर जातांना शिड्या लावल्या आहेत पण जेमतेम आहेत. काही दोर पण आहेत. पण काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. खाली पडलात तर एक टप्पा आणि आऊट. त्यामुळे जमत नाही असा चुकून पण मनात विचार आला तर जाऊ नका. माझा मनात तो विचार नेढ्यात पोचल्यावर आला. त्यामुळे मला काही पर्याय नव्हता. अर्थात जमते सर्व. माझा तोच तो आनंद. जिवंत असण्याचा. तोंडाला कोरड पडणे काय हे अनुभवायचे असेल तर, चला की.... 


वर विशाळा मातेचे मंदिर आहे. कदाचित त्याच वरून या किल्ल्याला इरशाळ गड असे नाव पडले असावे. खरतर इथे पाण्याचे टाके आहे म्हणून याला गड म्हणायला  हरकत नाही. नाही तर इथे तसे काहीही बघायला नाही. तटबंदी पण नाही आणि दरवाजे पण नाही. Watch tower असावा. प्रबळगडाचा सखा, भाऊ. 


नेढयात खूप वेळ हवा खात आम्ही बसलो. जगाच्या वर सर्वत्र पाहत, थंडगार वारा खात त्या नेढ्यातला अनुभव लिहिणे शक्य नाही. आत्ता लिहितांना पण अंगावर काटा येतो आहे. लांब लांब हुन दिसणारे नेढे, आता आपण त्यात पोचलो आहे. लहान मुलांसारखे ओरडावेसे वाटले. ओरडलो पण.  आमच्या साठी हे छोटे प्रसंग खूप मोठे अनुभव, आनंद आणि आठवणी सोडून जातात. यावर वारंवार चर्चा होते आणि तोच अनुभव पुन्हा घेता येतो.  उतरतांना मात्र फाटली होती. डायरेक्ट तळ दिसत होता. मी आणि बिडी असेच दोघे गोरखगडावर गेलो होतो. माथ्यावर पोचायला तिथे पाहिऱ्या आहेत खरं पण उतरतांना ८० deg उतरावे लागते आणि तिथे पण एक टप्पा आऊट विषय आहे. इथे मला उतरतांना त्याची आठवण झाली. पण किंचितसे ट्रेकिंग येत असल्यामुळे ही वेळ निभावून नेली. वजन २० kg तरी कमी असावे असा विचार मनाला चाटून गेला इतकेच. 

तिथून थेट खाली उतरायला सुरु केले. उप्या ला दर वेळी दिसतो तसा त्याचा eagle भेटला. मग आवाज काढून त्याच्याशी गप्पा मारायचा प्रयत्न. हे काही नवीन नाही. तो सांगत असतो आणि आम्ही ऐकत असतो. पक्षी तज्ज्ञ तो. आणि फोटो पण छान काढतो पक्षांचे. त्यामुळे काही नवीन माहिती मिळत असते. उतरतांना शीळ ठोकत आमचा मित्र शेवट पर्यन्त प्रयत्न करत होता. त्याचा तोच तो आनंद. 

खाली उतरलो आणि गाडी पाशी आलो. इथे गावातली पोरं क्रिकेट खेळत होती. पलीकडेच एक छोटेसे घर होते आणि तिथे एक आजी बसली होती. वय साधारण ८० असेल. पूर्ण वाकलेली.  लांबून हाक मारली आणि म्हणाली "तिकीट हाय.पैशे द्याव" म्हणाले आजी या, देतो. आजी आल्या आणि गाडीच्या सावलीत सुखावल्या. तिथेच गप्पा मारत बसल्या. तो क्रिकेट खेळणारा त्यांचा   नातू, म्हातारी समोर आहे याचे काही भान न ठेवता अर्वाच्च शिव्या घालत चेंडू फेकणाऱ्या मित्र शी बोलत होता. लहान लहान मुलांच्या तोंडून मोठ्यांच्या शिव्या ऐकून आम्हाला तर हसायला यायला लागले. आमचे आम्ही आवरून  १०० रुपये देऊन तिथून निघालो. अप्रतिम ट्रेक झाला. येतांना तळेगाव ला थांबून बब्बी ढाबा गाठला आणि जितक्या म्हणून calories गेल्या असतील त्याच्या दुप्पट ओढल्या. जेवण झाले आणि मनात परत विचार येऊन गेला कीं 'वजन कमी असते तर काय'  . . . . . 

इतिहास - (Ref - http://trekshitiz.com/)

ईरशाळला गड म्हणणे अयोग्य आहे, कारण ईरशाळ हा एक सुळका आहे. त्यामुळे इतिहासात त्याचा कुठे उल्लेख नाही.गडावरील पाण्याच्या टाक्यांचे अत्सित्व पाहाता याचा उपयोग टेहळणीसाठी केला गेला असावा असे वाटते. मे १६६६ मध्ये शिवरायांनी कल्याण, भिवंडी रायरी पर्यंतचा सारा मुलूख घेतला तेव्हा हा गडदेखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. ईरशाळ म्हणजे प्रबळगडचा सख्खा शेजारी. २३ जानेवारी १९७२ रोजी याच सुळक्यावर एक दु…:खद घटना घडली ती म्हणजे, कुमार प्रकाश दुर्वे याचा किल्ल्यावरून पडून दु…:खद अंत झाला. त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जानेवारीला मुंबई - ठाण्याचे गिर्यारोहक येथे जमतात. 








