वैराटगड
25.11.2017
मी आणि बिडी
पुणे भुईंज पाचवड व्याजवाडी
वैराटगड - पुण्याहून साताऱ्याला जातांना वाई सोडले की हा गड उजवीकडे मस्त दिसतो. आम्ही उनाड मित्र आज सकाळी सकाळी माझी THAR काढून त्या मध्ये बसलो आणि निघालो. गड जवळच असल्यानी आज काय काय अजून बघता येईल याची चर्चा चालू होती. आजूबाजूला अनेक किल्ले आहे आणि त्यामध्ये जमले तर रायरेश्वर आणि समोर टोपी सारखा दिसणारा केंजळगड करायचा प्लॅन झाला.
व्याजवाडी मागे सोडली आणि आम्ही THAR मधून थोडेसे पुढे आलो. नक्की कुठे जायचे हे कळत नव्हतं. डावीकडे वर एक मंदिर दिसले व गाडी रस्त्याच्या कडेला लावून मी आणि ढेरे नी वर जायला सुरुवात केली. हाच का रस्ता या विचारात एक भला मोठा खड्डा ओलांडून देवळाच्या दिशेनी गेलो. विचारायला इथे कोणीही नव्हते. उन्हाचा पारा चढायला सुरुवात झाली होती. मला वाटतं वैराट जरा हटके किल्ला असावा... कारण किल्ल्यावर पण आम्ही सोडलो तर कोणीच नव्हते. कदाचित इथे कोणी येतच नसेल असे वाटले. हा गड तीन टप्प्यात आहे. तीन distinct plateaus आहेत. तसा किल्ला चढायला सोपा आहे आणि ४० मिनिटात आम्ही गडमाथा गाठला. गडमाथा फार मोठा नसल्यानी काही वेळातच आम्ही या टोका पासून त्या टोका पर्यन्त सहज पोचलो. गडावर शिरतानाच पाण्याचे टाके दिसेल. इथं बारा महिने पाणी असते. पिण्यासाठी पाणी योग्य आहे. आम्ही आमच्या बाटल्या इथे भरून घेतल्या. थोडेसे पाणी तोंडावर शिंपडून परत ताजे तवाने झालो. या किल्ल्यावरील टाक्या आणि त्यांची जागा, केलेले काम हे सर्व अजब आहे. मनात प्रश्न येऊन राहतो की तेव्हा काय technology असेल जी, इथे पाणी आहे, हे सांगत असेल ? असेल नक्कीच, अशे आणि इतर बरेच काही प्रश्नांची उत्तर आम्ही सचिन ला विचारतो. Dr सचिन जोशी. येईलच थोड्यावेळानी , माझी बडबड संपली कि.

शेवटच्या टप्यात काही पाहिऱ्या लागतात आणि मग प्रमुख दरवाजा. तो ओलांडून आत आलात की गुहा, मंदिर आणि इतर काही अवशेष दिसतात. मारुती चे सुंदर मंदिर आहे आणि त्या मध्ये साधारण ६ ते ७ लोक छान राहू शकतात. कड्यावर गेलात की महादेवाची पिंड आहे. तिथून संपूर्ण प्रदेश खूपच सुंदर दिसतो. हा किल्ला म्हणजे एक लष्करी ठाणे म्हणून वापरत असत. राजा भोज यांनी अकराव्या शतकात बांधलेला हा किल्ला, महाराजांनी जेव्हा वाई प्रांत जिंकले तेव्हा स्वराज्यात सामील करून घेतला.
मंदिरा मागे काही बांधकाम आहे. खोल्या आहेत. त्यावरून वाटत होता की इथे कोणीतरी राहत असेल. त्यावरून आमची चर्चा पण झाली की कोण असेल काय असेल. आणि असेल तर आत्ता कुठे. चर्चा करत करत मंदिराच्या सावलीत बसून घरून आणलेले धपाटे चेपले. जागा स्वच्छ करून आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. जातांना परत थोडेसे पाणी भरून बाटल्या फुल्ल केल्या. खाली उतरतांना मंदिराशी काही गावकरी भेटले. तिथे त्यांच्याशी गप्पा मारण्यात काही काळ गेला. ढेरे च्या गप्पा चालू झाल्या की थांबत नाहीत. पण ५० वाक्य बोलली तर निदान ५ वाक्य तरी नक्कीच उपयुक्त असतात. तसे काही इथे झाले. त्यांनी ' इथे वर कोणी राहते का ? खोल्या आहेत म्हणून विचारले. असा सवाल केल्या वर गावकरी म्हणाले ' हो, इथे काही वर्षांपूर्वी गगनगिरी महाराजांचे शिष्य राहत होते. होय होय. कधी काय नीट सा कळले नाही पण फासेपारधी लोकांनी त्यांना पळवून लावले म्हणतात.
आमच्या कडील चिक्की त्या गावकऱ्यांना देऊन, थोडी स्वतः खाऊन तिथून निघालो. THAR पाशी आलो आणि तापलेल्या गाडीत बसून वाई च्या दिशेनी निघालो.
इतिहास : | |
वैराटगड हा शिलाहार राजा भोज ह्याने अकराव्या शतकात बांधला. शिवकाळातही किल्ला केवळ एक लष्करी ठाणे म्हणूनच वापरात होता. शिवरायांनी जेंव्हा वाई प्रांत जिंकला, तेव्हा ह्या परिसरातील वैराटगड, पांडवगड हे किल्ले देखील स्वराज्यात सामील करून घेतले. पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. Ref-http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Vairatgad-Trek-V-Alpha.html |
बुरुजावरील पिंड
मंदिर
वीरगळ
महादेव मंदिर
प्रमुख दरवाजा
No comments:
Post a Comment