Thursday, 22 February 2018

केंजळगड - रायरेश्वर


केंजळगड - रायरेश्वर 
25.11.2017
Me and Bhushan


Plan was to go to Pandavgad after वैराटगड. मेरे मन को भाया मैने कुत्ता काट के खाया ….we went to Kenjal. झालं असं की आमचं जेवण झालं नव्हतं आणि कावळे कोकलत होते. वैराटगड झाला आणि सातारा वाई मार्ग पकडून गावात पोचलो. वाई मध्ये गर्दी होती त्यामुळे पुढे बघू असे करत करत पांडवगडाच्या आजूबाजूला पोचलो. तिथे एका फालतू ठिकाणी डाळ आणि रोटी खालली आणि निघालो. मालकाला रस्ता विचारला तर सरळ  रस्ता पकडा म्हणाला. उजवीकडून पांडवगड जातांना दिसत होता तरी आम्ही पुढे गेलो. जाऊदे म्हणालं जाऊ पुढे आणि करू रायरेश्वर. काही दिवसांपूर्वी इथेच कमळगड वर जायला आलो होतो. कमळगड म्हणजे एक लै भारी ठिकाण आहे. तेव्हाच केंजळचा प्लॅन झाला होता पण नाही जमलं जे आज लिहिला होतं.  रस्ता छान आहे आणि खिंडीत पोचतो. एक बाजूला रायरेश्वर आणि एका बाजूला टोपी घातल्यासारखा दिसतो तो केंजळगड.  घाटातून खाली उतरून रस्ता गडाकडे जातो. पायथ्याच्या गावी गाडी लावली आणि परत आमचा ट्रेक चालू झाला. हा किल्ला अंगावर येतो. भयंकर घसरड्या रस्त्यानी वर जायचा प्रयत्न करत होतो. एक तर गवत महाभयंकर वाढले होते आणि त्यामुळे हातापायांवर गवताचे वार होत होते. दिसतांना वाटलं की पोचू लगेच. पण तसं  झालं नाही. वाट चुकलो का नाही माहित नाही पण अर्धा पाऊण तास गेला घसरत वर जायला. शेवटच्या टप्प्यात अप्रतिम दगडात कोरलेल्या पाहिऱ्या आहेत. त्या गडाच्या प्रमुख दरवाज्या पाशी नेतात. या पाहिऱ्या एकाच दगडातून कोरल्या आहेत. हे दृश्य आणि modern  engineering  हे इथे येऊनच पाहणे गरजेचे आहे. इतक्या वर्षांपूर्वी या उंचीवर हे असे घडवणे हे आत्ता चमत्कारिक वाटते. The art, civil engineering, mechanical engineering and architecture can be seen all at once. More than all this, what we see is the dedication of all the men working towards the स्वराज. Patriotism I think is the one and only thing that can make miracles like this happen. वर एक गुहा आहे, पाण्याच्या टाक्या आणि चुन्याचा घाणा आहे. बाकी पडलेले बुरुज आणि इतर अवशेष बघायला मिळतात. मला एक देवीची मूर्ती पण पाहिल्याचं आठवत आहे. हा गड तसा मोठा आहे आणि दम काढणारा आहे. आता गाडी माची पर्यन्त वर जाते त्यामुळे सोपे झाले आहे. पाहिऱ्या बघायला मात्र या गडावर नक्कीच जावे.
खाली आलो आणि एका सिमेंटच्या टाकी खाली बसून निवांत अंघोळ केली. आनंदी आनंद. इथे गावा गावात जात येत असतांना नवीन नवीन लोकं भेटतात. गप्पा होतात आणि नवीन नवीन गमती जमती कळतात. इतर ट्रेकिंग करणारी लोकं भेटतात आणि अड्ड्यावर इतर आपल्या सारखे वेडे जसे असतात तसेच हे, असे वाटून मनाला बरं वाटतं. आज आमचे दोन किल्ले झाले होते. पण मग भूषण च्या अंगात संचारले आणि म्हणाला आलो आहे इथे तर रायरेश्वर ला पण जाऊया. मला वाटतं शाळेत असतांना इथे आलो होतो. त्यावेळी गाडी वर जायची नाही. त्यामुळे पायथ्यापासूनच वर चढत यावे लागायचे. आता तसं नाही. गाडी वर पर्यन्त पोचते आणि तिथून २० मी मध्ये माथ्यावर पोचता येते. गाडी काढली आणि तिथे पोचलो. 
 There is a lot of development that is going on, on  Raireshwar. A nice walkway will take you straight to the temple. Evening time and the place was mesmerizing. The fragrance of the flowers and just whole place was mayavee. सुंदर ढंगांचे रंग आणि हिरवेगार पठार. तिथून चालत असतांना खुप काही मनात येऊन जात होत. रायरेश्वर हे नाव आपण सर्वांनी इतिहासात वाचलेले आहे. इथे महाराजांनी शप्पत घेतली. आपल्या महाराजांनी. इथे ते होते, त्यांचे पाय लागले आहेत या भूमीवर. या रस्त्यानी कदाचित ते गेले असतील. एक क्षण आणि तुम्ही त्या सुवर्ण युगात जाता जेव्हा महाराज इथे होते. त्यांच्या बरोबर असलेल्या व नसलेल्या सर्वांनी या राष्ट्रासाठी आपले सर्वस्व त्याग केले होते. आमच्या बरोबर एक हरितात्या असतोच. त्याचे नाव ढेरे भूषण. रात्री घरी गेला की महाराज ऐकतो. त्याला इतिहास आवडतो. हा माणूस वर्तमान काळात जगताच नाही. असो. त्यामुळे खूप गप्पा होतात आणि त्या मध्ये गोष्टी कळतात.  आणि मग हरितात्या सारखेच वाटते.... पु ल .....आत्ता च्या आत्ता समोर महाराज प्रकट व्हावेत. कपाळावर गंध, डोक्याला मंडळ, गळ्यात मोत्याची माळ, कमरेवर तलवार  आणि मग आम्ही सर्व ओरडू मोठ मोठ्यांनी ' गो ब्राम्हण प्रतिपालक प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस  छत्रपती शिवाजी महाराज की - जय जय जय. आणि हे सर्व विचार करता करता अंगावर आत्ता पण काटा येतो आहे. मंदिराच्या अली कडे एक टाकं आहे. तिथे पाणी भरून घेतलं आणि मंदिराच्या दिशेनी निघालो. बाहेर बूट काढतांना व पहिले पाऊल आत टाकतांना मनात काय चालू होतं हे इथे लिहिण्या इतका मी चांगलं लेखक नाही. लेखक नाहीच मी. शब्द अपुरे पडतात. इथे पोचलो आणि आमचा हरी तात्या चा ताबा सुटला. अंगात परत संचारलं. तो खरंच गेला की त्या दिवशी, जेव्हा शपथ घेतली स्वराज्याची. गप्पा गोष्टी झाल्या आणि तिथून आम्ही निघालो. तेव्हा एक कळलं कि शप्पत घेतली म्हणून थोर नव्हते ना त्या जागेची काही किंमत. शप्पत घेतली आणि त्या प्रमणे स्वराज्य उभे केले त्यामुळे ते थोर. त्यामुळे त्या जागेला महत्व. रारेश्वर हुन निघालो तेव्हा सूर्यास्ताला आला होता. विलोभनीय दृश्य आणि एक मंथरलेली वेळ होती ती. गाडीतून येतांना गप्पा मारत आणि नेहमी प्रमणे पुढचे काय याचा विचार करत करत तारांगण नावाच्या ठिकाणी आम्ही जेवायला थांबलो. असा आमचा एक  सुंदर दिवस पार पडला. वैराटगड, रायरेश्वर आणि केंजळगड. 