 


Monday, 7 November 2022

कोंकण दिवा - The Watch Tower


कोंकण दिवा - The Watch Tower 

कधी थांबतो असे झालेला पाऊस एकदाचा थांबला. या वर्षी एकंदरीतच विचित्र हवामान अनुभवायला मिळाले. बाबा भिडे पूल पाण्याखाली आणि वर इतके वेळा गेला, की पुणेकरांचे पाऊसाचे ते पण परिमाण काहीसे नष्ट झाले. आकाश कंदिलाला वर छत्री वगरे जोक्स इकडे तिकडे जाऊ येऊ लागले आणि अचानक पाऊस थांबला. दिवाळी आली आणि पुण्यनगरी परत काहीशी 'पूर्वीचे पुणे' या सदरात गेली. बाहेरची लोकं आपापल्या घरी दिवाळी साठी गेली. थंडीची चाहूल एकीकडे आणि डोगर दर्यांची हाक दुसरीकडे. मागील आठवड्यात शिंदोळा नावाचा न ऐकलेला किल्ला झाला. इतके हरवलो आणि पावसानी पण वाट नष्ट केली होती की वर पर्यन्त काही पोहचू नाही शकलो. त्यामुळे त्याचे लिखाण गड सर केल्यावरच. 

PC - Parag Mahajan


रायगड, सर्वांच्या आवडता गड. महाराज्यांचा आवडता गड. चहुबाजूनी अनेक डोंगर रांगांनी सौरक्षण केलेला गड. या गडाच्या उत्तरेला एक उंच छोटासा टूमदार असा किल्ला आहे. त्याला watch tower म्हणत. कावळे खिंड घाटमार्ग  आणि रायगड यावर नजर ठेवण्यासाठी याची स्थापना केली होती. पुण्यापासून ७८ km, पानशेत मार्गे रस्ता संपतो तिथे घोळ नावाचे गाव लागते. घोळ पासून गारजाईवाडी साधारण १-१.५ km आहे आणि आता तिथंपर्यंत गाडी जाते. पायथ्याशी गाडी लावता येते. सर्व प्रथम तिथे गावातून एक वाटाड्या घ्या आणि मगच जंगलात शिरा. नाही तर ट्रेक वगरे काही होणार नाही. वाट सापडणे अशक्य आहे. पावसाळ्या मुळे सर्व वाटा झाडांमध्ये लपल्या आहेत. काही वाहून गेल्या आहेत. 



मी, पिंटू, बिडी, उप्या आणि पर्या अशी ५ टाळकी सकाळी ५. १५ ला भेटलो आणि निघालो. वारजे पर्यन्त पोचलो ना पोचलो तर डावीकडे पोरांना गरम पोह्याचा वास आला. ५. ४५ am ला सकाळी पोहे, साबुदाणा वडा आणि चहा उरकून पानशेत च्या दिशेनी प्रवास चालू केला. खडकवासला आणि तिथे उगवलेली चौपाटी, आजूबाजूला बुट्ट्याची  घाण, आपण पूर्वी ज्याला कणीस म्हणत होतो, आणि इतर खंडीभर कचरा सर्व अजून झोपलेला होते. आकाशात केशरी रंग दिसायला लागला. पानशेत धरणाच्या backwater ला पोचलो तेव्हा डावीकडून सूर्योदय होतांना दिसत होता. थंडी मुळे धुके पाण्यावर तरंगत होते. त्यात तो रंग मिसळत होता. अशक्य वातावरण होते. आम्ही सर्व गाडी कडेला घेऊन याचा अनुभव घेतला आणि मोकळे झालो. थंडी होती ना. रस्ता MTDC पासून ८ KM पर्यन्त चांगला आहे. त्यानंतर २० KM कच्चा आहे. घोळ गावाच्या अलीकडे पाटी आहे. तिथे डावीकडे वळून १ ते १. ५ km वर गारजाईवाडी हे गाव लागते. रस्ता इथे संपतो. 

गावात जाऊन आम्ही थोडी चौकशी करता पांडुरंग मामा आमच्या बरोबर वाट दाखवायला येण्याचे काबुल झाले. साधारण साठी मधला तरतरीत आणि ताठ जवान. एक काठी, एक कोयता, चप्पल आणि अंगावर एक कापड घेऊन मोती आणि सोनू नावाच्या दोन कुत्रांना हाक मारून आमच्या बरोबर निघाला. त्याच्या पाठोपाठ आम्ही ५ जण निघालो. इथून किल्ला कुठे आहे याची काहीही जाणीव नव्हती. दिसत पण नव्हता. घनदाट जंगलात शिरल्यावर सूर्याची किरणे पण खाली पोचू शकत नव्हती. पटापट पाऊले उचलत आम्ही जात होतो. एका खिंडीत पोचलो आणि समोर कोंकणदिव्याचे दर्शन झाले. लांबवर किल्ला दिसायला लागला होता. मस्त वाटले. 

