Saturday, 1 October 2022

चांदणी चौक पूल

चांदणी चौक पूल 

२ ऑक्टोबर ला पूल पडणार असे कळले आणि सोसिअल मीडिया वर धमाल चालू झाली. विविध पोस्ट यायला लागले. सर्व वाचले. पण अजून सुद्धा मला या ऐतिहासिक पुलाचे नाव मात्र कळले नाही. इतके वर्ष जो पुणे आणि पिरंगुट मधला धागा होता, त्याचे नाव काय. मुळशी ला पुण्याच्या जवळ आणले आणि एक पॅटर्न तयार केला. पण याचे नाव काय. भिडे झाला, लकडी आणि म्हात्रे झाला, दारीपूल झाला पण याला मात्र नामा निराळा ठेवला. 

आमच्या बरोबरच हा पूल वाढल्याचे मला आठवत आहे. नवीन नवीन झाला तेव्हा मी आणि माझे मित्र त्या पुलावर जाऊन पाय सोडून कट्ट्यावर बसायचो. तेव्हा highway चे अप्रुप होते आणि खालून जोरात जाणाऱ्या गाड्या, गप्पामारत बघत राहणे हा एक आनंदाचा कार्यक्रम असायचा. बरेच वेळा वेड चाळे पण केले आहेत. पान खाऊन येणाऱ्या जाणाऱ्या गंड्यावर बरोबर वरून थुंकायची शरियत वगरे. बाकी न लिहिणे योग्य. थोडक्यात हा निनावी पूल आयुष्याचा एक भाग बनत गेला. 

त्याकाळात बुनिंदा, डौलत असे काही धाबे तयार झाले होते. या पुलावरून तिथे नीट जाणे आणि हलेडुले येणे, यांनी बरेच पाहिले आहे. हिरवे गार होते सर्व. NDA रस्त्यावर गार्डन कोर्ट चे किस्से मला वाटते पुण्यातील प्रत्येक तरुणाकडे असतीलच. त्या रस्त्यावर जाता येता कोणी नाही तरी या पुला नी नकीच पहिले असेल. प्रेमाच्या गप्पा ऐकल्या असतील. कोकणात जाणे असेल नाही तर ट्रेक ला, पौड ला नाही तर मुळशी ला, अनेक सुंदर आठवणींना हा पूल साक्ष आहे. कुठेही जायचे झाले किंवा यायचे झाले की याला पार करणे गरजेचे. सायकलिंग करत असतांना हा नेकलेस चा एक अविभाज्य भाग होता. ती असतेना लिंक प्रत्येक साखळीला जोडायला, तसेच काही. 

मुळशी ला जवळ आणले आणि पिरंगुटशी मैत्री झाली. इंडस्ट्रियल एरिया तयार झाली आणि इथली वर्दळ वाढली. या पुलाचा हजारो वाहनांनी दररोज उपयोग केला. या पुलानी गुंडगिरी, भांडणं, अपघात, प्रेम, मैत्री असे अनेक अनुभव घेतले. 

ज्या पुलाला कधी नावच मिळाले नाही त्याच्या नशिबी मात्र अनेकांना  जोडण्याची, जुळवण्याची आणि मिळवण्याची संधी आली. त्यांनी ती सुंदर पूर्ण केली. नशीबवान म्हणायचा की पुण्यात जन्म झाला आणि पुण्यातच अंत !!!

@JJVTTL 


No comments:

Post a Comment

वज्रगड प्रदक्षिणा

 वज्रगड प्रदक्षिणा  अधिक महिना या वर्षी. त्यामुळे श्रावण चालू झाला नसून पण 'क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे' ही बालकवी य...