इतिहास :
बाराव्या शतकात भोजराजाने केंजळगडाची निर्मिती केली. इ.सन १६४८ मध्ये हा किल्ला अदिलशहाच्या आधिपत्याखाली आला. सन १६७४ मध्ये शिवरायांचा मुक्काम चिपळूण शहरात पडला होता. वाई आणि आजुबाजूच्या परिसरातील सर्व किल्ले शिवरायांच्या ताब्यात आले होते. मात्र केंजळगड अजून त्यांच्या ताब्यात आला नव्हता म्हणून शिवाजी महाराजांनी केंजळगड घेण्यासाठी आपल्या मराठी फौजा पाठवल्या. गंगाजी विश्वसराव किरदत हा किल्ल्याचा किल्लेदार होता, त्याने मराठ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. पण मराठ्यांकडून तो मारला गेला आणि २४ एप्रिल १६७४ मध्ये किल्ला मराठ्यांनी जिंकला. पुढे १७०१ मध्ये हा गड औरंगजेबाकडे गेला. मात्र लगेच एक वर्षाने म्हणजे १७०२ मध्ये परत केंजळगड मराठ्यांच्या ताब्यात आला. २६ मार्च १८१८ साली ब्रिटिश अधिकारी जनरल प्रिझलर याने दुर्गाचा ताबा घेतला.

शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली ती याच रायरेश्वराच्या डोंगरावर, मात्र ही घटना काल्पनिक आहे की खरी याबद्दल निश्चित विधान मांडता येणार नाही.


Ref - 
http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Kenjalgad-Trek-K-Alpha.html








केंजळगड पाहिऱ्या 


रायरेश्वर 


रायरेश्वर 


रायरेश्वर शिडीचा  रस्ता 


















रायरेश्वर हुन टोपी घातलेला केंजळगड 


चला परत 











No comments:

Post a Comment

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...