Monday, 26 February 2018

घनगड

घनगड 
२५.०२. २०१८
मी, ढेरे, देशमुख, पाटील आणि वाळुंजकर 



घनगड एक छोटासा पण सुंदर किल्ला आहे. मला खूपच आवडला. ढेरे इथे आधी येऊन गेले होते त्यामुळे त्यांना इथली माहिती होती. गडावर अशी काही खूप जागा आहे असे नाही पण तरी एक संपूर्ण किल्ला आहे हे खरं. माची आणि बाले किल्ला आहे. 
अकोले हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. इथे गाडी लावून चॅन मळलेल्या पाऊल वाटेनी साधारण २५ मी मध्ये तुम्ही गडाच्या माथ्यावर पोचता. जातांना उजवीकडे एक देवी चे मंदिर आहे. गरजाई देवी मंदिर. 




आजूबाजूला काही किल्ल्याच्या अथवा तिथे असलेल्या वाड्याचे अवशेष आहेत. इथून मात्र रास्ता थेट माची पर्यन्त जंगलातून जातो. माचीवर गेल्यावर काही पाण्याच्या टाक्या आहे. उजवीडे गेलात कि तिथल्या एक गुहा तत्सम ठिकाणी देवाची मूर्ती आहे.   तिथे एक मोठा दगड खाली पडला आहे आणि त्याचे छान formation  तयार झाले आहे. Took a nice break. Had some juice and sat there looking at the mountain ranges around. A peaceful moment it was.  बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी कड्यावर चढून जावे लागते. तिथे अजून सुद्धा सुरुंग लावल्याच्या खुणा अजून दिसतात. इथे पूर्वी नकीच छान पाहिऱ्या असाव्यात ज्या इंग्रजांनी तोडल्या. सर्व गड तोडले. तिथे आता एक लोखंडी शिडी आहे जीतून वर जात येते. अव्ह्गड नाहीये पण काळजी घेणे गरजेचे आहे.  Once you climb the stairs, you will see ropes are mounted on the side which surely helps you to go up.

ऊन रणरणत होता. तसे निवांतच वर गेलो. वर पोचलो तेव्हा वाऱ्याच्या सुंदर प्रवाहात सर्व शिन निघून गेला. इथे दोन माजली बुरुज पहिला मिळाला. आत्ता पर्यन्त असा बुरुज पहिला नव्हता. पाण्याचे टाका आहे इथे.  
किल्ल्याच्या माथ्यवरून जे काही अशक्य दृश्य दिसते त्याचे वर्णन करावे अशक्यच आहे. खोल दर्या, उंच उंच गड  मग सुधागड असो व सरसगड, आणि समोर उभा असलेला तैलबैल. जबरी आहे सर्व. आम्ही सर्वजण दरवाज्यापाशी येऊन बसलो होतो. निवांतपणे. It was a beautiful moment to cherish. With friends life is simple, and you can actually be yourself. You do not need to hide anything or do not need to pretend anything. इथे भीती वाटली तर वाटली सांगायची लाज नसते.  मैत्री ही गोष्टच वेगळी असते. वाईट वागलं तरी तुटत नाही आणि नीट वागायची सक्ती नसते. फक्त जपायचं असतं सर्व. फुलासारखे. न दुखावता.  You have the freedom to do what you want and you know they wont judge you. And then you know, that some people will run away when they see you differently and would not understand the reason why----- keep away and they have a different agenda to follow. चूक बरोबर करत बसलो तर फरक काय उरला. त्या दरवाज्याशी बसून खूप विचार येत होते. त्याचे मंथन चालू होते. खरं तर इथे शांतता आहे तर विचार का नाही थांबत असं वाटतं मला कधी तरी. मग  सर्व गणितं जोवर सुटत नाहीत तो वर कसे ते विचार तरी थांबणार. पण छान  वाटतं होतं. काही दिवसांपूर्वी  I was listening to a lesson by one of the greatest philosopher / writer of his times, मला अचानक साक्षात्कार झाला माझ्या मधल्या एका वाईट गोष्टीचा.  या बद्दल मला अनेक मित्रांनी अनेक वेळा सांगून हे पटलं नाही ते आज पटलं. 'Imagination in my thoughts'. I have been fighting this battle for a long time and it hurts me like nothing. .....whatever that is. I have started to get rid of those thoughts and keep telling my mind that do not react to imaginations. They are not true. Why am writing all this, is because this is the time that you will get to find yourself. Its this time that will help you to get out of the chaos that is going around you each and every moment and in your minds. With pleasure comes pain ....always. The question is does this work the other way round ? I need to find all the answers and I need to search for them soon enough.... Oh well. Just writing some thoughts which I am sure some will find so stupid. हे जे काही वर लिहिला आहे त्यावरून आता हे लोक मजा घेतील. Pan I think for some things that have happened in the past its too late. 

