Saturday, 24 February 2018

सरसगड


सरसगड 
03.02.2018
Me, Pintu, Bhushan, Papya ani Chaddi

पाली च्या गणपती मंदिरा मागे जो उंच डोंगर दिसतो तो सरसगड. पुण्याकडून येत असतांना बाप्पा चे  मंदिर डावीकडे ठेऊन साधारण १ की मी मुख्य रस्त्यानी पुढे गेला की गडावर जाणारा रस्ता डावीकडे दिसतो. कोपऱ्यावर पाटी लिहिली आहे. 
सरसगड दिसायला मस्त मोठा आणि तेजस्वी किल्ला आहे. बाप्पा बल्लाळेश्वराच्या मागे जणू त्याचा पहारा करण्यासाठी हा किल्ला उभा आहे असे वाटते. सकाळी ६. ३० च्या सुमारास घरून निघालो आणि ९ च्या सुमारास गड चढायला सुरु केला. या वेळी पिंटू ला वर पर्यन्त न्यायचा आमचा निश्चय पण होता आणि खोड पण होती. खोपोली कडून पाली कडे जाणाऱ्या रस्त्यावर वळताच एक चहाची टपरी आहे. तिथे चहा आणि वडापाव एक नंबर मिळतो. सुधागड ला जाताना हाच रस्ता आहे आणि मी आणि बी डी इथेच थांबलो, आणि पोटपूजा केली होती. आता हा चहा चहाच आणि वडापाव पण. पुण्यात राहणाऱ्या लोकांना काहीच नवीन नाही की नाही. पण तरी जिथे जिथे जाऊ तिथे तिथे काही ना काही तरी अनोखे बघायला आणि खायला मिळते. नाव तेच पण चव वेगळी मिळते. भारता सारखे आहे. माणसं तीच पण जागे प्रमणे बदलतात. इतकी लोक निरनिरळ्या पद्धतींनी राहतात, The United State of India, की कधीतरी वाटते की हे सर्व चालवतं कोण. इतकी माणसं दररोज रात्री जेवतात आणि झोपतात. असो, माझी विचारांची गाडी वळायला लागली आहे. तर ट्रेकिंग मुले वेगवेगळ्या गावा  मध्ये छान छान खायला मिळते, एव्हडेच. पण चहा ही गोष्ट म्हणजे पु ल च्या पानवाल्या  सारखी होऊ शकते. तिथे पण तंबाखू आणि इतर सागर संगीत असतं तर इथे तसाच गादी  वर बसणारा तो चहावाला आणि तीच त्याची पळी आवाज करत चहा मध्ये फिरणारी. आलं हवे आहे का, मसाला, इलायची, special  का साधा, थोडीशी मलाई टाकून वाफाळलेला चहा मिळाला की अहाहा. पप्या चहा वेडा आहे. आवडला तर दोन तीन छोटे cups  सहज रीजवतो. पण आवडला पाहिजे. आणि शेवटच्या चहा मध्ये तो पाव असतो तो बुडवून खायचा. लै भारी.
किल्ला चढायला तसा सोपा आहे. चढण फार नाही. माथ्याच्या जवळ आलात की रस्ता घसरडा आहे आणि माती सरकते. नीट जावे. इथून किल्ला सुंदरच दिसतो त्यात काही वाद नाही. दोन्ही बाजूला दरी आहे आणि सोंडेवरून तुह्मी वर पोचता.




वर पोचताच एक गुहा आहे.

तिथूनच गडावर जायला पाहर्या आहेत. कातळातल्या या पाहिर्या दम काढतात. सुंदर आहेत पण.



 किल्ल्याचे दोन भाग आहेत. माची आणि बालेकिल्ला. वर पोचलात की दिंडी दरवाजा आणि तिथे एक खोली आहे. तटबंदी अजून बरीच छान दिसते. माचीवर पोचलात की पाण्याच्या टाक्या आहेत, सुंदर कोरीवकाम केले आहे.



एका दगडा खाली खूप प्रशस्त हॉल आहे. तिथे कदाचित लोक राहत असावेत. पण १०० पान सहज उठेल अशी खोली आहे.

टाकीच्या डावीकडून रस्ता बालेकिल्ल्यावर जातो.  वर पोचल्यावर किल्ल्याचे उत्तम दर्शन घडते. This fort use to be a watch tower in the golden days. सुधागड, घनगड, कोरीगड, तैलबैला याचे विलोभनीय दृश्य बघायला मिळते. सरसगड मला खूपच आवडला कारण किल्ला बराच शाबूत आहे आणि बघायला पण बरेच आहे. We all had a really good time at this place.




बिडी नी चिक्की आणली होती. मंदिरात बसून संपवली आणि खालच्या मार्गाला लागलो. उतरत असतांना खालच्या गावात क्रिकेट ची match चालू होती. एक सुंदर ground  वर हा खेळ चालू होता along  with  commentary. In India, anywhere you go, and if there is a cricket match going on, any level, people will tend to stop and watch. Atleast one over. त्याच्यावर चर्चा होते. नीट खेळ ना भाडू, तुझा बा ना असा बॉल टाकला होता का, कोंबडी पकड, च्यामारी आत्ता आपल्याला खेळता यायला पाहिजे होते वगरे वगरे. रस्त्यावर जातांना अचानक कोणी तरी उडी मारतं आणि फक्त हाथ फिरवतं. ती bowling ची action  असते, बॉल नसतांना. अचानक कोणी तरी बायटिंग ची action  करतो bat  नसतांना. हे फक्त इथेच होऊ शकत.


The cricket ground from the Top of the fort.

खाली पोचून बाप्पाचे दर्शन घेऊन परतीच्या वाटेवर निघालो. जय शिव शंभो. 



























No comments:

Post a Comment

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...