PC Upendra 



Pandurang mama


खिड ओलांडून डावीकडून परत आम्ही जंगलात शिरलो. मी पुढे चालत होतो. अचानक पांडुरंगाने आपल्या चपला हाती घेतल्या आणि तो चालू लागला. मला काही कळले नाही असे का केले असावे पण मी न बोलता त्याच्या मागे जात राहिलो. १०० मी नाही चाललो तर समोर दगडात कोरलेलं एक मंदिर दिसले. तिथे जाऊन नमस्कार केला आणि मग लक्षात आले की त्यांनी चप्पल का काढली. पुढे काही पाऊले तसेच गेलो आणि त्यांनी परत चप्पल घातली. हा जो आपला अजब देश आहे ना, मला वाटते तो फक्त एकाच कारणाने चालतो आहे. श्रद्धा. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण नितांत श्रद्धा असल्यानी आयुष्याला कसे एक वळण मिळते. त्याच त्या मार्गावर पिढ्यान पिढ्या जात असतात आणि त्या श्रद्धेचे अभिमानात परिवर्तन होते. अशा छोट्या गावात ती एक रीत बनून जाते. मोठ्या शहरात त्याच श्रद्धेचा बाजार होऊन जातो. 

गडाच्या पायथ्याशी एका पठारावर पोचलो तेव्हा खाली कोकणचे दर्शन घडले. कोंकणदिव्या च्या मागे रायगड होता. पण इथून महाड दिसत होते. लांबवर असे काही तरी पांडुरंग मामा म्हणाले खरे. कावळे घाट परिसर दिसला. दुसरी वाट सांदोशी गावातून आहे. कावळे घाट मार्गे ती वाट इथेच येऊन मिळते. जरा लांबची वाट आहे. क्षणभर विश्रांती घेऊन गड चढायला सुरु केले. परत जंगलात नाहीसे झालो. आता मात्र पुढील चढाई अंगावर येणारी आहे. २०० - ३०० मी असेल कदाचित पण जबरी आहे. म्हणजे समोर चालणाऱ्यांचे पाय दिसतात, डोळ्याच्या लेवल ला. इथे स्टॅमिना नक्कीच कळतो. पण न काही थकता आम्ही वर पोचलो. मला, उप्या ला आणि पराग ला चिवाभंजन ची आठवण झाली. उत्तरे पासून तिथे पोचे पर्यन्त ६ ते ७ तास असाच चढ होता. 







वर एका गुहेपाशी पोचलो आणि निवांत बसलो. सर्वांनी आपापली पोटली उघडली आणि त्यातून खाण्याचे काही ना काही तरी काढले. सँडविच, चिक्की, अंडी, शंकपाळे असे बरेच काही निघाले आणि संपले. डोंगरमाथा इथून १० min आहे. पण रस्ता थोडासा कठीण आहे. वर जातांना नक्कीच काळजी घेणे गरजेचे आहे. उतरतांना तर खूप सावकाश उतरावे. गुहे पाशी काही पाण्याचे टाके आहे आणि ते पाणी पिण्या योग्य आहे. गडमाथा छोटासा आहे. वर पोचलो आणि जय शिवाजी जय भवानी च्या आरोळ्या ठोकल्या. प्रचंड आनंद होतो. कसे काय हे लिहिणे अशक्य आहे कारण शब्दत तो अनुभव अत्यंत तोटका होईल. समोर रायगड, लांब वर तोरणा, लिंगाणा आणि कावळे घाटाचे सुंदर दृश्य दिसते. तिथे बसून गप्पा झाल्या. लांबवर दिसणाऱ्या किल्ल्याचे दुर्बिणीतून बघणे झाले. फोटो झाले. आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. सावधपणे उतरत उतरत आम्ही परत पठारावर पोचलो. तिथून गाडी गाठली, आवरा आवर करून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. 

PC Upendra Walunjkar


PC Upendra Walunjkar




PC Hrishikesh Patil

PC Hrishikesh Patil

PC Hrishikesh Patil



सर्वांना मरणांतिक भूक लागली होती. पानशेत च्या इथे पुरुषोत्तम पूजा नावाचा अजब ढाबा शोधून काढला होता बिडी नी. तिथे गेलो आणि पोटभर भाकरी भाजी पिठलं खाऊन निघालो. गाडीत बसलो तेव्हा पराग शेजारी बसून कधीच घोरायला लागला होता. त्याच्या साथीला उपेंद्र आणि बिडी. मधून मधून सर्वांना हाक मारून उठवत होतो. पुण्यात पोचायला ४. ४५ झाले. खूप सुंदर असा ट्रेक झाला. वातावरणातील मजा म्हणा, नाही तर परत ट्रेकिंग चालू झाल्याचा आनंद. जो भी है उत्तम है. 


वज्रगड प्रदक्षिणा

 वज्रगड प्रदक्षिणा  अधिक महिना या वर्षी. त्यामुळे श्रावण चालू झाला नसून पण 'क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे' ही बालकवी य...