उतरतांना मी आणि पिंटू एकत्र उतरलो. उपाय गाडीतच थांबला होता आणि झोपला होता. जागा केला आणि तिथून आम्ही निघालो. परत येतांना क़उ बीट च्या शेजारी जे छोटे हॉटेल आहे तिथे ऑम्लेट पाव खाऊन घरी परत आलो.
रात्रीच्या चर्चेत असे ठरले की एका वेळी एकाच गड करायचा कारण उन्हाचा त्रास वाढू लागला आहे.

































कैलासगड


कैलासगड 
25.02.2018
Me, Bhushan, Chaddi, Pintu ani UPENDRA W ( Upya)

Weekend ची  वाट पाहत होतो.  Last weekend ला कामामुळे कोणालाच जमलं नव्हतं  ट्रेक ला यायला.  मी गडावर पटकन चक्कर मारून आलो होतो.  So everyone was looking forward to this weekend. हडसर निमगिरी चा प्लॅन होता. पण आधी इथले किल्ले केले पाहिजेत वगरे चर्चा चालू झाली आणि कैलासगड  आणि घनगड असे दोन किल्ले ठरले. या वेळी thar नेऊ असा विषय झाला अन मी आणि बिडी चड्डी कडे निघालो. तिथे पोचलो आणि आमची गाडी XUV  ५०० जी उप्याची गाडी आहे आणि जी तो आम्हाला ट्रेक ला उधार देतो, उभी पहिली. त्याच्या  बरोबर गाडीचा मालक पण पाहिला. आनंद झाला. याचं  कारण असा की उप्या नी बरीच मेहनत घेऊन त्याचे वजन कमी केले आहे. सर्व प्रकारचे उपाय करून त्यांनी व्यायाम चालू करून आता तो आपल्याबरोबर येतोय हे कळाल्यावर खूप बरं वाटलं.  आमच्या टोळी मध्ये अजून एक  मावळा आला. ५ लोकं झाले. उप्या हा खूप जुना मित्र आहे. अर्थात तो जग मित्र आहे. अत्यंत straight forward आणि  computer networking मधला किडा आहे. चड्डी बरोबर तो त्याच्या स्टुडिओ मध्ये काम करतो. तो wildlife photography specifically, birds, खूपच छान  करतो. त्यांनी काढलेले फोटो बघण्यासारखे आहेत. उप्या ची प्रशंसा इथे संपली. त्याची ओळख झाली. गाडी मीच चालवली. 

ताम्हिणी घाटातून  एक रस्ता लोणावळ्या  ला जातो. त्याच रस्त्यावर वडुस्ते नावाचं गाव आहे. तिथे हा किल्ला आहे. गाव सोडून थोडासं पुढे एक खिंड आहे. गाडी तिथे लावून उजवीकडे मळलेली वाट तुम्हाला गडाच्या माथ्यावर नेते. ह्या किल्ल्यावर फारसे बघण्यासारखे काहीही नाही. एक  महादेवाची पिंड आहे. रस्ता सोपा नाही. घसरडे आहे. नीट काळजी घेऊन वर जावे. पिंटू अर्ध्यावाटेत थांबला. त्याला vertigo  चा त्रास आहे आणि हा गडी वर आला नाही. चालतंय की. तटबंदी वगरे काहीही शिल्लक नाही. ना दरवाजा आहे ना काही. वर जायला १ तास खूप झाला.  वरून मुळशी धरणाचा पूर्ण विस्तार सुंदर दिसतो. महादेवाच्या जवळील जागा साफ करुनठेवली. तिथे पण कचरा केला होता. बसून खालले आणि तिथून निघालो. ३० मी मध्ये आम्ही खाली पोचलो. घनगडचा रस्ता पाहिला आणि त्याचा दिशेनी आम्ही निघालो. 

