कैलासगड
25.02.2018
Me, Bhushan, Chaddi, Pintu ani UPENDRA W ( Upya)
Weekend ची वाट पाहत होतो. Last weekend ला कामामुळे कोणालाच जमलं नव्हतं ट्रेक ला यायला. मी गडावर पटकन चक्कर मारून आलो होतो. So everyone was looking forward to this weekend. हडसर निमगिरी चा प्लॅन होता. पण आधी इथले किल्ले केले पाहिजेत वगरे चर्चा चालू झाली आणि कैलासगड आणि घनगड असे दोन किल्ले ठरले. या वेळी thar नेऊ असा विषय झाला अन मी आणि बिडी चड्डी कडे निघालो. तिथे पोचलो आणि आमची गाडी XUV ५०० जी उप्याची गाडी आहे आणि जी तो आम्हाला ट्रेक ला उधार देतो, उभी पहिली. त्याच्या बरोबर गाडीचा मालक पण पाहिला. आनंद झाला. याचं कारण असा की उप्या नी बरीच मेहनत घेऊन त्याचे वजन कमी केले आहे. सर्व प्रकारचे उपाय करून त्यांनी व्यायाम चालू करून आता तो आपल्याबरोबर येतोय हे कळाल्यावर खूप बरं वाटलं. आमच्या टोळी मध्ये अजून एक मावळा आला. ५ लोकं झाले. उप्या हा खूप जुना मित्र आहे. अर्थात तो जग मित्र आहे. अत्यंत straight forward आणि computer networking मधला किडा आहे. चड्डी बरोबर तो त्याच्या स्टुडिओ मध्ये काम करतो. तो wildlife photography specifically, birds, खूपच छान करतो. त्यांनी काढलेले फोटो बघण्यासारखे आहेत. उप्या ची प्रशंसा इथे संपली. त्याची ओळख झाली. गाडी मीच चालवली.
ताम्हिणी घाटातून एक रस्ता लोणावळ्या ला जातो. त्याच रस्त्यावर वडुस्ते नावाचं गाव आहे. तिथे हा किल्ला आहे. गाव सोडून थोडासं पुढे एक खिंड आहे. गाडी तिथे लावून उजवीकडे मळलेली वाट तुम्हाला गडाच्या माथ्यावर नेते. ह्या किल्ल्यावर फारसे बघण्यासारखे काहीही नाही. एक महादेवाची पिंड आहे. रस्ता सोपा नाही. घसरडे आहे. नीट काळजी घेऊन वर जावे. पिंटू अर्ध्यावाटेत थांबला. त्याला vertigo चा त्रास आहे आणि हा गडी वर आला नाही. चालतंय की. तटबंदी वगरे काहीही शिल्लक नाही. ना दरवाजा आहे ना काही. वर जायला १ तास खूप झाला. वरून मुळशी धरणाचा पूर्ण विस्तार सुंदर दिसतो. महादेवाच्या जवळील जागा साफ करुनठेवली. तिथे पण कचरा केला होता. बसून खालले आणि तिथून निघालो. ३० मी मध्ये आम्ही खाली पोचलो. घनगडचा रस्ता पाहिला आणि त्याचा दिशेनी आम्ही निघालो.
इतिहास : | |
किल्ल्यावरील टाक्यावरून हा किल्ला सातवहान काळात बांधला असावा असे वाटते. ऐतिहासिक कागदपत्रात या किल्ल्याचा उल्लेख इसवीसन १७०६ मध्ये शंकरजी नारायण सचिवांनी हणमंतराव फ़ाटकांना लिहिलेल्या पत्रात मिळतो. (ref - trekshitiz) |
Great information accompanied by unique visuals... As usual, superb my friend.
ReplyDeleteVery nicely written. Impressive Marathi. Usually I never comment on blogs but your article is so informative that I never stop myself to say something about it. You’re doing a great job Man,Keep it up.
ReplyDeleteVery nicely written. Impressive Marathi. Usually I never comment on blogs but your article is so informative that I never stop myself to say something about it. You’re doing a great job Man,Keep it up.
ReplyDelete