Monday, 7 May 2018

तुंग


तुंग - आपलसं वाटणारं  रणरणतं ऊन

तुंग हा किल्ला पुण्या पासून जवळ आहे. पौड रोड वरून कोळवण च्या दिशेनी गेले असता वाटेवर तिकोणा नावाचा किल्ला आहे. तिथूनच पुढे गेलात कि तुंग किल्ला आहे. हा परिसर पावसाळ्यात फारच अप्रतिम दिसतो. हिरवे गार होते सर्व कडे. आत्ता  मात्र रणरणते ऊन असते. तुंग किल्ला फार मोठा नाही. चढायला ३० मी पुरेशी आहे. तीन ते चार टप्प्यात हा किल्ला आहे. किल्ल्याचा माथा तसा  छोटा आहे. तुंग वरून आजू बाजूचे बरेच किल्ले दिसतात.

इतिहास :
या किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही. मात्र १६५७ मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला. सन १६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मे १६६५ रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली पण, हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही. १२ जून १६६५ पुरंदर तहानुसार, १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला. 
ref: http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Tung-Trek-T-Alpha.html

वर चढण्याची वाट हि  मंदिरा कडून जाते. वाट अत्यंत मळलेली आहे. गड माथ्यावर पोचलात कि मारुती चे मंदिर, बाप्पा चे मंदिर व काही अवशेष आहेत . 











बाप्पाच्या मंदिराकडूनच रस्ता बालेकिल्ल्यावर जातो. वर तुंगीदेवीचे मंदिर आहे. मंदिर समोरच एक गुहा आहे. तिथे खरं  तर राहता येणे जरा कठीण आहे, पण ठरवलं तर २ -३ माणसांची सोय होऊ शकते. 





तुंग आणि तिकोना एका दिवसात होऊ शकतात. छान आहे किल्ला. कदाचित इथे पावसाळ्यात राहायला खूप मजा येईल. इथून लोहगड विसावपूर तिकोणा कोराईगड या किल्ल्याचे छान दर्शन घडते. आत्ता डोंगरात काळी  मैना मस्त मिळतात. खूप जाळ्या  आहेत आणि लगडलेले. खाली उतरून आम्ही कोरीगडाच्या दिशेनी निघालो. चौकात, जिथून  डावी कडे वळून कोरीगडाकडे रस्ता जातो तिथे उत्तम टपरी आहे. तिथे वडापाव जरूर खा. 
मी चेतन पिंटू आणि उपेंद्र २- २ वडापाव खाऊन पुढे निघालो. 









No comments:

Post a Comment

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...