इतिहास :
किल्ल्यावरील टाक्यावरून हा किल्ला सातवहान काळात बांधला असावा असे वाटते. ऐतिहासिक कागदपत्रात या किल्ल्याचा उल्लेख इसवीसन १७०६ मध्ये शंकरजी नारायण सचिवांनी हणमंतराव फ़ाटकांना लिहिलेल्या पत्रात मिळतो. (ref - trekshitiz)




















Saturday, 24 February 2018

सरसगड


सरसगड 
03.02.2018
Me, Pintu, Bhushan, Papya ani Chaddi

पाली च्या गणपती मंदिरा मागे जो उंच डोंगर दिसतो तो सरसगड. पुण्याकडून येत असतांना बाप्पा चे  मंदिर डावीकडे ठेऊन साधारण १ की मी मुख्य रस्त्यानी पुढे गेला की गडावर जाणारा रस्ता डावीकडे दिसतो. कोपऱ्यावर पाटी लिहिली आहे. 
सरसगड दिसायला मस्त मोठा आणि तेजस्वी किल्ला आहे. बाप्पा बल्लाळेश्वराच्या मागे जणू त्याचा पहारा करण्यासाठी हा किल्ला उभा आहे असे वाटते. सकाळी ६. ३० च्या सुमारास घरून निघालो आणि ९ च्या सुमारास गड चढायला सुरु केला. या वेळी पिंटू ला वर पर्यन्त न्यायचा आमचा निश्चय पण होता आणि खोड पण होती. खोपोली कडून पाली कडे जाणाऱ्या रस्त्यावर वळताच एक चहाची टपरी आहे. तिथे चहा आणि वडापाव एक नंबर मिळतो. सुधागड ला जाताना हाच रस्ता आहे आणि मी आणि बी डी इथेच थांबलो, आणि पोटपूजा केली होती. आता हा चहा चहाच आणि वडापाव पण. पुण्यात राहणाऱ्या लोकांना काहीच नवीन नाही की नाही. पण तरी जिथे जिथे जाऊ तिथे तिथे काही ना काही तरी अनोखे बघायला आणि खायला मिळते. नाव तेच पण चव वेगळी मिळते. भारता सारखे आहे. माणसं तीच पण जागे प्रमणे बदलतात. इतकी लोक निरनिरळ्या पद्धतींनी राहतात, The United State of India, की कधीतरी वाटते की हे सर्व चालवतं कोण. इतकी माणसं दररोज रात्री जेवतात आणि झोपतात. असो, माझी विचारांची गाडी वळायला लागली आहे. तर ट्रेकिंग मुले वेगवेगळ्या गावा  मध्ये छान छान खायला मिळते, एव्हडेच. पण चहा ही गोष्ट म्हणजे पु ल च्या पानवाल्या  सारखी होऊ शकते. तिथे पण तंबाखू आणि इतर सागर संगीत असतं तर इथे तसाच गादी  वर बसणारा तो चहावाला आणि तीच त्याची पळी आवाज करत चहा मध्ये फिरणारी. आलं हवे आहे का, मसाला, इलायची, special  का साधा, थोडीशी मलाई टाकून वाफाळलेला चहा मिळाला की अहाहा. पप्या चहा वेडा आहे. आवडला तर दोन तीन छोटे cups  सहज रीजवतो. पण आवडला पाहिजे. आणि शेवटच्या चहा मध्ये तो पाव असतो तो बुडवून खायचा. लै भारी.
किल्ला चढायला तसा सोपा आहे. चढण फार नाही. माथ्याच्या जवळ आलात की रस्ता घसरडा आहे आणि माती सरकते. नीट जावे. इथून किल्ला सुंदरच दिसतो त्यात काही वाद नाही. दोन्ही बाजूला दरी आहे आणि सोंडेवरून तुह्मी वर पोचता.




वर पोचताच एक गुहा आहे.

तिथूनच गडावर जायला पाहर्या आहेत. कातळातल्या या पाहिर्या दम काढतात. सुंदर आहेत पण.



 किल्ल्याचे दोन भाग आहेत. माची आणि बालेकिल्ला. वर पोचलात की दिंडी दरवाजा आणि तिथे एक खोली आहे. तटबंदी अजून बरीच छान दिसते. माचीवर पोचलात की पाण्याच्या टाक्या आहेत, सुंदर कोरीवकाम केले आहे.



एका दगडा खाली खूप प्रशस्त हॉल आहे. तिथे कदाचित लोक राहत असावेत. पण १०० पान सहज उठेल अशी खोली आहे.

टाकीच्या डावीकडून रस्ता बालेकिल्ल्यावर जातो.  वर पोचल्यावर किल्ल्याचे उत्तम दर्शन घडते. This fort use to be a watch tower in the golden days. सुधागड, घनगड, कोरीगड, तैलबैला याचे विलोभनीय दृश्य बघायला मिळते. सरसगड मला खूपच आवडला कारण किल्ला बराच शाबूत आहे आणि बघायला पण बरेच आहे. We all had a really good time at this place.




बिडी नी चिक्की आणली होती. मंदिरात बसून संपवली आणि खालच्या मार्गाला लागलो. उतरत असतांना खालच्या गावात क्रिकेट ची match चालू होती. एक सुंदर ground  वर हा खेळ चालू होता along  with  commentary. In India, anywhere you go, and if there is a cricket match going on, any level, people will tend to stop and watch. Atleast one over. त्याच्यावर चर्चा होते. नीट खेळ ना भाडू, तुझा बा ना असा बॉल टाकला होता का, कोंबडी पकड, च्यामारी आत्ता आपल्याला खेळता यायला पाहिजे होते वगरे वगरे. रस्त्यावर जातांना अचानक कोणी तरी उडी मारतं आणि फक्त हाथ फिरवतं. ती bowling ची action  असते, बॉल नसतांना. अचानक कोणी तरी बायटिंग ची action  करतो bat  नसतांना. हे फक्त इथेच होऊ शकत.


The cricket ground from the Top of the fort.

खाली पोचून बाप्पाचे दर्शन घेऊन परतीच्या वाटेवर निघालो. जय शिव शंभो. 



























Friday, 23 February 2018

तोरणा - प्रचंडगड


तोरणा - प्रचंडगड 
13.1.2018
मी पिंटू भूषण चड्डी 

पुणे सातारा रस्ता - नसरापूर फाटा - वेल्हे 

This is one of my favorite fort. Torna. It is so very beautiful that it calls you again and again. This was my third time to Torna. काही वर्षांपूर्वी आम्ही इथेच कॅम्पिंग करायला आलो होतो. खूप मजा अली होती. मला वाटतं त्यावेळी अखिलेश आणि त्याचे मित्र आले होते.  ७ च्या सुमारास आम्ही पायथ्याशी पोचलो होतो. Camp Site  शोधली आणि tents  टाकायला सुरुवात केली. वेल्हे भोर पानशेत वरंध मुळशी हे परिसर खूप सुंदर आहेत. इथे development  आणि typical  plotting सारखी घाण पण बरीच केली आहे. पण तरीही अजून इथलं निसर्ग रम्य वातावरण शाबूत आहे.  आता गाडी वर जाण्यासाठी एक cement  चा रस्ता झाला आहे. अर्थात थोडीशीच वर जाते गाडी. तिथे पार्किंग ला जागा आहे. आम्ही तिथे पोचलो आणि छान कचरा, दारूच्या बाटल्या, wafers चे plastic, glasses अशी उत्तम सजावट केलेली दिसली. काही दिवसात तिथे पण बुट्टे आणि गोलगप्पे वगरे सामोसा देना भैय्या वगरे चालू होईलच.  देव करो आणि गाडी चा रस्ता इथेच थांबो. वर पर्यन्त घाट गेला तर तोरणा संपेल. तोरणा रिसॉर्ट कडे वगरे पाट्या येतील.  जेव्हा trekking चालू केलं तेव्हा भिडे सर, तळे सर, शिंदे सर,ओझा सर अशी काही थोर मंडळी होती ज्यांनी २० yrs ago गड किल्ल्यावर व ट्रेकिंग करत असतांना काय करायचा आणि काय नाही हे मनावर इतका बिंबवलं होतं की आजवर ते लक्षात आहे. गोळी खालली कि wrapper खिशात :-). त्यांनी आम्हाला एक छोटी पिशवी दिली होती - काचऱ्या साठी. 
तोरणा खूप सुदर किल्ला आहे. लिहायला लागलो किल्ल्या बद्दल तर काय लिहू आणि काय नाही असे होईल. आणि किल्ल्याबद्दल अनेक लोकांनी अनेक लेख लिहिले आहेत. वर चढायला तसा सोपा किल्ला आहे. काही rock patches आहेत पण आता तिथे railings install  केल्या आहेत. त्या दिवशी मनात विचार करत करत मस्त मूड लागला होता आणि मी वर कसा आणि कधी पोचलो हे कळलंच नाही. बाकी पोरं येत होते. अचानक काय झालं कळलं नाही पण पिंटू परत जातांना मला दिसला खरा. हे सर्व मित्र मंडळ एका पेक्षा एक विचित्र वीर आहेत. कोणाचं कधी काय बिनसेल कळत नाही. अर्थात या वेळी तसे काही नाही झाले. पिंटू ला heights  ची भीती आहे आणि त्यामुळे तो जरा घाबरून परत फिरला. मला वाटतं कि त्याला त्या दिवशी वर यायचा मूड नव्हता. खाली मिसळ आणि इतर गोष्टी हापसल्या होत्या आणि बिअर चे वेध लागले होते ऊन्हात तापल्यानी. असे आपले मला वाटते बराक. 
वर पोचलो आणि कळलं कि तिथे खूप काम चालू आहे. तिथे गर्दी पण बरीच होती. पडलेले बुरुज बांधायचे काम चालू होते, रस्ते करायचे काम आणि इतर डागडुजी. खरं सांगू तर ते छान काम असून तिथे मात्र विचित्र दिसत होते. ते जुने,  इतिहास जपणारे हाथ नव्हते. फक्त contract मिळालं म्हणून काम पूर्ण करणारे होते. त्यात ना काही भावना ना काही प्रेम. तिथे त्या बोलक्या बुरुजांवर ही नकली दगडं रचून त्या बुरुजांच्या गळा दाबला असे वाटतं होते. अर्थात संवर्धन या दृष्टींनी छान आहे असे म्हणायला हरकत नाही. बघू आता हे काळाच्या ओघात तुटते का टिकते. तुटले तर परत इतिहास दिसेल. त्यावेळी ना पैसे खाता केलेली कामं, या भरल्या पोटानी उचललेले contract match करू शकेल का ? असो. 
प्रचंडगड असे या किल्ल्याला का म्हणतात हे तिथे गेलं कि कळते. बघायला खूप मोठा आहे आणि एक दिवस पण कमी पडेल असे वाटते. जमले तर odd day  बघून या किल्ल्यावर रहायला जावे. सिह्गड राजगड तोरणा हा common  trek  आहे. तेव्हा इथे मी राहिलो होतो .. १० वी मध्ये केला होता. त्यानंतर वर राहायची वेळ अली नाही. अप्रतिम असा trek संपला. पिंटू खालीच होता. गाव हिंडून आला होता. 

इतिहास :
तोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुन येथे शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले. गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्र्‍याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला, त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांचा वध झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स. १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले, त्यामध्ये तोरणा महारजांकडेच राहिला. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय. (history - trekshitiz









































महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...